Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्‍याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडीच्या या फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल. जाणून घ्या भेंडीचे 8 अनमोल फायदे...

1) कँसर - भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते. ही आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास मदत करते, ज्याने तुमच्या आतड्या स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.

2) हृदय - भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवते. यात उपस्थित पॅक्टिन कोलेस्टरॉलला कमी करण्यास मदत करतो. तसेच यात असणारे विरघळणारे फायबर, रक्तात कोलेस्टरॉलला नियंत्रित करतो, ज्याने हृदय रोगाचा धोका कमी राहतो.

3) डायबिटीज - यात असणारा यूगेनॉल, डायबिटीजसाठी फारच फायदेशीर असतो. हा शरीरात ग्लोकोजच्या स्तराला वाढवण्यापासून बचाव करतो, ज्याने डायबिटीज होण्याचा धोका कमी असतो.

4) अॅनिमिया - भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते. यात उपस्थित आयरन हिमोग्लोबिनचे निर्माण करण्यास सहायक असतो आणि विटामिन- के, रक्तस्त्रावाला रोखण्याचे काम करतो.

5) पचन तंत्र - भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात उपस्थित लसदार फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.

6) हाड मजबूत होतात - भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ आमच्या हाडांसाठी फारच उपयोगी असतो. यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मददगार असतात.

7)इम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतो.

8) गर्भावस्थेत भेंडीचे सेवन लाभदायक आहे. भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असतो जो गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्याशिवाय भेंडीत बर्‍याच प्रकारचे पोषक तत्त्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

एका शोधाप्रमाणे धूम्रपान करणार्‍याव्यतिरिक्त अनेक मुखमैथुन करणार्‍या पुरुषांच्या गळ्यात होणारे कँसरचा धोका वाढू शकतो.

अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांप्रमाणे ह्युमन पेपिलोमा विषाणू अर्थात एचपीव्ही याच्या संपर्कामुळे होणार्‍या कर्करोगाला स्वर धमनीचे केसर असे म्हटले जातं. एन्नल्स ऑफ ऑन्कोलॉजी पत्रिकेत प्रकाशित या शोधाप्रमाणे केवळ 0.7 टक्के पुरुषांना या कँसरचा धोका असतो.

शोधकर्त्यांप्रमाणे महिला, धूम्रपान न करणारे आणि आपल्या जीवनात 5 हून कमी साथीदारांसोबत मुखमैथुन करणार्‍यांना याचा धोका कमी असतो. एचपीव्हीचे 100 हून अधिक प्रकार आहेत. सरवाइकल केसरामागे एचपीव्ही 16 आणि 18 याने होणारे संक्रमण जबाबदार आहे तसेच एचपीव्ही 16 ला स्वर धमनी कँसरसाठी जबाबदार मानले आहेत.

साखर आमच्या जीवनातील अविभाज्य अंग आहे. आणि याचा गोडवा जितका हवा हवासा वाटतो तेवढेच याचे नुकसानही आहेत. जर आपल्यालाही साखर खाण्याची सवय असेल तर यापासून होणारे पाच नुकसान जाणून
घ्या:

मधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.

खाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तांगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.

हृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते. >
इसब- त्वचेवर अधिक साखर सेवन केल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एका संशोधनाप्रमाणे साखरेमुळे इसब होण्याची शक्यता वाढते.

कमजोर हाडं- साखरेमुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.

गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी जिर्‍याचे पाणी फारच फायदेकारक असते.

कसे प्यावे गर्भवती महिलेने जीऱ्याचे पाणी
जीऱ्याचे पाणी पिण्यासाठी आधी एक लिटर गरम पाण्यात एक चमचा जीरे टाकून ते उकळून घ्यावे. जेव्हा पाणी थंड होईल तेव्हा गाळून ते पाणी प्यायला पाहिजे.

जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

१. ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवते.
जीऱ्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशिअम ब्लड प्रेशरचे नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

२. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ नाही देत.
गर्भवती महिला दोन जीवांची असते. तिच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी होण्याचा संभव असतो. जीऱ्याच्या पाण्याने हिमोग्लोबीन वाढते आणि शरीरातील लोहाचे प्रमाणही वाढते.

३. रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
जीऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

अडसर- कोवळा फक्त पाणी पिण्यायोग्य. किंचित साईसारखी मलई असलेला नारळ असेल तर त्यास शहाळे, काकडे, काबा या नावांनी ओळखले जाते.
उचकी लागली असता शहाळ्याचे पाण्यात बर्फ टाकून घ्यावे.

उष्णतेमुळे अंगाचा दाह होत असल्यास शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून घ्यावे.

अर्धशिशीच्या विकारात रात्री शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून पाणी झाकून ठेवावे.

रक्तप्रमेहात शहाळ्यातील अर्धे पाणी काढून टाकून राहिलेल्या पाण्यात दोन चिमटी तुरटीची पावडर टाकून तोंड बंद करून रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी मुखमार्जन करून हे पाणी नीट ढवळून घ्यावे. 3-4 दिवस हा उपचार करताच गुण नजरेस येतो.
डोके भ्रमिष्टासारखे होत असल्यास रोज नेमाने सकाळी एक शहाळे घ्यावे.

लहान मुलांना सर्दीचा त्रास जाणवत असल्यास शहाळ्यातील मलईदार खोबरे चांगले घोटून खावयास द्यावे.

मोठी जखम भरून येण्यासाठी शहाळ्यातील घोटलेल्या मलईदार खोबऱ्याचा लेप करावा.

अकाली पडणाऱ्या सुरकुत्या टाळून चेहरा सतेज दिसण्यासाठी शहाळ्यातील मलई चांगली घोटून लोण्यासारखी झाल्यावर चेहऱ्यास लावावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा हळूवारपणे धुऊन सुती कापडाने चांगला टिपून घ्यावा.
लघवीच्या विकारात शहाळ्याचे पाण्यात संत्रे/लिंबाचा रस टाकून वरचेवर घेत राहावे.

Dr. Kedar Wani
Dr. Kedar Wani
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Rahul Devle
Dr. Rahul Devle
BHMS, Homeopath Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Sandip  Jagtap
Dr. Sandip Jagtap
MBBS, Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist, 14 yrs, Pune
Dr. Dhanraj Helambe
Dr. Dhanraj Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Hellodox
x