Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

तोंडाला चव आणणारी-स्वयंपाकघरात हमखास लागणारी
स्वयंपाकघरात नित्य आहारात वापरण्यासाठी चिंच आवश्यक असते. चिंच आमटी आणि भाजीत वापरतात.

पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.
पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं.

चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. पाणी अर्ध आटवावं. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार/सवय दूर होते.

चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.

रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.

चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ २/२ या प्रमाणात घ्याव्या.

अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे.

पुरेसे पाणी न पिणे हे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास जडण्यामागील एक प्रमुख कारण आहे. पाण्याव्यतिरिक्तदेखील इतर पाणीदार भाज्या, हेल्दी ड्रिंक्स, फळं यांचा आहारात पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे.यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

प्यायलेल्या पाण्यातून नियमित दोन लीटर मूत्राची निर्मिती होणे गरजेचे आहे. त्यामधून घातक घटक शरीराबाहेर पडण्यास मदत होते. परिणामी किडनीचे आरोग्य सुधारण्यासोबतच टाकाऊ घटक साचून राहण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे किडनीप्रमाणेच आरोग्यदेखील सुधारते.

किडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी नियमित किती लीटर पाणी पिणे आवश्यक आहे ?
युरो-ऑन्कोलॉजिस्ट (लिलावती, सैफी , ब्रीच कॅन्डी) डॉ. अनूप रामाणी यांच्या सल्ल्यानुसार, किडनी स्टोनचा त्रास होऊ नये म्हणून नियमित 6-8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. किडनी स्टोनचा त्रास असल्यास तो पुन्हा होऊ नये म्हणून किमान 3 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

माणसाला आवश्यक असणार्‍या पाण्याची गरज अनेक निकषांवर अवलंबून असते. यामध्ये शारिरीक कष्ट, हवामान आदींचा समावेश असतो. पाणी प्यायल्याने मूत्र निर्मितीचे प्रमुख काम होते. जर मूत्र निर्मिती कमी असेल म्हणजेच जर तुम्ही दिवसातून 1-2 वेळेस बाथरूममध्ये जात असाल तर तुम्हांला अधिक पाणी पिण्याची गरज आहे. तसेच सतत मूत्र विसर्जनाची इच्छा होणेदेखील त्रासदायक आहे. सतत मूत्रविसर्जन होणे हे मधूमेह,प्रोस्टेटच्या आजारांचे लक्षण आहे.

दिवसभरात 4-5 वेळेस मूत्रविसर्जन करणे सामान्य आहे. मात्र पाणी पिण्याची इच्छा टाळू नका. पाण्यासोबत फळांचा रस, लिंबूपाणी देखील फायदेशीर ठरते. नुसतेच पाणी पिणे कंटाळवाणे वाटत असल्यास ‘ इन्फ्यूज्ड वॉटर’ प्या. यामध्ये तुम्ही आवडीनुसार स्वादाची निवड करू शकता. त्यामुळे डीहायड्रेशन तसेच किडनीस्टोनच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.

भावनिकदृष्टय़ा अस्थिर आणि चिंताग्रस्त व्यक्ती स्मार्टफोनच्या आहारी जात असल्याचा दावा नुकताच एका अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील डर्बी विद्यापीठ आणि नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठ यांनी स्मार्टफोनचा वापर आणि व्यक्तिमत्त्व यांच्यातील संबंध शोधण्यासाठी १३-६९ वयोगटातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ६४० व्यक्तींचा अभ्यास केला. जे लोक मानसिक तणावाखाली असतात ते स्मार्टफोनचा अतिवापर चिकित्सा म्हणून करतात. त्याचप्रमाणे स्मार्टफोनचा अतिवापर केल्यामुळे व्यक्तींना अधिक चिंता करण्याची सवय लागते, असेही या अभ्यासात आढळले आहे. जगभरात ४.२३ अब्ज स्मार्टफोन वापरले जातात. काही लोकांसाठी स्मार्टफोन ही त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील गरजेची गोष्ट झाली आहे, असे डर्बी विद्यापीठातील प्राध्यापक जहीर हुसैन यांनी सांगितले.

लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात तणाव, चिंता, नैराश्य, कौटुंबिक अडचणी अशा प्रकारच्या अनेक समस्या असतात. त्यामुळे ते भावनिकदृष्टय़ा अस्थिर होतात. तर या समस्यांपासून निसटण्यासाठी ते स्मार्टफोनचा अधिकाधिक वापर करतात, अशा प्रकारचे वर्तन चिंताजनक असल्याचे हुसैन यांनी म्हटले.

या अभ्यासामध्ये चिंता स्मार्टफोनच्या अतिवापराशी संबंधित असल्याचे आढळून आले. याआधी झालेल्या अभ्यासातदेखील स्मार्टफोनचा अतिवापर आणि चिंतेचे वाढते प्रमाण यामध्ये दुवा असल्याचा निष्कर्ष देण्यात आला होता. जे लोक आपल्या भावना उघडपणे मांडत नाही त्यांना अति स्मार्टफोन वापरण्याची समस्या असल्याचे अभ्यासात स्पष्ट केले आले. भावनिक स्थिरता ही मानसिक स्थिरता आणि संवेदनक्षमता यामुळे ठरते आणि आमच्या अभ्यासात भावनात्मकदृष्टय़ा अस्थिर असणे हे स्मार्टफोनच्या अतिवापराशी संबंधित आहे, असे हुसैन यांनी म्हटले.

