Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो. अनेकजण या आजाराबद्दल खुलेपणाने बोलत नाहीत त्यामुळे हा आजार गंभीर टप्प्यात पोहचल्यानंतरच त्याकडे गांभिर्याने पाहिले जाते. त्यामुळे मूळव्याधीसारख्या आजाराकडे सुरूवातीच्या टप्प्यातच लक्ष देणे गरजेचे आहे. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी काही टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे.म्हणजे हा त्रास गंभीर टप्प्यांपर्यंत पोहचणार नाही. सोबतच शस्त्रक्रियेसारख्या उपचारांची मदत घ्यावी लागणार नाही. मूळव्याधीच्या रूग्णांंना पेट्रोलियम जेलीचा 'असा' वापर करणं ठरतं फायदेशीर !

मूळव्याधीचा त्रास कसा ठेवाल आटोक्यात?

योग्य आहार -
मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे. संतुलित आणि पोषक आहाराने मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी फायबरयुक्त भाज्यांचा, अन्नपदार्थांचा समावेश वाढवा. आहारात नियमित 50 ग्रॅम फायबर घटक घेतल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करतात. आहारत दोन वाट्या हिरव्या भाज्या आणि किमान दोन फळांचा समावेश करणं आवश्यक आहे. आहारात 'या' भाजीचा समावेश कराल तर दूर होईल 'मूळव्याधी'ची समस्या !

मुबलक पाणी -
बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मुबलक पाणी पिण्याची सवय आवश्यक आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे. पाणी कमी असल्यास डीहायड्रेशनचा त्रास बळावतो. शरीरात पाणी कमी असल्यास आतड्यांमधून पाणी शोषले जाते. परिणामी आतडी, रक्तवाहिन्या शुष्क होतात. त्याचा दाब मलविसर्जनाच्या वेळेस रक्तवाहिन्यांवर येतो. उन्हाळ्यात मुबलक पाणी पिण्याची सवय वाढवतील या ट्रीक्स !

नियमित चाला -
व्यायामाच्या मदतीनेही मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. नियमित काही किलोमीटर चालण्याने मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे गुद्द्वाराजवळील भागातील सुजलेल्या रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होण्यास मदत होते. मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करेल हा एक्सपर्ट डाएट प्लॅन

बद्धकोष्ठतेचा त्रास टाळा -
बद्धकोष्ठतेच्या त्रासातूनच मूळव्याधीचा त्रास वाढतो. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यात बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत असल्यास त्यावर नियंत्रण मिळवा. पोट नियमित साफ होणं गरजेचे आहे. पोट साफ होत नाही? मग रात्री झोपण्यापूर्वी करा 'हे' उपाय

मुंबई : नारळाचं तेल हे अन्नपदार्थ बनवण्यापासून ते अगदी सौंदर्य खुलवण्यासाठी वापरलं जातं. नारळाच्या तेलाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे केवळ केसांच्या वाढीसाठी नव्हे तर या आरोग्यदायी फायद्यांसाठीही नारळाच्या तेलाचा वापर करा.

नारळाच्या तेलामध्ये मेटॅबॉलिझम सुधारण्याची क्षमता आहे. नारळाचे तेल पचायला हलकं आहे. यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. सोबतच पित्ताशयावर आलेला दाब हलका करण्यास मदत होते.

नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. यामुळे चेहर्‍यावरील जंतूचा त्रास कमी करण्यास मदत होते.

नारळाच्या तेलामध्ये अन्न बनवल्यास त्याच्या सेवनाने पचनसंस्थेतील कीटाणूंचा नाश होण्यास मदत होते.

नारळाच्या तेलात फॅटी अ‍ॅसिड असते त्यामुळे त्याच्या सेवनामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होते.

नारळाच्या तेलामुळे त्वचा, केस यांचे पोषण होण्यास मदत होते. शरीरातील वेदना, सूज कमी करण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

नारळाच्या तेलातील मीडियम-चेन ट्रिग्लिसेराइड्स घटक मांसपेशींना मजबुत करण्यास मदत होते. नारळाच्या तेलातील कॅप्रिक अ‍ॅसिड भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळेस मुबलक पाण्यासोबतच आहारात फळभाज्या, फळांचाही योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचे आहे.
कलिंगड, टरबूज, ताडगोळा, शहाळ्याचं पाणी यासोबतच लिची खाणंही आरोग्यवर्धक आहे. लीची हे पाणीदार फळ आहे. सोबतच त्याला एक मंद सुगंध असल्याने उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यवर्धक आहे.

