Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

डायबिटीस आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या गंभीर आजारांचा थेट संबंध डिप्रेशनशी आहे. एका ताज्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, ज्या महिलांमध्ये डिप्रेशनची लक्षणे असतात, त्यांना असे आजार आजार होण्याचा धोका अधिक असतो. या रिसर्चमध्ये महिलांमध्ये आजाराच्या आधी आणि नंतर डिप्रेशनची लक्षणे यावर अभ्यास करण्यात आला.

या रिसर्च टीमचे मुख्य Xiaolin Xu यांनी सांगितले की, 'अलिकडे अनेक महिला अनेक क्रोनिक(दीर्घकाळ राहणारा जुना आजार) आजारांनी पीडित आहेत. डायबिटीस, कॅन्सर, हृदयरोग आजकाल वेगाने वाढत आहेत. आम्ही यावर रिसर्च केला की, डिप्रेशनच्या लक्षणांआधी आणि नंतर हे आजार कसे विकसित होतात'.

या रिसर्चमध्ये सहभागी ४३.२ महिलांना सांगितले की, त्यांच्यात डिप्रेशनची लक्षणे होती. पण यातील केवळ अर्ध्याच महिलांना डिप्रेशन क्लिनिकली डायग्नोज झाला आणि त्यावर उपचार करण्यात आले. डिप्रेशनचे शिकार होण्याआधी या महिलांमध्ये क्रोनिक आजारांचा धोका १.८ टक्क्यांनी जास्त आढळला. डिप्रेशन दरम्यान सुद्धा महिलांमध्ये हे आजार सामान्य महिलांच्या तुलनेत २.४ टक्के जास्त रिक्स बघितली गेली.

या रिसर्चमधून हे आढळून आले की, डिप्रेशन आणि दीर्घकालीन आजारांचा समान जेनेटिक किंवा शारीरिक कारणांशी संबंध आहे. रिसर्चनुसार, शरीरात सूज, डिप्रेशन आणि आजार दोन्हींशी संबंध ठेवतं. डायबिटीस आणि हायपरटेंशनसारखे आजारही डिप्रेशनशी संबंधित आहेत.


(Image Credit : Bridges to Recovery)

या रिसर्चमधून समोर आलेले परिणाम आता मानसिक आणि शारीरिक आजारांवर उपचारासाठी मदत करतील. या रिसर्चमधून ही बाब सुद्धा समोर आली की, ज्या महिलांमध्ये डिप्रेशन आणि आजार दोन्ही गोष्टी होत्या, त्या महिला कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील होत्या. तसेच त्या लठ्ठपणाच्या शिकार होत्या, तंबाखू आणि मद्यसेवन करत होत्या.

डायबिटीस हा आजार बदलत्या लाइफस्टाइलमुळे आणि खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेकांना आपल्या जाळ्यात घेत आहे. पूर्वी हा आजार केवळ अधिक वयाच्या लोकांनाच होतो, असा समज होता. पण आता तर तरूण लोकही या आजाराचे शिकार होत आहेत. असे म्हणतात की, एकदा जर डायबिटीस झाला तर त्यासोबत इतरही अनेक आजारांचा धोका वाढतो. आता तर ही बाब एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, टाइप-२ डायबिटीसने पीडित रुग्णांमध्ये लिव्हरशी निगडीत २ आजार लिव्हर सिरॉसिस आणि लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.

१ कोटी ८० लाख लोकांवर अभ्यास

बीएमसी मेडिसिन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चनुसार, यूरोपच्या डायबिटीक रूग्णांची जेव्हा लेटर स्टेजमध्ये टेस्ट केली गेली, तेव्हा लिव्हरशी संबंधित आजारांमुळे मृत्यूची आकडेवारी फार जास्त आढळली. या रिसर्चमध्ये यूरोपमधील १ कोटी ८० लाख डायबिटीसने पीडित लोकांचा समावेश करण्यात आला होता. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, डायबिटीसने पीडित रूग्णांनी या जीवघेण्या आजारांना टाळण्यासाठी आपल्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे.