मुंबई : दिवसभर धावपळ आणि काम केल्यानंतर रात्री बिछान्यात पडल्यावर शांत झोपावे असे अनेकांना वाटते. परंतू दिवसभरातील काही चूकीच्या सवयी किंवा खाण्या-पिण्याच्या सवयींमूळे रात्री थकूनही झोप येत नाही. यामुळे अनेकांना मध्यरात्री अचानक जाग येणे, झोप न येणं अशा समस्या वाढतात.

निद्रानाशाच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन हे त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बिछान्यावर पडून कुशी बदलत राहण्यापेक्षा काही श्वसनाचे व्यायाम करावेत. यामुळे झोपेला चालना देणार्‍या हार्मोन्सचा शरीरात प्रवाह सुधारतो. असा सल्ला आहारतज्ञ स्वाती दवे देतात.

श्वासावर नियंत्रण कसे ठरते झोपेसाठी फायदेशीर ?
योगा केल्याने ताण हलका होण्यास मदत होते हे सार्‍यांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे शरीरातील तसेच मानसिक ताणतणाव कमी झाल्यास झोप येणे सुकर होते. त्यामुळे झोपण्यापूर्वी काही हलकी योगासनं करा. यासोबतच श्वसनावर नियंत्रण मिळवल्यानेदेखील झोप येण्यास मदत होते. यामुळे शरीरात कार्बनडायऑक्साईड साचून राहतो आणि ताण हलका होण्यास मदत होते.

तुम्ही कसा कराल हा व्यायाम ?

पडल्या-पडल्या झोपण्यासाठी हा श्वसनाचा व्यायाम स्टेप बाय स्टेप अशाप्रकारे करा

Step 1:
उजव्या कुशीवर झोपा.

Step 2:
डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या.

Step 3:
शक्य तितका वेळ श्वास रोखून ठेवा. सुरवातीच्या काळात श्वास काही सेंकंदच रोखणे शक्य होईल. हळूहळू तुम्ही 10-15 सेकंद श्वास रोखणे शक्य होईल.

Step 4:
हा प्रयोग नियमित रात्री झोपण्यापूर्वी 5-6 वेळेस करा. हळूहळू तुमच्या निद्रानाशेच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.

तुम्ही पाणी बसून पिता की उभं राहून? जर तुमचे उत्तर उभं राहून असे असेल तर वेळीच सावध व्हा. कारण अशाप्रकारे उभं राहून पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात अनेकजण उभ्यानेच पाणी पितात मग ते ऑफीस असो घर असो किंवा प्रवासात पाणी पिणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र वेळीच ही सवय मोडणे आरोग्यासाठी योग्य ठरेल… उभ्याने पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला कोणकोणते धोके आहेत जाणून घेऊयात…

सांधेदुखी:

उभ्यानेच आणि घाईघाईने पाणी पिण्याच्या सवयीमुळे तुम्हाला सांधेदुखीचा म्हणजेच आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो. शरीराच्या सांध्यांतील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते. त्यामुळे अचानक क्रॅम्प येणे किंवा सांधे दुखणे यासारख्या लक्षणांपासून या आजाराची सुरुवात होते आणि मग हा सांधेदुखीचा त्रास आयुष्यभराचा सोबती होतो.

पचनाचे विकार:

जेव्हा तुम्ही उभ्याने पाणी पिता तेव्हा ते थेट अन्ननलिकेद्वारे पोटात जाते. उभ्याने पाणी प्यायल्यास पाणी थेट अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब टाकते. त्यामुळे उभं राहून पाणी प्यायल्यास पचनप्रक्रियेत समस्या निर्माण होऊन पचनाचे विविध विकार जडू शकतात.

तहान भागत नाही:
उभं राहून पाणी प्यायल्याने तहान कधीच पूर्णपणे भागत नाही. उभं राहून पाणी प्यायल्यास तुम्हाला सतत थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळेच निवांत एक जागी बसून पाणी प्यायल्यास तहान पूर्णपणे भागते.
पचनाला कठीण:

उभं राहून पाणी प्यायलास शरीराला त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्याऐवजी बसून पाणी प्यायल्यास तुमचे स्नायू आणि मज्जासंस्थेवर जास्त ताण नसल्याने पाण्याबरोबर शरीरातील इतर पदार्थही पचण्यास मदत होते.

किडनीचे आजार:

उभे राहून पाणी प्यायल्यास ते पाणी शरीरातून थेट वाहून जाते आणि त्याचा शरीराला विशेष फायदा होत नाही. पाणी वेगाने वाहून किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. आणि हा संसर्गामुळे किडनीला कायमस्वरूपी इजा करू शकते.

Dr. Ashok Lathi
Dr. Ashok Lathi
MS - Allopathy, General Surgeon, 37 yrs, Pune
Dr. Prashant S Mane
Dr. Prashant S Mane
BAMS, Critical Care Medicine Specialist, 10 yrs, Pune
Dr. Amarsinha Nikam
Dr. Amarsinha Nikam
MD - Homeopathy, Homeopath, 33 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Hellodox
x