Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

हायपर अॅक्टिव्ह, म्हणजेच अत्यधिक प्रमाणामध्ये सक्रिय असणारी मुले घरामध्ये असणे, ही घरातील सर्वच मोठ्या माणसांच्या धावपळीचा आणि सहनशक्तीचा कस लागेल अशी बाब आहे.

ही मुले अतिशय चंचल म्हणता येतील. ह्याचे न एका गोष्टीवर फार काळ स्थिर राहू शकत नाही. तसेच ही मुले एका ठिकाणी फार वेळ बसू शकत नाहीत. त्यांना सतत काहीतरी नवीन लागते.

अशी मुले नेही काहीतरी उचापती करून घरच्या मंडळींच्या नाकीनऊ आणत असतात. या मुलांना एकटे, देखरेखीच्या विना सोडूनही चालत नाही. कुठल्या क्षणी ह्यांच्या मनामध्ये कोणती कल्पना येईल याचा नेमका अंदाज घेणे कठीण असते.

अशा अति सक्रिय मुलांचे लक्ष एका गोष्टीवर केंद्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या शरीरातील ऊर्जेला व्यवस्थित चालना देण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे. अशा मुलांना खेळांमध्ये किंवा कामांमध्ये गुंतवावे, ज्यामध्ये त्यांची शारीरिक ऊर्जा खर्च होईल. तसेच ह्या मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना बोर्ड गेम्स, कोडी सोडविणे अशा प्रकारचे बौद्धिक व्यायाम आवश्यक आहेत.

अति सक्रिय मुलांचे मन शांत करण्यासाठी धुर, संथ संगीतचा उपयोग करण्याचा सल्ला मनोवैज्ञानिक देतात. तसेच टीव्ही, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम्स, मोबाइल ह्यांचा वापर मर्यादित ठेवायला हवा. ह्या साधनांच्या अतिवापराने मुलांचे मन आणखी सक्रिय होत असते. तसेच ह्या साधनांधील मोठे, कर्कश आवाज, भडक रंग यांचाही मुलांच्या मनावर परिणाम होत असल्याचे मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सकाळी लवकर न उठणे आरोग्यास हानीकारक असून यामुळे आयुर्मान कमी होण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

या अभ्यासात पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्यांचे आयुर्मान रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणाऱ्यांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. हा अभ्यास जर्नल क्रोनोबायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ब्रिटनमधील सरे विद्यापीठाचे प्राध्यापक माल्कम वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी समायोजित केल्यानंतरदेखील त्यांच्यामध्ये आयुर्मान दहा टक्क्यांनी कमी असल्याचा धोका आढळून आला.

रात्री जागरण करणाऱ्यांमध्ये मधुमेह, मज्जासंस्थेचा विकार, मानसिक विकारांचे प्रमाण जास्त आढळून आले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांनी शक्य असल्यास त्यांची कामे लवकर करून घ्यावीत.

त्याचप्रमाणे त्यांचे जैविक घडय़ाळ दिवसाच्या वेळेप्रमाणे कसे चालेल याबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे वॉन शंटझ यांनी सांगितले.


रात्री जागरण करणाऱ्या लोकांमधील जैविक घडय़ाळ त्यांच्या बाहय़ वातावरणाशी जुळत नसल्याचे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका क्रिस्टन नुटसन यांनी सांगितले. आनुवंशिकता आणि ज्या वातावरणात आपण वाढतो या दोन्ही गोष्टी आपल्या झोपेच्या सवयींवर परिणाम पाडण्यास समान भूमिका बजावतात.

यावर उपाय म्हणून लोकांनी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

मुंबई : वर्कआऊट केल्यानंतर खूप तहान लागते. तसंच वर्कआऊट करण्यासाठी शरीरात ऊर्जा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्कआऊट दरम्यान स्टॅमिना राखण्यासाठी हायड्रेट आणि एनर्जेटीक असणे आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही बाहेरचे ड्रिंक्स खरेदी करता आणि त्याचा आस्वाद घेता. पण सर्वच ड्रिंक्स हेल्दी असताच असे नाही. त्यात कलर्स, सिथेंटीक एडिटिव्स आणि अनैसर्गिक फ्लेव्हर्सचा वापर केला जातो. त्यामुळेच त्याऐवजी या चार पेयांचे सेवन करणे आरोग्यदायी ठरेल. यामुळे तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल आणि फॅट्सही वाढणार नाहीत.

संत्र्याचा रस-
संत्र्याच्या रसात व्हिटॉमिन सी, ई भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच पण फॅट्सही वाढणार नाहीत. हे अत्यंत आरोग्यदायी ड्रिंक आहे.

केळे व व्हिट ग्रास ड्रिंक-
हे ड्रिंक अतिशय हेल्दी मानले जाते. यातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

गाजराचा रस-
वर्कआऊटनंतर गेलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी गाजराचा रस हा उत्तम उपाय आहे.

चॉकलेट शेक-
चॉकलेट शेक टेस्टी असण्याबरोबच त्यामुळे थकवाही कमी होतो.

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या आणि तणावयुक्त जीवनशैलीमुळे शांत झोप लागणे तसे कठीणच. टी.व्ही., मोबाईलचे व्यसनही त्याला तितकेच कारणीभूत ठरते. तसंच शांत झोप न येण्यास तुमचा बेड अथवा तुमच्या बेडरुम मधील तापमान देखील तितकेच कारणीभूत असू शकते. त्यामुळे शांत झोपेसाठी या गोष्टींकडेही अवश्य लक्ष द्या.

