Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

ताणतणाव हा आजकाल आपल्या जीवनशैलीचा जणू एक भाग झालाच आहे. मात्र अनेकजण या तणावातून बाहेर पडण्यासाठी व्यसनाची मदत घेतात. मद्यपान किंवा सिगारेट पिण्याची सवय आरोग्याला घातक असते. अनेकदा सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम माहित असुनही केवळ व्यसन म्हणून टोबॅकोचं सेवन केलं जातं. कालांतराने आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम दिसून आल्यानंतर अनेकजण भानावर येतात. मग हे टोबॅकॉचं व्यसन दूर कसं करायचं या तुमच्या मनातील प्रश्नावर आयुर्वेदामधील काही घरगुती उपाय मदत करू शकतात.

अश्वगंधा -

अश्वगंधाची पावडर पाण्यात मिसळून प्यायल्याने धुम्रपानाची सवय कमी होण्यास मदत होते.

तुळशीची पानं -

तुळशीची पानं नियमित सकाळी चघळल्याने अनेक व्हायरल इंफेक्शनपासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. सोबतच तुम्हांला सतत धुम्रपान किंवा टोबॅको सेवनाचं व्यसन लागलं असल्यास त्यापासून तुमची सुटका होण्यास मदत होऊ शकते.

मध -

मधाच्या सेवनानेही सिगारेट पिण्याची सवय हळूहळू कमी होते.

त्रिफला -

त्रिफळाचं सेवन तंबाखू आणि धुम्रपानाची सवय आटोक्यात ठेवण्यास मदत करते.

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं -

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याची सवय आरोग्याला फायदेशीर आहे. अनेक आजारांपासून तुमची सुटका करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितावह आहे. परंतू टोबॅकोचं सेवन आटोक्यात ठेवण्यासही मदत होणार आहे.

द्राक्षांच्या बीयांचा अर्क -

द्राक्षाच्या बीयांचा अर्क फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. धुम्रपानाच्या सवयीमुळे फुफ्फुसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा त्रास टाळण्यासाठी द्राक्षांच्या बीयांचा अर्क मदत करतो.

दालचिनी -

गोड- तिखट चवीची दालचिनी इन्फेक्शनचा त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सिगारेट ओढायची इच्छा झाल्यास दालचिनीची एखादी काडी चघळा. यामुळे हळूहळू तुमचं व्यसन कमी होण्यास मदत होईल.

ओवा -

धुम्रपानाची इच्छा झाल्यास ओव्याचे काही दाणे चघळा. यामुळे तुमची धुम्रपानाची सवय कमी होईल. अवघ्या 2 दिवसात तंबाखू, गुटख्याचं व्यसन कमी करायला मदत करेल 'हा' घरगुती उपाय.

- मुक्ता गुंडी
उन्हातान्हात लहानगं पोर कमरेला बांधून कुणी एक बाई सिमेंटची जड पोती वाहून नेण्याचं काम करीत असते. तिच्या तोंडात असते तंबाखू. एक रुपयाला मिळणारा खर्रा अजून एका पुडीत बांधून तिनं तो कमरेला खोचलेला असतो. दिवसाकाठी कसेबसे सत्तर रुपयेसुद्धा मिळवणं कठीण जात असताना या बायका तंबाखूवर रोजचा खर्च का करतात? भारतातल्या सुमारे ७० दशलक्ष बायकांमध्ये आढळून येणारं हे व्यसन केवळ एक ‘वाईट सवय’ म्हणून हिणवायचं की इतक्या साऱ्या बायका मुळात या सवयीकडे का खेचल्या जात आहेत हे शोधून काढायचं? २०१६ साली भारतीय शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तंबाखूवरील एका महत्त्वाच्या अहवालामध्ये एक धक्कादायक बाब दिसून आली. भारतातील आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील बहुतांश बायका भूक मारण्यासाठी तोंडात तंबाखू चघळत ठेवतात. तंबाखू अथवा खर्रा, मावा यासारखे तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये असलेल्या निकोटिन नावाच्या द्रव्यामुळे मेंदूतील भुकेची जाणीव करून देणाºया पेशी दबलेल्या राहतात.

रोजची भाकर मिळण्याची शाश्वती नसलेल्या बायकांना हा अघोरी मार्ग निवडण्यावाचून पर्याय राहात नाही, असे हा अहवाल सूचित करतो. या अहवालामुळे बायकांमधील धूरविरहित तंबाखूची व्यसनाधीनता समजून घेताना खूप मोठ्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येतं. काही बायकांना अतिकष्टाची कामं करावी लागतात, काहीना घरातील ताण अन् कटकटी यांना तोंड द्यायचं असतं, काहीना दारूड्या नवºयाची सोबत मान्य करावी लागते तर काहीना शरीराची दुखणी विसरत घरकाम करावं लागतं. यावर तंबाखू हा अर्थातच उपाय नाही तर दैनंदिन आयुष्यात सामाजिक-आर्थिक प्रश्नांना तोंड देताना बायकांना त्यांच्या आरोग्याशी करावी लागणारी तडजोड आहे. धूरविरहित तंबाखू ही अनेक स्वरूपांमध्ये वापरली जाते. मावा, खर्रा, दातांना लावण्याची पेस्ट, माशेरी पावडर, तंबाखूयुक्त पान अशा वेगवेगळ्या प्रकारची तंबाखू खेड्यापाड्यामध्ये सहज आणि स्वस्तात उपलब्ध असते. बिडी अथवा सिगारेट या स्वरूपात तंबाखूचं सेवन करणा-या स्त्रियांचं प्रमाण भारतात सुमारे २ टक्के इतकं आहे.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे स्त्रियांमध्ये तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जवळजवळ आठ पटींनी जास्त असते तर हृदयविकार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा २ ते ४ पटींनी जास्त असते. तंबाखूचं व्यसन लागलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची शक्यता जास्त असते. तसेच तरुण वयात तंबाखूची सवय लागलेल्या बाईला गरोदरपणात अचानक तंबाखूची सवय मोडणं शक्य होत नाही. यामुळे गरोदरपणातील आजार वाढतात, जन्मलेलं मूल अपुºया वजनाचं जन्माला येतं. या आरोग्य समस्यांमुळे स्त्रियांना समाजाकडून सहन करावी लागणारी अवहेलना, त्रास यांचा समावेश तंबाखूमुळे होणा-या नुकसानीच्या गणनेत कुठेच होत नाही !

