Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : अलिकडच्या काळात योगाबद्दल लोकांमध्ये चांगली जागृती झाली आहे. पण योगासनांमुळे तुम्ही फक्त फिट आणि हेल्दी राहत नाही तर ताणही कमी होतो. योगासनांचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यावरही होतो. त्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. एक असे आसन आहे जे केल्यामुळे तुमची एनर्जी, स्टॅमिना वाढत नाही तर त्याचा ताण दूर करण्यासही फायदा होतो. या आसनाचे नाव आहे अधोमुख श्वानासन.

फायदे
तणाव दूर करण्यासाठी हे आसन अधिक परिणामकारक ठरतं. या आसनामुळे खांदे, हातांच्या स्नायूंना व्यायाम मिळतो व ते मजबूत होतात. त्याचबरोबर मासिक पाळीत किंवा मेनोपॉजच्या वेळेस होणाऱ्या त्रासावर या आसनाने आराम मिळतो.

आसन करण्याची पद्धत
-सर्वात आधी पोटावर झोपा. त्यानंतर पाऊलं बोटांवर ठेवा.
-हात छातीच्या बाजूला घेत हात आणि पायांच्या बोटाच्या आधारावर संपूर्ण शरीर वर उचला. डोके दोन्ही हातांच्या मध्यातून खाली घाला.
-या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
-त्यानंतर हळूहळू आसन सोडा.

काय काळजी घ्यावी?
-प्रेग्नंसीमध्ये हे आसन करताना पायात थोडे अंतर ठेवा. काही त्रास होत असल्यास तज्ञांच्या मदतीने हे आसन करा.
-पाठ किंवा खांदेदुखी असल्यास हे आसन करणे टाळा.
-उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनीही हे आसन करु नये.
-हात, मनगटाचे काही दुखणे असल्यास हे आसन करणे टाळा.

मुंबई : सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो. केस मुलायम, घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल वापरता. तर अनेकदा घरगुती उपायही ट्राय करता. पण नेहमीच्या धावपळीत केसांकडे शक्य तितके लक्ष दिले जात नाही. पण अशा काही सोप्या टिप्स ज्यासाठी तुम्हाला अधिक वेळ खर्च करावा लागणार नाही आणि त्यामुळे केसांचे आरोग्यही राखले जाईल. यासाठी तुम्हाला फक्त शॅम्पूमध्ये काही गोष्टी मिसळायच्या आहेत. पहा कोणत्या आहेत त्या गोष्टी...

लिंबाचा रस
शॅम्पूमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. त्यामुळे केस नीट स्वच्छ होतील. केसातील तेल सहज निघून जाईल. स्काल्फचा पीएच बलन्स योग्य राखता येईल.

टी ट्री ऑईल
टी ट्री ऑईलमध्ये अॅंटीबॅक्टेरीअल आणि अॅँटीफंगल गुण असतात. शॅम्पू टी ट्री आईल मिक्स केल्याने कोंड्याची समस्या दूर होईल. केसांतील नैसर्गिक ऑईल टिकून राहील. आणि स्काल्फचे इंफेक्शन कमी होण्याची संभावनाही कमी होईल.

कोरफड जेल
त्वचेबरोबरच केसांच्या आरोग्यासाठीही कोरफड जेल फायदेशीर ठरते. शॅम्पूत मिक्स करुन लावल्याने केसात येणारी खाज कमी होईल. स्काल्फ ऑयली होण्याचे प्रमाण कमी होईल. केस नीट स्वच्च होतील. त्याचबरोबर केसगळती थांबण्यास मदत होईल.

आवळा ज्यूस
आवळा केसांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. एक लहान चमचा आवळा ज्यूस शॅम्पूत मिसळा आणि त्याने केस धुवा. असे नियमित केल्याने केस काळे होण्यास मदत होईल. केसांचे चांगले कंडीशनिंग होईल आणि त्याचबरोबर केस वाढीसही चालना मिळेल.

