Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

सकाळच्या चांगल्या सवयी सगळेच सांगतात. काही लोक तर गोंधळून जातात. त्यांना समजतचं नाही की, सकाळच्या चांगल्या सवयी म्हणजे नेमकं काय? तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुम्हाला हैराण होण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सकाळच्या अशा चांगल्या सवयींबाबत सांगणार आहोत, ज्या तुम्हाला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर सवयींनुसार ही कामं केली तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत होते.

सकाळच्या वेळी काही कामं सतर्क राहून केली तर वजन नियंत्रणात राहतं. सकाळच्या या चार सवयी आहेत, ज्या तुम्हाला शरीराच्या समस्यांपासून आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत करतात. आता तुम्हाला वाटत असेल की, या सवयी अंगीकारण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल किंवा फार कष्ट करावे लागतील. तर असं काहीच नाही. या सवयी फार सोप्य आहेत. तुम्हाला सवयींचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर त्यांना नियमित काटेकोरपणाने फॉलो करावं लागेल. सकाळची वेळ सूर्यकिरणांसोबत नवीन ऊर्जा घेऊन येतो आणि तो अनेक प्रकारची पोषक तत्व वाढविण्यासाठीही काम करतात.

सूर्याची किरणं

दररोज सकाळी अंथरून सोडल्यानंतर थोडा वेळ उन्हामध्ये उभं राहा. खासकरून सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत जर तुम्ही ऊन्हामध्ये जात असाल तर शरीराला ऊर्जा मिळते. तसेच मूडही उत्तम राहतो. एका संशोधनानुसार, ज्या व्यक्ती दररोज सकाळी सूर्यप्रकाशात उभे राहतात. त्यांचं बॉडी मास इंडेक्स उत्तम राहतं. त्यामुळे सकाळच्या चांगल्या सवयींमध्ये तुम्ही या सवयीचा प्रामुख्याने समावेश करणं फायदेशीर ठरतं.

व्यायाम करा

कोणत्याही वेळी एक्सरसाइज करणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म ठिक करण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे वजन कमी होतं. जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटत असेल तर एक्सरसाइज केल्यामुळे तुमचा मूड उत्तम होतो. तसेच अस्वस्थताही दूर होते.

नाश्ता

अनेक संशोधनांनुसरा, ज्या व्यक्ती नाश्ता करत नाहीत. त्यांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. परंतु नाश्ता केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतं. यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्मची प्रक्रिया सुरळीत होते आणि मूड चांगला राहतो. याव्यतिरिक्त रक्तामध्ये ग्लूकोजचं प्रमाण संतुलित करण्यासाठीही मदत होते.

नाश्त्यासाठी अंडी, केळी एवोकाडो खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरतं. सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही जे पदार्थ खाता. त्यांच्यासाठी व्हिटॅमिन आणि पोषक त्व वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

स्ट्रेचिंग करा

जसं तुम्ही सकाळी उठता तेव्हा थोडीशी स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरतं. तुम्ही तुमचा दिवस चांगला व्यतित करण्यासाठी सकाळी उठून स्ट्रेचिंग करणं आवश्यक असतं. खासकरून गुडघे आणि मणक्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक्सरसाइज करणं फायदेशीर असतं.

वरील सर्व गोष्टींचा सकाळच्या सवयींमध्ये समावेश करा. वजन कमी होण्यासोबतच आरोग्य उत्तम राखण्यासाठीही करतात मदत.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

करिना कपूर, दीपिका पादुकोन आणि सारा अली खान या बॉलिवूड अभिनेत्रींचे सोशल मीडियात नेहमीच पायलेट्स एक्सरसाइज करतानाचे फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पायलेट्स एक्सरसाइज चांगलीच ट्रेन्डमध्ये आहे. बॉलिवूड अभिनेत्री ही एक्सरसाइज अधिक फॉलो करतात. पायलेट्स वर्कआउटने वेट लॉससोबतच फॅट लॉस आणि बॉडी टोनिंगसाठी मदत मिळते. महिला जर हा वर्कआउट फॉलो करतील तर त्यांच्या लोअर बॉडीतील फॅट कमी होईल.

मांसपेशी मजबूत करण्यासाठी पायलेट्स एक्सरसाइज फार चांगली मानली जाते. पायलेट्स एकप्रकारे बॉडी बिल्डींगची एक टेक्निक आहे. जी मांसपेशी आणि श्वास घेण्याची प्रक्रिया स्ट्रॉंग करते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत या एक्सरसाइजचे फायदे.

