Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. आज कोणा मैत्रिणीचा साखरपुडा आहे तर उद्या मित्राचं लग्न. घरातही कोणत्या ना कोणत्या नातेवाईकांचे लग्न असतेच. या सगळ्यात प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाऊन मेकअप करणं परवडणारं असतंच असं नाही. अनेकदा फाऊंडेशन, काजळ, लिपस्टिक आणि आयलायनर लावूनही मुली सुंदर दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का बाजारात मिळणारे फाऊंडेशन तुम्ही अगदी काही मिनिटांत घरच्या घरी करु शकता. तुम्ही हजारो रुपये महागड्या फाऊंडेशनसाठी खर्च करता का? तुम्ही जे महागडे मेकअपचे साहित्य वापरता त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी या त्वचेसाठी हानीकारक असतात. पण हेच मेकअपचे साहित्य जर तुम्हाला घरी तयार करता आले तर? चला तर मग घरच्या घरी फाऊंडेशन पावडर कसे तयार केले जाऊ शकते ते वाचू..
साहित्य:
ऑलीव ऑईल
जोजोबा ऑईल
बदामाचे तेल
चेहऱ्याला लावायची पावडर
कोको पावडर
कृती:
चेहऱ्याला लावायच्या पावडरमध्ये कोको पावडर, ऑलीव ऑईल, जोजोबा ऑईल, बदामाचे तेल योग्य प्रमाणात टाका. हे मिश्रण जास्त जाड ही नको आणि जास्त पातळ ही नको. तयार झालेली पावडर बॉक्समध्ये टाकून सेट करा. १० मिनिटांत तयार आहे घरच्या घरी फाऊंडेशन पावडर.

Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Sandeep Patil
Dr. Sandeep Patil
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Dr. Rupesh Khandelwal
Dr. Rupesh Khandelwal
BDS, Dentist, 14 yrs, Pune
Hellodox
x