Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : प्रत्येक मुलीला तिची त्वचा मुलायम आणि नितळ हवी असे वाटत असते. मात्र वयात येताना शरीरात होणारे हार्मोनल बदलांमुळे त्वचेवर अ‍ॅक्ने, व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास उद्भवू शकतो. पिंपल्सपासून सुटका मिळवली तरीही त्याचे डाग आणि खड्डे यामुळे त्वचा खराब आणि निसतेज दिसायला लागते.
चेहर्‍यावरील खड्ड्यांची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्हांला काही घरगुती उपायांची मदत होऊ शकते. हे तुम्हांला ठाऊक आहे का ?

चेहर्‍यावरील खड्डे कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय
बेसनामध्ये दूध, लिंबू आणि दूध मिसळा. या मिश्रणाची पेस्ट त्वचेवर लावल्यास चेहर्‍यावरील खड्ड्यांचा आकार कमी होण्यास मदत होते.

तेलकट त्वचा असणार्‍यांसाठी लिंबूरस आणि मधाचं मिश्रण चेहर्‍यावर चोळल्यास फायदा होतो. दिवसातून 2-3 वेळेस हा उपाय नियमित केल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावरील डाग कमी करण्यास मदत होते.

चेहर्‍यावर नियमित कोरफडाचा गर आणि व्हिटॅमिन ईचं मिश्रण लावल्यास चेहर्‍यावर ग्लो येण्यास मदत होईल. रात्री हे मिश्रण चेहर्‍याला लावून झोपल्यास त्वचेवरील खड्ड्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. सोबतच कांजण्यांचे डाग दूर करण्यासाठीही हा उपाय फायदेशीर ठरतो. नक्की वाचा : कांजण्यांंचे डाग हमखास दूर करतील हे घरगुती उपाय

मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाबपाणी हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सोबतच चेहर्‍यावर खड्ड्यांचा त्रास असल्यास तो आटोक्यात राहतो.

मुंबई : अनेक लोकांना बसल्याबसल्या सतत पाय हलवण्याची सवय असते. खरंतर ही सवय कोणत्या गंभीर आजाराचे संकेत असेल असे सामान्यांच्या लक्षातदेखील येणार नाही. पण ही सवय शरीरात सुरू झालेल्या बिघाडांचे संकेत देत असते. त्यामुळे तुम्हांला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला ही सवय असल्यास त्याकडे काना डोळा करू नका.

सतत पाय हलवण्याची सवय कोणते संकेत देते?
शरीरात आयर्न ( लोह) घटकाची कमतरता निर्माण झाल्यानंतर पाय आपोआप हलण्याची सवय सुरू होते. त्यामुळे रक्तातील आयर्नची पातळी तपासून पहाणं गरजेचे आहे. त्यानुसार आहारात बदलही करावे लागतील.

अनेकांना बसल्याजागी, झोपल्यानंतर पाय हलवण्याची सवय असते. यामागे रेस्टलेस सिंड्रोम हे एक कारण असू शकते. रेस्टलेस सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत पाय हलवणे, सुई टोचल्यासारखे जाणवणे, खाज येणे अशी लक्षण आढळतात.

अमेरिकेत सुमारे 10 % लोकांना हा त्रास होतो. हा त्रास वयाच्या कोणत्याही टप्प्यामध्ये होऊ शकतो. मात्र प्रामुख्याने हा त्रास तरूणांमध्ये आढळत आहे.

गरोदर स्त्रीयांमध्येही शेवटच्या टप्प्यातील तीन महिन्यात हा त्रास आढळतो. मात्र प्रसुतीनंतर महिन्याभरात हा त्रास कमीदेखील होतो.

रेस्टलेस सिंड्रोम हा नर्व्ह सिस्टम म्हणजेच मज्जासंस्थेशी निगडीत असतो. यामुळे पाय हलवण्याची क्रिया सुरू झाली की शरीरात डोपामाईन हार्मोन वाहण्यास सुरूवात होते. या हार्मोनमुळे एक काम पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा होते.

रेस्टलेस सिंड्रोमला स्लिप डिसऑर्डरही म्हणातात.

मुंबई : पूर्वी सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्यानंतर घरात हामखास धूप केला जात असे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते सोबतच मच्छरांचा त्रासही दूर राहण्यास मदत होत असे.
आजकाल संध्याकाळची वेळ झाली की डासांना दूर करण्यासाठी टेबलटॉप मशीन वापरतात. मात्र त्यामधील केमिकल घटकांमुळे अनेकांना अ‍ॅलर्जी, सर्दी,खोकल्याचा त्रास होतो. गरजेनुसार रिपलेंट लिक्विड भरून हिटींग मशीनामध्ये टाकल्यास डास दूर राहतात. मग रिपलेंट लिक्विड घरच्या घरी बनवले तर ? घरगुती आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून नॅचरल रिपलेंट लिक्विड बनवले तर सुरक्षित मार्गाने घरातून डासांना पळवणं शक्य होते.