कशी करतात ही एक्सरसाइज?

एक्सरसाइज सिस्टीम जर्मन एक्सपर्ट जोसफ पायलेट्स ने वर्ष १८८३ मध्ये डेव्हलेप केली होती. याच्या वेगवेगळ्या टेक्निक असतात. चला जाणून घेऊ कशी करतात ही एक्सरसाइज.

स्टॅंडिंग रोल डाउन

सरळ उभे राहून श्वास घेत दोन्ही हात वर घ्या. नंतर श्वास सोडत पुढच्या बाजूने वाकावे. यावेळी पाठ समांतर असावी. आता हात आणि शरीराचा पुढचा भाग सरळ करून मागच्या बाजूने खुर्चीवर बसल्याच्या स्थितीत या. नंतर सरळ उभे रहा आणि हात बगलेत घ्या. ही एक्सरसाइज कमीत कमी ३ वेळा करा.

थाई स्ट्रेच

पाय फोल्ड करून गुडघ्यांवर बसा आणि डोक्यापासून पायांपर्यंत शरीर सरळ ठेवा. नंतर तुमचे दोन्ही हात खांद्याच्या समोर सरळ करा. दोन्ही हात खाली करा आणि शरीराचा वरील भाग मागच्या बाजूने ४५ डिग्रीपर्यंत वाकवण्याचा प्रयत्न करा. ही एक्सरसाइज ५ वेळा करा.

बल लेग स्ट्रेच

जमिनीवर चटई टाकून सरळ झोपा आणि मान जमिनीपासून थोडी वर उचला. नंतर दोन्ही हात मागच्या बाजूने घ्या. आता पाय गुडघ्यापासून वाकवून छातीजवळ घ्या आणि दोन्ही हातांनी पाय पकडा. नंतर आधीच्या स्थितीत परत या. ही एक्सरसाइज ५ वेळा करा.

काय होतात फायदे?

1) नियमितपणे पायलेट्स एक्सरसाइज केल्याने तुम्हाला काही आठवड्यात स्तनांच्या आकारात परिवर्तन बघायला मिळेल.

२) पायलेट्समध्ये ब्रिदींग एक्सरसाइजचाही समावेश असतो. ज्याने फुप्फुसं आणि रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

३) पायलेट्समुळे शरीराची एनर्जी लेव्हल वाढते, तसेच मेंदू आणि मसल्समध्ये ताळमेळ बसवण्यासाठीही पिलाटे एक्सरसाइज करायला हवी.

४) जर तुम्हालाही मांसपेशी आकर्षक आणि मजबूत करायच्या असतील तर पायलेट्स एक्सरसाइज चांगला पर्याय आहे. ही एक्सरसाइज केल्याने तुमच्या मसल्स बारीक, लांब आणि आकर्षक दिसतील.

५) जर तुम्हाला समोर आलेलं पोट कमी करायचं असेल तर ही एक्सरसाइज चांगला पर्याय आहे. ही एक्सरसाइज कमी करून काही आठवड्यात तुम्ही पोट कमी करू शकता.

६) रोज ४५ मिनिटांची एक्सरसाइज करून तुमचा मेंदूही फिट राहील. त्यासोबतच नियमितपणे ही एक्सरसाइज केल्याने तणाव, टेन्शन आणि स्ट्रेसची समस्याही दूर होते.

आजकालच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमध्ये वजन वाढणं एक सामान्य बाब आहे. वजन वाढू नये यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहारासोबतच नियमितपणे एक्सरसाइज करणे महत्त्वाचे आहे. पण हे सगळं करूनही काही लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. मुळात शरीराचं वजन संतुलित ठेवण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित होणं गरजेचं असतं. तुम्ही तुमचं शरीर स्लिम ठेवण्यासाठी काहीही करा, पण जर तुमची पचनक्रियाचं योग्यप्रकारे होत नसेल तर तुमचं वजन वाढणार आहेच. चला जाणून घेऊ पोटासंबंधी अशा समस्या ज्यांमुळे वजन वाढतं.

अ‍ॅसिड रिफ्लक्स

अ‍ॅसिड रिफ्लक्सला गॅस्ट्रोओसोफेजिअल रिफ्लक्स आजार नावानेही ओळखलं जातं. ही समस्या झाल्यावर छातीच्या खालच्या भागात जळजळ आणि वेदना होतात. यात होतं असं की, अ‍ॅसिड ओसोफेगसमध्ये परत जातं. जेवण केल्यानंतर जेवण आणि लाळ मिळून अ‍ॅसिडचा प्रभाव काही वेळात नष्ट करतात. पण जेवण पचल्यानंतर अ‍ॅसिडचं उत्पादन पुन्हा वाढू लागतं. यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा निर्माण होते आणि यानेच वजन वाढू लागतं.