चांगल्या आरामदायक बेडची निवड करा-
जर तुमचा बेड खूपच सॉफ्ट असेल तर तुम्हाला त्यापेक्षा थोड्या टणक बेडची गरज असू शकते. अल्ट्रा सॉफ्ट बेड कमी आरामदायक असतात. ज्यामुळे अंगदुखी व झोपमोड होत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या मॅटट्रेसमध्ये देखील गुठळ्या नाहीत याची नीट दक्षता घ्या. निवांत झोप येण्यासाठी आरामदायक उशी घ्या. उशी जास्त मऊ अथवा जास्त टणक नसल्यास तुमच्या मानेला निश्चितच चांगला आधार मिळेल. तसेच उशीला नेहमी सुती कव्हर घाला.

बेडरुमचे तामपान योग्य व नियंत्रित ठेवा-
चांगल्या निवांत झोपेसाठी बेडरुमचे तापमान अतिथंड अथवा अतिउष्ण असे दोन्हीही नसावे. शांत झोपेसाठी आदर्श तापमान हे नेहमी ५० टक्के आद्रतेसह २५ अंश सेल्सियस असावे. त्यामुळे एकदा का बेडरुममधील वातावरण योग्य प्रमाणात उबदार झाले की तुमचे एसी अथवा हिटर बंद करा. कारण रात्रभर ते सुरु ठेवल्यास तुमच्या बेडरुम मधील आर्द्रता कमी होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला पुरेसे आरामदायक वाटणार नाही. एअरकंडीशनर वापरताना देखील हेच नियम पाळावेत.

रात्रीचे हलके जेवण घ्या-
तुम्ही रात्री काय खाता यापेक्षा तुम्ही किती वाजता जेवता हे खूप महत्वाचे आहे. झोपण्यापूर्वी दोन तास आधी जेवल्यामुळे तुमचे पचन चांगले होते व तुम्हाला झोप देखील चांगली लागते. तसेच तुम्ही रात्री हलका आहार घ्याल याकडे नीट लक्ष द्या. कारण जड जेवणामुळे तुम्हाला अपचन व पचनासंबधित इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

दररोज ठराविक वेळीच झोपा-
लवकर निजे व लवकर उठे त्याला आरोग्य-संपदा लाभे असे पूर्वी सांगण्यात यायचे ते खरेच आहे. यासाठीच ठराविक वेळी झोपा व सकाळी लवकर उठा. तुमच्या झोपेच्या वेळेत बदल झाल्यामुळे देखील तुमच्या झोपेचा पॅटर्न बदलू शकतो. झोपेची वेळ पाळल्यामुळे तुमचे मन व शरीर दोघांनाही सात तास झोप घेण्याची शिस्त पाळण्यास मदत होते.

बेडरुममध्ये अंधार करा-
जसे रात्री जोरजोरात आवाजप्रमाणे प्रकाशामुळेही झोपमोड होऊ शकते. यासाठी रात्री झोपताना बेडरुममधील सर्व दिवे बंद करा. जर तुम्हाला रात्री वाचन करण्याची सवय असेल तर यासाठी एखादे पुस्तक वाचनासाठी घ्या कारण ई-बूकचा तुमच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.

उन्हाळ्यात नेमके खायचे तरी काय? असा प्रश्न अनेकदा पडतो. उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा आणि अंगावर येणारा घाम यामुळे अनेकदा चिडचीड होते. त्यामुळे जेवण करणंच काय पण, आयतं गरमागरम पदार्थांचं ताट जरी कोणी पुढे ठेवलं तरी ते खावसं वाटत नाही. अशा वेळी दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश आवर्जून करावा याविषयी थोडक्यात.

– उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात हलका फुलका आहार ठेवावा.
– वरण, आमटी, कोथींबीर किंवा आलं पुदिन्याची चटणी ही जेवणात असावी.
– हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यावेळी वाल, पावटा, छोले, राजमा, हरभरा ही कडधान्ये मात्र टाळावीत.
– मूग, मूगडाळ, तूरडाळ, मसूर, कुळीथाचे पीठ असं आहारात असावी.
– त्याचप्रमाणे काकडी-टोमॅटो-बीट-गाजर-कांदा यांची कोशिंबीरीचा आवश्य आहारात समावेश करून घ्यावा.
– तर कामावर जाणाऱ्यांनी दुपारच्या जेवणात डब्याला पोळी भाजी न्यावी. भाजीमध्ये हिरव्या भाज्या किंवा फळभाज्यांचा समावेश करावा.
– नाश्ता आणि जेवण यांच्या मधल्या काळात फळे खावीत. कलिंगड, खरबूज, जाम अशी फळं खावीत.
– या ऋतूत लक्षात ठेवून दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे.
– जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नये तसेच जेवताना फ्रिजमधील थंड पाण्याचा वापर तर कटाक्षाने टाळावा.

Dr. Joydeep Saha
Dr. Joydeep Saha
Specialist, Pain Management Specialist Physician, 10 yrs, Kolkata
Dr. Amit Patil
Dr. Amit Patil
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Gynaecologist, 11 yrs, Pune
Dr. Ganesh  Jangam
Dr. Ganesh Jangam
BHMS, Homeopath Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Hellodox
x