घरच्या घरी कसे बनवाल नॅचरल रिपलेंट ऑईल?
पूर्वी ज्या घटकांचा वापर धूपाकरिता केला जात असे त्याच घटकांच्या मदतीने आता घरच्या घरी नॅचरल रिपलेंट लिक्विड बनवता येऊ शकते. त्यामुळे पहा कसा बनवाल घरच्या घरी नॅचरल रिपलेंट ऑईल

साहित्य -
रिफीलची एक बॉटल
2 मोठे चमचे कडुलिंबाचे तेल
5 कापराच्या वड्या

कसे बनवाल हे नॅचरल रिपलेंट ऑइल ?
कापराच्या वड्यांची बारीक पूड करा. त्यामध्ये कडुलिंबाचे तेल मिसळून रिफिल बॉटलमध्ये मिसळा. तुमच्याकडे मोठी बॉटल असेल तर नारळाचं तेलही मिसळता येईल. रिफिल बॉटलमध्ये टाकण्यापूर्वी तेल नीट मिक्स करा. कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा कोणताक दुष्परिणाम होणार नाही. कडूलिंबामध्ये जे एन्टीप्रोटोजोल कम्पाऊंड असतात त्यामुळे डास दूर होण्यास मदत होते.

कडुलिंबाच्या तेलाऐवजी तुम्ही टी ट्री ऑईलदेखील मिसळू शकता. सुमारे 15 दिवस एक रिलिफ बॉटर वापरता येऊ शकते. यामुळे आरोग्याचं रक्षण होईल सोबतच पैशांचीही बचत होऊ शकते.

मुंबई : दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.

मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली केमिकलयुक्त उत्पादनांचा परिणाम उलटा आपल्याच आरोग्यावर होतो. संध्याकाळच्या वेळेस बागेत मुलांना खेळायला पाठवताना बाजारात मिळणाऱ्या क्रिम्सचा सर्रास वापर केला जातो. किंवा घरात येणाऱ्या डासांना घरगुती उपायांनी पळवून लावता येऊ शकते. तर बाहेर मिळणाऱ्या विविध उत्पादनांपेक्षा हे सोपे उपाय नक्की करुन पहा...

-डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम ८ तास राहतो.

-घरात कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि १५-२० मिनिटे त्याचा धूर होऊ द्या. डास दूर पळून जातील.

-लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करुन शरीरावर लावा. त्यामुळे मच्छर तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.

-दारात किंवा खिडकीत तुळस असल्यास मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते.

-लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे लसूण किसून
पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.

-लव्हेंडरचा सुगंध खूप तेज असतो आणि डास तिथे फिरकत नाहीत. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनर वापरा.

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच वाढला आहे. उन्हाळ्यात आरोग्याबरोबरच सौंदर्याच्याही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा टॅन होते तसेच केसही धुतल्यानंतर अगदी २ दिवसातच घामामुळे चिकचिकीत होतात. त्यांना वास येऊ लागतो. अनेकदा वारंवार केस धुणे शक्य नसते. मग या लवकर खराब आणि चिकचिकीत होणाऱ्या केसांचे काय करायचे? तर अगदी सोपे आहे. हे घरगुती उपाय करा. त्यामुळे केस लवकर चिकचिकीत होणार नाहीत.

#1. एक कप पाण्यात लिंबाचे काही थेंब घाला. शॅम्पू केल्यानंतर या मिश्रणाने केस धुवा. लिंबातील अॅसिडीक गुणधर्मामुळे केस लवकर चिकचिकीत होणार नाहीत.

#2. अंड्याच्या सफेद भागात लिंबाचे काही थेंब घाला. हे मिश्रण केसांना लावून १५-२० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने केस धुवा. केस मऊ मुलायम होतील.

#3. बेकींग सोडा केस आणि त्वचेच्या समस्यांवर अतिशय फायदेशीर ठरतो. ३ चमचे बेकिंग सोड्यात पाणी घाला आणि हे मिश्रण केसांना मुळांपासून लावा. २० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.

#4. एक कप पाण्यात २ चमचे चहापावडर घालून १० मिनिटे उकळवा. मग ते मिश्रण गाळा. थंड झाल्यावर केसांना लावा. ५-१० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.

Dr. Abhijit Sangule
Dr. Abhijit Sangule
BDS, Dentist, 8 yrs, Pune
Dr. Manoj Deshpande
Dr. Manoj Deshpande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Shrikant Choudhari
Dr. Shrikant Choudhari
MS/MD - Ayurveda, General Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune
Hellodox
x