अल्सर

अल्सर सामान्यपणे छोट्या आतड्या किंवा पोटाच्या आतील भागात होते. याने जास्त प्रमाणात अ‍ॅसिडची निर्मिती होते. अ‍ॅसिड रिफ्लक्सप्रमाणेच जेवण केल्यानंतर अल्सरपासून थोडा आराम मिळतो. पण याने पुन्हा भूक लागते आणि अधिक प्रमाणात खाल्ल्यावर अर्थातच तुमचं वजन वाढतं.

बॅक्टेरिया

आपल्या आतड्यांमध्ये चांगले आणि खराब असे दोन्हीप्रकारचे बॅक्टेरिया आढळतात. चांगले बॅक्टेरिया सूज करण्यास मदत करतात. पण जेव्हा आतड्यांमध्ये बॅक्टेरियांची संख्या वाढते, तेव्हा वजन वाढू लागतं. हे बॅक्टेरिया मेथेन गॅसची निर्मिती वाढवतात आणि छोट्या आतड्यांच्या प्रक्रियांना हळुवार करतात, ज्यामुळे मेटाबॉलिज्म संथ होतं. आणि याचा प्रभाव तुमच्या इन्सुलिन आणि लेप्टिनवरही पडतो. ज्यामुळे भूक अधिक लागते आणि यामुळेच वजन वाढतं.

इरिटेबल बॉवेल सिंड्रोम

ही आतड्यांशी संबंधित सर्वात कॉमन समस्या आहे. जेवणाची संवेदनशीलता आणि चांगल्या बॅक्टेरियाच्या असंतुलनामुळेच पचनासंबंधी समस्या निर्माण होते. या कारणाने पोटात सूज होऊ लागते आणि हेच वजन वाढण्याचं कारण ठरतं.

जुना आजार

एखाद्या जुन्या आजाराने ग्रस्त व्यक्तीला उपचाराआधी स्टेरॉइड दिलं जातं. या कारणाने अधिक कार्बोहायड्रेटयुक्त आहार करण्याची इच्छा निर्माण होते. आणि अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेट घेतल्याने वजन वाढतं.

वजन कंट्रोल करण्यासाठी लोक फक्त जिममध्येच जात नाहीत, तर अनेक घरगुती उपायही ट्राय करतात. कारण यामुळे शरीराला काही नुकसान होत नाही आणि हे परिणामकारकही ठरतात. त्याशिवाय यांचे काहीच साइड इफेक्ट नसतात. पण वजन कमी करण्यासाठी सब्जा अत्यंत फायदेशीर ठरतो.

खरं तर सब्जा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फक्त प्रोटीनच नाही तर फायबर, ओमेगा-3 फॅट्स मुबलक प्रमाणात असतात. जे मेटाबॉलिज्मला बूस्ट करण्यासाठी, भूक शांत करण्यासाठी आणि फॅट्स बर्न करणारे मोठे हार्मोन्स म्हणजेच, ग्लूकागोन (Glucagon) वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळेच हे वजन कमी करण्यासाठी सुपर फूड्स समजले जातात.

2015मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, दररोज 30 ग्रॅम फायबरचे सेवन केलं तर तुमचं वजन वेगाने कमी होतं आणि 2 चमचे सब्जामध्ये 10 ग्रॅम फायबर असतं. आज आपण जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी सब्जाचं सेवन कसं करावं त्याबाबत...

वेट लॉस ड्रिंक तयार करण्याची पद्धत...

साहित्य :

एक कप पाणी
एक चमचा सब्जा
दोन चमचे लिंबाचा रस
दोन चमचे मध

वापर करण्याची पद्धत :

सर्वात आधी एक कप पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा सब्जा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी यामध्ये मध आणि लिंबाचा रस एकत्र करून रिकाम्यापोटी याचं सेवन करा. तुम्हाला गरज असेल तर मध-लिंबाचा रस न वापरता याचं सेवन करू शकता. फक्त तुम्हाला याच्या अर्ध्या तासानंतर कोणत्याही पदार्थाचं सेवन करू नका. यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर इतरही अनेक फायदे होतात.