लिचीमध्ये आरोग्यदायी घटक -
लिची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.

तात्काळ मिळते उर्जा -
उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येतो. अशावेळेस लिचीच्या सेवनामुळे त्यामधील नियासिन घटक शरीरातील हिमोग्लोबिन घटक निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.

कॅन्सरशी सामना -
लीचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. सोबतच लीची मधील फ्लेवोनॉईड्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरचा बचाव करण्यास मदत करतात.

वजन घटवण्यास मदत
वजन घटवणार्‍यांसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. कपभर लीचीच्या अर्कामध्ये 125 कॅलरीज असतात. यामध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लिचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कपभर लीचीमध्ये 325 ग्राम पोटॅशियम घटक आढळतात. यामुळे दिवसभरातील 9% गरज पूर्ण होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक्षमता सुधारते
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची हे फळ मदत करते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. नियमित लिचीच्या सेवनामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

सौंदर्य खुलवते
चेहर्‍यावर पिंपल्सचे डाग असतील त्वचा खुलवण्यासाठी लिची खाणं आरोग्यदायी ठरते. लिचीमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अ‍ॅन्टी एजिंगचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

मुंबई : आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो. योग ही अशी साधना आहे ज्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे भूक कमी लागण्याच्या समस्येवरही परिणाम करते. म्हणून जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर ही योगासने नक्की करा.

पवनमुक्तासन
हे आसन भूक वाढवण्यासाठी आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनात ४०-५० सेकंद रहा आणि ४-५ वेळा याची आवर्तने करा.

वज्रासन
रक्तप्रवाह, भूक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी हे उपयुक्त आसन आहे. या आसनात कमीत कमी मिनिटभर रहा आणि रोज करताना हळूहळू वेळ वाढवत न्या.

बद्धकोणासन
भूक न लागण्याची समस्या असेल तर हे आसन करणे फायद्याचे ठरेल. या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन यावर आराम मिळतो. पण हे आसन आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करा. नियमित केल्याने त्यावर पकड येईल.

शशांकासन
या आसनामुळे पोट आणि पोट्याच्या स्नायूंना उत्तम मसाज मिळतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

चिन्मय मुद्रा
या मुद्रेमुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरीत्या होतो. पचनतंत्र सुधारुन भूक वाढवण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. चिन्मय मुद्रा करताना २-३ मिनिटे श्वास घ्या आणि आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या.

मुंबई : जागे असण्याच्या तुलनेत झोपेत अधिक लाळ निर्माण होते. झोपेत आपण तोंडाने श्वास घेत असतो आणि त्यामुळेच झोपेत लाळ गळते. तर काही वेळेस खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून एलर्जी होते किंवा काही औषधांमुळे अधिक लाळ निर्माण होते. झोपत लाळ गळ्याची समस्या तुम्हालाही असेल तर हे घरगुती उपाय त्यावर कामी येतील.

-तोंडातून लाळ गळत असल्यास पचनास खूप वेळ लागणारे अन्नपदार्थ खाण्यापासून दूर रहा. पोट साफ ठेवा. त्याचबरोबर लाळ गळण्याची समस्या असल्यास तुळशीची पाने चावा आणि थोडे पाणी प्या. दोन-तीन वेळा असे केल्याने लाळेपासून सुटका मिळेल.

-रात्री झोपेत लाळ गळल्याने काहीसे लाजल्यासारखे वाटते तर मग फटकीच्या पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे लाळ गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

-लाळ गळण्याच्या समस्येवर आवळा पावडर फायदेशीर ठरते. त्यासाठी जेवल्यानंतर लगेचच कोमट पाण्यात आवळा पावडर घालून प्यायल्याने नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर अॅसिडीटीपासूनही सुटका मिळेल.

Dr. Neeti Gujar
Dr. Neeti Gujar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Dhanraj Helambe
Dr. Dhanraj Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Abhijit Sangule
Dr. Abhijit Sangule
BDS, Dentist, 8 yrs, Pune
Hellodox
x