मध
केस खूप कोरडे झाले असल्यास एक छोटा चमचा मध शॅम्पूत मिसळा. त्यामुळे केसातील बॅक्टेरिया नष्ट होतील. केसांना चमक येईल. मात्र शॅम्पूत मध मिसळल्यानंतर केस स्वच्छ धुवा. अन्यथा मधाचा चिकचिकीतपणा केसात राहील.

ग्लिसरीन
ग्लिसरीनचे ७-८ थेंब शॅम्पूत मिसळल्याने केस मॅनेजेबल राहतील. स्काल्फही हायड्रेट राहील.

मुंबई : तुमच्याही कंबरेजवळील भाग अधिक सुटू लागल्याचे तुम्हाला जाणवते का? कारण आजकाल ही समस्या अगदी सामान्य झाली असून अनेकजण त्यामुळे त्रस्त आहेत. यासाठी फक्त जंक फूड कारणीभूत नसून अनेक गोष्टी जबाबदार आहेत. आपली गुंतागुतीची आणि धावपळीची जीवनशैली देखील याला जबाबदार ठरते.

पुरेशी झोप न घेणे:
अपुऱ्या झोपेचा परिणाम कंबरेजवळील चरबी सुटण्यावर होतो. पुरेशी झोप न घेणे हे दिवसाला ३०० अधिक कॅलरीज घेण्यासमान आहे.

तुमची बॉडी अँपल शेप असल्यास:
जर तुमची बॉडी अँपल शेप असेल तर मांड्या, पार्श्वभागाऐवजी कंबरेजवळील भाग सुटण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला जेनेटीकरित्या असा त्रास असेल आणि तुमची अँपल शेप बॉडी असेल तर त्यापासून सुटका मिळवणे काहीसे कठीण आहे.

तुम्ही दिवसभर बसून असल्यास:
दिवसभर बसून राहिल्याने वजन वाढते. विशेषतः शरीराच्या खालच्या भागाचे ( lower body) वजन अधिक वाढते. जर तुमचे काम बैठ्या स्वरूपाचे असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि थोडं फिरून या.

अयोग्य फॅट्सचे सेवन:
मटण, दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या सॅच्युरेटेड फॅट्सच्या अति सेवनाने visceral fat वाढीस लागते आणि कंबरेजवळील भागात जमा होऊ लागतात.

तणावग्रस्त असल्यास:
जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुमच्या कंबरेजवळ अधिक फॅट्स जमा होण्याची शक्यता जास्त असते. cortisol हे स्ट्रेस हार्मोन कंबरेभोवती visceral fat जमा होण्यास कारणीभूत ठरते.

रात्री उशिरा जेवण्याची सवय:
जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर झोपेत फॅट्सचे ऊर्जेत रूपांतर करणे शरीराला कठीण जाते. त्यामुळे चरबी वाढते. तसंच अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

मुंबई : शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते. मात्र हे वाहणारे रक्त थांबवायेच कसे, हा प्रश्न आहे. त्यावर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. या घरगुती उपायांनी ६० सेकंदात रक्त वाहणे थांबेल. पहा कोणते आहेत ते उपाय...

टी बॅग्स
रक्त थांबवण्याचा हा आश्चर्यकारक उपाय आहे. एक टी बॅग पाण्यात बुडवून जखमेवर लावा आणि १० मिनिटांपर्यंत दाबून धरा. रक्त वाहणे थांबेल.

बर्फ
रक्त थांबवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बर्फ लावणे. जखमेवर बर्फ लावल्याने रक्त लवकर क्लॉट होते आणि दुखण्यावरही आराम मिळेल.

हळद
हळदीत जखम भरण्याची क्षमता असते. जखमेवर हळद लावल्याने रक्त कलॉट होण्यास मदत होते. त्याचबरोबर इंफेक्शनपासूनही संरक्षण होते.