15 दिवसांमध्ये कमी होतं वजन

लक्षात ठेवा की, हे ड्रिंक सलग प्यायल्यावे 15 दिवसांमध्ये 2 ते 4 किलो वजन कमी करणं सहज शक्य होतं. परंतु जेव्हा तुम्ही यासोबत थोडासा व्यायाम आणि डाएटमध्ये गोड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाणं बंद करणं आवश्यक असतं.

सब्जाचे इतर फायदे :

सूज दूर करतं

सब्जाच्या नियमित सेवनाने इनफ्लामेशन म्हणजेच सूजेवर नियंत्रण राहतं. ही सूज शरीराच्या अनेक समस्यांचं कारण ठरू शकते.

कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण

सब्जामध्ये ओमेगा-3 मोठ्या प्रमाणावर असतं, ज्यामुळे हृदय किंवा कोलेस्ट्रॉल संबंधी समस्या दूर होतात.

कॅन्सरपासून बचाव

सब्जाच्या बियांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरामधून फ्री रॅडीकल्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात आणि फ्री रॅडिकल्सचा थेट संबंध हृदय रोग किंवा कॅन्सरशी होऊ शकतो.

तापमान कंट्रोल करण्यासाठी

सब्जा शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवतो. यामध्ये अस्तित्वात असलेलं लोह, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम आपली ताकद वाढविण्यासाठी मदत करतं.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.

ज्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असतं, त्यांना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच अशा व्यक्ती वजन कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. खरं तर वजन कमी करणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. एक्सरसाइज, डाएटिंग, तासन्तास जिममध्ये वर्कआउट करणं, योगाभ्यास आणि बाजारात मिळणाऱ्या वजन कमी करण्यासाठी असणाऱ्या औषधांचं वारेमाप सेवन यांसारख्या गोष्टी ते सतत करत असतात. परंतु, वजन काही कमी होत नाही. अशातच अनेक लोक निराश होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? लवकरात लवकर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवत आहात...

लवकर वजन कमी केल्याने शरीराला होणारे नुकसान :

डिहाइड्रेशन

वेटलॉस करण्याच्या प्रयत्नात जे डाएट फॉलो करण्यात येतं. त्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतं. शरीरामधील पाण्याची पातळी कमी झाल्याने बद्धकोष्ट, डोकेदुखी, स्नायूंच्या समस्या आणि एनर्जी कमी होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. पाण्याची कमतरता झाल्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो. तसेच त्वचा ड्राय होते.

शरीरामध्ये न्यूट्रिशनची कमतरता

वजन कमी करण्यासाठी लोक नेहमी कॅलरी फ्री डाएटचा आहारात समावेश करतात. ज्यामुळे शरीरामध्ये न्यूट्रिशन्सची कमतरता भासते. किटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेट नसतं. जे शरीराला एनर्जी देण्यासाठी मदत करतं. याच कारणामुळे ज्या लोकांच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेटची कमतरता असते, त्यांना लगेच थकवा जाणवतो. अशा लोकांचा मूडही लगेच स्विंग होतो. तसच काही लोकांमध्ये रक्ताची कमतरता जाणवते.

मेंदूवर होतो विपरित परिणाम

वेट लॉसमुळे शरीरासोबत मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होतात. डाएट बिघडल्याने आणि शरीरामध्ये न्यूट्रिशन्सची कमतरता झाल्याने अनेक प्रकारच्या मानसिक समस्या होऊ शकतात.

बिघडू शकतं मेटाबॉलिज्म

अनेकजण लठ्ठपणाने वैतगलेले असतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ते एवढे वैतागलेले असतात की ते विसरून जातात की, वजन कमी केल्याने मेटाबॉलिज्वर विपरित परिणाम होतो. डाएटमध्ये कॅलरीती कमतरता असल्याने मेटाबॉलिज्म निष्क्रिय होतं. मेटाबॉलिज्म व्यवस्थित काम करत नसल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं.

स्नायू कमजोर होतात

वजन कमी करण्यासाठी असलेल्या डाएटमध्ये अनेकदा स्नायू कमकुवत होतात. बराच वेळ डाएटचं सेवन स्नायूंसाठी ठिक नसतं.

टिप : वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Dr. Rohit Kamate
Dr. Rohit Kamate
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 4 yrs, Pune
Dr. Vijay Satav
Dr. Vijay Satav
MD - Allopathy, Clinical Pathologist, 23 yrs, Pune
Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Hitendra Ahirrao
Dr. Hitendra Ahirrao
BAMS, Family Physician General Physician, Pune
Hellodox
x