प्रत्येक ६ पैकी १ व्यक्तीत गंभीर असते NAFLD

नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीज (NAFLD) पाश्चिमात्य देशातील एक चतुर्थांश लोकांना प्रभावित करते आणि हा लिव्हरशी संबंधित जगातला सर्वात कॉमन आजार आहे. लिव्हरशी संबंधित हा आजार लठ्ठपणा आणि टाइप २ डायबिटीसने फार खोलवर संबंध असलेला आहे. तसा तर NAFLD हा आजार नुकसानकारक नाही, पण प्रत्येक ६ पैकी एका व्यक्तीमध्ये हा आजार गंभीर रूप घेतो. ज्यामुळे लिव्हर इंज्युरी, लिव्हर सिरॉसिक, लिव्हर फेलिअर आणि लिव्हर कॅन्सरचाही धोका असतो.

डोळे, किडनी, हार्टसोबतच लिव्हरवर नजर ठेवण्याची गरज

या रिसर्चमधील एक अभ्यासक नवीद सत्तर म्हणाले की, 'डायबिटीसने पीडित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना खूपसाऱ्या गोष्टींची टेस्ट करणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असते. जसे की, डोळे, किडनी, हार्ट रिस्क. पण या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, लिव्हरकडेही दुर्लक्ष करू नये, नाही तर लिव्हरशी संबंधित आजारांचा धोका अधिक राहतो. सोबतच डायबिटीसच्या रूग्णांनी अल्कोहोल सेवन करणे आणि वजन कमी करण्याकडेही अधिक लक्ष दिलं पाहिजे'.

आजाकाल तणावग्रस्त होत चाललेल्या जीवनशैलीमुळे लाईफ़स्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. यापैकी एक म्हणजे मधुमेह. मधुमेहाच्या रूग्णांना आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहावर पूर्णपणे मात करणं कठीण असले तरीही काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

मधुमेहींसाठी शेपूची भाजी अत्यंत फायदेशीर आहे. शेपूच्या भाजीच्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. शेपूची भाजी ही ओव्याच्या प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे मधुमेहींसोबतच इतर काही आजारांनाही आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

हाडांना बळकटी -
शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास दूर ठेवण्यासाठी शेपू मदत करते.


गॅस कमी होतो -
वातावरणातील बदलांमुळे असेल किंवा चूकीच्या आहार पद्धतीमुळे पोटात गॅस होऊ शकतो. शेपूच्या भाजीमुळे वरंवार होणारा हा गॅसचा त्रास नैसर्गिकरित्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

तोंडाचं आरोग्य जपतं -
शेपूच्या भाजीमुळे तोंडाचं आरोग्य जपण्यासाठीदेखील मदत होते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक हिरड्यांचं आरोग्य जपते. सोबतच इंफेक्शनचा धोका कमी करण्यासही मदत होते.

रोगप्रतिकारशक्ती सुधारते
शेपूच्या भाजीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. शरीरात वाढणार्‍या बॅक्टेरिया, व्हायरसचा धोका कमी होण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास शेपूची भाजी मदत करते.

श्वसनाचा त्रास
शेपूच्या भाजीमध्ये आढळणारे नैसर्गिक स्वरूपातील तेल श्वसन संस्थेचं आरोग्य सुधारायला मदत करतात.

मधुमेहाचं निदान झालं की प्रामुख्याने खाण्या-पिण्यावर बंधन येतात. आहराचं गणित सांभाळलं नाही तर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. मात्र ठराविक वेळेच्या अंतराने काही खाल्ले गेले नाही तरीही त्रास होऊ शकतो. सामान्य लोकांप्रमाणेच मधुमेहींच्या आहारातही योग्य नाश्ता गरजेचा आहे. अनेकदा घाईगडबडीत सकाळी बाहेर पडावं लागत असल्याने अनेकजण नाश्ता टाळतात.

मधुमेहींसाठी सकाळी नाश्ताला आहारात दूधाचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मधुमेहींसाठी दूध फायदेशीर
कॅनडा युनिव्हर्सिटी ऑफ ग्वेल्फ आणी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या एका अभ्यासानुसार नाश्तामध्ये चांगल्या प्रतीच्या प्रोटीनयुक्त दूधाचा समावेश केल्याने मधुमेहींना फायदा होऊ शकतो. या प्रकाशित अहवालानुसार, नाश्त्यामध्ये बदल केल्याने टाईप 2 डाएबिटीजचा त्रासही आटोक्यात ठेवला जाऊ शकतो.