फटकी
फटकीत अनेक मिनरल्स असतात. रक्त लवकर क्लॉट होण्यास मदत होते. यासाठी फटकी थोड्या पाण्यासोबत उगाळा आणि त्यानंतर जखमेवर लावा. रक्त क्लॉट होण्यास मदत होईल.

मीठ
मीठ हा देखील रक्त रोखण्याचा चांगला उपाय आहे. तोंडातील अल्सरपासून रक्त रोखण्यासाठी मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या पाण्याने आपण गुळण्या करतो त्याचप्रमाणे जखमेतून येणारे रक्त रोखण्यासाठी देखील मीठाचे पाणी उपयुक्त ठरते.

साखर
साखरेत नैसर्गिक अॅँटीसेप्टीक गुणधर्म असतात. यात पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे रक्त क्लॉट होण्यास मदत होते.

मुंबई : पेज थ्री कल्चर जगणाऱ्या सेलिब्रेटी मंडळींचे अनुकरण करणे हे काही आपल्या समाजाला नवे नाही. पण, या उच्चभ्रू मंडळींचे अनुकरण तुम्ही डोळे झाकून करत असाल तर, सावधान. सेलिब्रेटींप्रमाणे हाय हिल्स वापरण्याच्या ट्रेण्डणे सध्या तरूणी आणि महिलांमध्ये जोर धरला आहे. अनेकदा तर, पतीला, बॉयफ्रेण्डला आवडते म्हणूनही हाय हिल्स वापर वापरल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का, हाय हिल्स वापरण्याचा जर अतिरेक झाला तर तुम्हाला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणूनच हाय हिल्स वापरण्यापूर्वी ही माहिती जरूर वाचा.

एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा महिलांमध्ये गर्भधारणेची गती मंदावते.

शारीरिक त्रासांचे आव्हान
डॉक्टरांच्या मते हाय हिल्स वापरणाऱ्या मुली, महिलांचे पायही तितके मजबूत असावे लागतात. जर तुमचे पाय अगदीच लुकडे असतील, तुमच्या पायाच्या टाचाही अगदीच सडपातळ असतील तर, तुम्हाला या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात. कारण, तुमचे ओटीपोट पुढच्या बाजूला झुकते जे कमरेच्या दुखण्याला कारणीभूत ठरते. तुमच्या ओटीपोटात शरीराचे अनेक महत्त्वाचे घटक असतात. पण, तुमचे ओटीपोट जेव्हा पुढच्या बाजूला झुकते तेव्हा त्याचा संघर्ष पोटातील इतर घटकांशी होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता मंदावते. काही केसेसमध्ये तर डॉक्टर महिलांना वांजपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते असेही म्हणतात. हाय हिल्सचा महलांच्या मासिक पाळीशीही संबंध येतो. हाय हिस्समुळे मासिक पाळीचे चक्र बदलते. दरम्यान, हाय हिल्स सतत वापरल्याने कंबरदुखी, खांद्यांचे दुखणे, डोकेदुखी, केस गळणे, पाय दुखणे असा त्रास संभवतो.

कमी वयात अधिक परिणाम
हाय हिल्स वापरण्याची फॅशन आजकाल लहान मुलींमध्येही पहायला मिळते. पण, त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसीक जीवनावरही परिणाम होतो. हाय हिल्स वापरल्यामुळे पायांचे दुखणे, हाडे ठिसूळ होणे, पायांचा, पार्श्वभागाचा आकार बदलणे असा त्रास संभवतो.

Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune
Dr. Maya Golikere
Dr. Maya Golikere
BAMS, Panchakarma General Physician, 2 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Nikhil N  Asawa
Dr. Nikhil N Asawa
MDS, Implantologist Prosthodontist, 6 yrs, Pune
Dr. Ashwini Bhilare
Dr. Ashwini Bhilare
BDS, Endodontist Root canal Specialist, 9 yrs, Pune
Hellodox
x