तंबाखूची सवय लागण्याचं वय भारतीय स्त्रियांमध्ये १५ ते १७ वर्षं इतकं आहे. घरात आई किंवा शाळेत बाई जर तंबाखू वापरत असतील तर मुलींना त्याची सवय लागण्यात कदाचित काही वावगं वाटत नाही, इतकी तंबाखू आपल्या संस्कृतीमध्ये घट्ट रु जून बसली आहे . व्यसनमुक्तीच्या धोरणांमध्ये स्त्रियांचा, विशेषत: आर्थिकदृष्ट्या कमजोर गटातील स्त्रियांचा विशेष विचार होणं अतिशय गरजेचं आहे.
गावपातळीवरील स्त्रियांपर्यंत तंबाखूमुक्त होण्यासाठी व्यसनमुक्तीच्या ज्या सुविधा पोहोचायला हव्यात त्या पोहोचत नाहीत. एकदा व्यक्ती व्यसनाधीन झाली की व्यक्तीच्या शरीराकडून ‘निकोटिन’साठी निर्माण होणारी गरज इतकी तीव्र असते की ‘तंबाखू आरोग्यास धोकादायक असते’ असा संदेश त्यापुढे फारच फिका पडतो. स्त्रियांना त्यांच्या समस्यांची गुंतागुंत लक्षात घेऊन व्यसनमुक्तीसाठी मदत करणारी मैत्रीपूर्ण केंद्र गावपातळीपर्यंत असणं गरजेचं आहे. दिल्लीसारख्या १.५ कोटी लोकसंख्या असणाºया महानगरातसुद्धा केवळ तीनच सरकारी तंबाखू व्यसनमुक्ती केंद्रं आहेत. त्यातून ही केंद्रं मनोविकार विभागाच्या अंतर्गत असल्यानं लोक जाणं टाळतात.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात ‘सर्च’, ठाणे येथे ‘इन्स्टिट्यूट आॅफ सायकोलॉजिकल हेल्थ’ आणि पुण्यातील ‘मुक्तांगण’ यांसारख्या संस्था व्यसनमुक्तीकरिता काम करीत आहेत. परंतु या समस्येशी दोन हात करायला फार मोठ्या यंत्रणेची गरज आहे. तसेच या यंत्रणेचा दृष्टिकोन पुरेसा व्यापकही असायला हवा. ज्या देशातील लाखो स्त्रिया भूक मारण्यासाठी तंबाखूच्या आहारी जातात, त्या देशाच्या तंबाखू नियंत्रण धोरणामध्ये निम्न आर्थिक गटातील स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कोणतीही विशेष तरतूद नसावी, हे खेदजनकच !

मुंबई : तंबाखूचं व्यसन जीवघेणं आहे. सिगारेट किंवा तंबाखू खाण्याच्या सवयीमुळे कॅन्सरसारखा दूर्धर आजार जडण्याची शक्यता बळावते. सिगारेटच्या व्यसनामुळे अनेक लोकं कॅन्सर, हृद्यविकारासारख्या गंभीर आजाराच्या विळख्यात अडकतात.

भयंकर इन्फोग्राफिक
सिगारेटचे व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करायला सरकारही अनेक प्रयत्न करत आहे. सिगारेटमुळे शरीराची होणारी अवस्था दाखवण्यासाठी सिगारेटच्या पाकिटावरही कुरूप चित्र रेखाटलेले असते. आता या जोडीला सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी एक सकारात्मक पाऊल उचलले जाणार आहे.

टोल फ्री नंबर
तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी 1 सप्टेंबर 2018 पासून एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. 1800-11-2356 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तंबाखूचं व्यसन सोडण्याचे मार्ग सांगितले जाणार आहेत. व्यसन सोडण्यासाठी हा एक सकारात्मक मार्ग असल्याने त्याकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.

सर्वेक्षण काय सांगते ?
जीएटीएस-2, 2016-17 च्या अहवालानुसार, 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांमध्ये तंबाखूंचं सेवन करणार्‍यांमध्ये 61.9 % लोकं सिगारेट, 53.8% बीडी आणि 46.2 % लोकं धुर विरहित तंबाखूचं सेवन करतात. मात्र या लोकांनी पॅकेटवर असलेल्या चित्राला, आरोग्यासंबंधी असलेल्या धोक्याला वेळीच जाणून ते व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

वेबसाईटवर माहिती
टोल फ्री नंबरची अधिसूचना आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. लवकरच भारतील प्रादेशिक भाषांमध्ये, त्यांच्या मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. 1 सप्टेंबरपासून हा संदेश लागू होणार आहे.

Dr. Mayur Narayankar
Dr. Mayur Narayankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Vijay Jagdale
Dr. Vijay Jagdale
BHMS, Homeopath, 10 yrs, Mumbai
Dr. Tushar D Tarwate
Dr. Tushar D Tarwate
BDS, 11 yrs, Pune
Dr. Meghana Karande
Dr. Meghana Karande
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 1 yrs, Pune
Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Hellodox
x