दूधाचा फायदा
नाश्तामध्ये दूधाचा समावेश केल्याने रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

जर्नल ऑफ डेअरी सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार योग्य वेळी दूधाचं सेवन केल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. यामुळे कार्बोहायड्रेटचं पचन हळूहळू होण्यास मदत होते. परिणामी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

भूक लागणं ही एक सामान्य क्रिया आहे. त्याद्वारा शरीरात एनर्जी टिकवून ठेवण्याचं कार्य सुरळीत चालतं. मात्र भूकेचे गणित बिघडणं हे शरीरात काही दोष वाढत असल्याचे लक्षण आहे. डिहायड्रेशन किंवा गरोदरपणात सतत भूक लागू शकते. मात्र तुम्हांला सतत भूक लागत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.

सतत भूक लागण्याची कारण आणि आजार

1. मधुमेह -
भारताला मधुमेहाची राजधानी म्हणतात. मधुमेह हा आजार आबालवृद्धांमध्ये झपाट्याने वाढत आहे. बदलत्या लाईफस्टाईमुळे हा आजार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर बळावण्याचा धोका वाढला आहे. सतत भूक लागणं हे मधुमेहातील एक लक्षण आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

2. इटिंग डिसऑर्डर
बुलूमिया ही एक इटिंग डिसऑर्डर आहे. यामध्ये रूग्ण अनियमितपणे खातात. अति खाल्ल्याने अनेकदा रूग्णांना उलटीचा त्रास होतो.

3.पोटात जंत
पोटात जंत झाल्यास तुम्हांला सतत भूक लागू शकते. कारण जंत परजीवी असतात. अनेकदा ते पोटातील आहारातून मिळणारी पोषकद्रव्यं शोषून घेतात. यामधूनच शरीरात फॅट वाढणं, रक्तातील साखरेची पातळी वाढणं अशा समस्या बळावतात. जंताचा त्रास समूळ हटवण्यासाठी टोमॅटोसोबत 'हा' मसाल्याचा पदार्थ खाणं फायदेशीर

4. औषधं -
काही औषधांमुळेही सतत भूक वाढते. या समस्येला हायपरफेजिया म्हणतात. कोर्टिकोस्टेरोइड्स, साइप्रोफेटेडाइन आणि ट्राईसाइक्लिक अशा अ‍ॅन्टी डिसप्रेसंट औषधांच्या सेवनामुळे अधिक भूक लागू शकते.

5. पीएमएस -
पीएमएस म्हणजेच प्रिमेंस्ट्राईल सिंड्रोमच्या समस्येमध्ये सतत भूक लागणं हे लक्षण आढळते. यासोबतच डोकेदुखी, पोटात मुरडा मारणं, बद्धकोष्ठतेचा त्रास बळावू शकतो.

6. ताण तणाव
ताणतणावामध्ये असणार्‍या व्यक्तीदेखील अनियमितपणे खात असतात. यामुळे त्यांच्यामध्ये सतत खाण्याची इच्छा बळावत राहते. मेंदूवर ताण आल्यानंतर कॉर्टिकोट्रोपिनचा प्रवाह वाढतो. यामधूनच अड्रेनालाइनचं प्रमाणही वाढतं. हे भूकेचं प्रमाण वाढण्याचं एक कारण आहे. ... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो

Dr. Vikas Kumar
Dr. Vikas Kumar
Specialist, Gastroenterologist, Pune
Dr. Nikhil N  Asawa
Dr. Nikhil N Asawa
MDS, Implantologist Prosthodontist, 6 yrs, Pune
Dr. Deodutta Kamble
Dr. Deodutta Kamble
BDS, Dental Surgeon Dentist, 22 yrs, Pune
Dr. Mangesh Khandave
Dr. Mangesh Khandave
DNB, Pediatrician, 17 yrs, Pune
Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Hellodox
x