Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

गर्भावस्थेत बाळाची हालचाल आणि तब्बेत जाणून घेणं ही प्रत्येक आईची तळमळ असते. गर्भावस्थेत बाळाची हालचाल जाणून घेण्यासाठी प्रत्येकवेळी आईला डॉक्टरांवर अवलंबून रहावं लागतं. अनेकदा गर्भावस्थेत महिलेला बाळाचा हालचाल न झालेली किंवा गर्भावस्थेतच बाळ दगावलं तरी त्याची जाणीव होत नाही. अशावेळी या महिलेला तिच्या गर्भातील गर्भाची माहिती मिळावी अशी सोय झाली आहे.

आजा जन्माला न आलेल्या बाळाची तब्बेत किंवा स्वास्थ डॉक्टरकडे न जाता समजू शकणार आहे. संशोधकांनी आता एक असं सेन्सर तयार केलं आहे की, ज्यामध्ये गर्भवती महिला आपल्या घरीच आपल्या गर्भाच्या हृदयाचे ठोके पाहू शकणार आहे. यावरून आईला बाळाची गर्भातील अवस्था कळणार आहे.

ब्रिटनच्या ससेक्स विद्यालयातील हे संशोधन आहे. या सेन्सरद्वारे गर्भवती महिलेला बाळाच्या हृदयातील ठोके आणि त्याला जन्मजात असलेल्या त्रासाबद्दल कळणार आहे. याद्वारे बाळाची प्री - मॅच्युअर डिलीवरीची आवश्यकता असली तरीही त्याची माहिती मिळणार आहे.

गर्भवती महिलेला अशा सेन्सरचा फायदाच होणार आहे. ज्या महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय रिस्क फॅक्टर असलेला आजार ज्या महिलांना याचा त्रास होत आहे. त्यांच्याकरता हे सेन्सर अतिशय फायदेशीर आहे. गर्भावस्थेत त्या गर्भाचं योग्य परिक्षण केलं जाणं शक्य आहे.

अशी करू शकता पाहणी

संशोधनकर्त्यांनी दावा केला आहे की, नवीन इलेक्ट्रोमीटर आधारित असलेल्या एम्पलीफायर प्रोटोटाइपला इलेक्ट्रिक पोटेंशिअल सेंसिंगच्या आधारे तयार करण्यात आळं आहे. ज्याद्वारे गर्भातील बाळाची तपासणी करता वापरले जाणार आहे. गर्भवती महिला या उपकरणाला आपल्या पोटावर ठेवून गर्भातील भ्रूणाच्या इलेक्ट्रो कार्डियोग्रामवर नजर ठेवण्यात मदत होईल.

उपवासाचे दिवस सुरू झाले की हमखास घराघरामध्ये साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याच्या पदार्थांपासून बनवलेले पदार्थ केवळ पोटभरीसाठी नव्हे तर आरोग्यालाही फायदेशीर आहेत. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. प्रामुख्याने गरोदर महिलांच्या आहारात साबुदाण्याच्या समावेशामुळे बाळाच्या हाडांना मजबुती मिळण्यास मदत होते.

उर्जेचा स्रोत
साबुदाण्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. साबुदाण्यातील कार्बोहायड्रेट घटक गरोदरपणातील थकवा कमी करण्यास मदत करतो.

वजन वाढवणं
100 ग्राम सुक्या साबुदाण्यातूनही शरीराला सुमारे 355 कॅलरीज उर्जा मिळते. यामध्ये 94 ग्राम कार्बोहायड्रेट्स आढळतात. गरोदरपणात वजन कमी असणार्‍यांमध्ये साबुदाण्याचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे जन्माच्या वेळेस बाळाचं वजन योग्य राहण्यास मदत होते.


हाडांना मजबुती
गरोदरपणाच्या काळात महिलांना संतुलित आहार घेणं आवश्यक असते. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात.यामुळे हाडं मजबुत होतात.

गरोदरपणात फायदेशीर
साबुदाण्यात फॉळिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. सोबतच व्हिटॅमिन बी मुबलक असते. यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते. बाळाच्या गर्भातील विकासासाठी आवश्यक घटक मिळतात.

रक्तदाब
साबुदाण्यामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामधील पोटॅशियम घटक रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबाचा, हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

गरोदरपणाचा काळ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत नाजूक असतो. या दिवसात स्वतः स्त्री आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तीदेखील तिची फार काळजी घेतात. मात्र स्त्रियांच्या शरीरात कळत नकळत अशा काही गोष्टी घडत असतात की त्याचा परिणामही होऊ श्कतो याकडे अनेक स्त्रिया, तिच्या आजुबाजूच्या व्यक्ती, परिवारातील मंडळींसाठी नवा असतो.

गरोदरपणाच्या काळात शरीराच्या अवयवांमध्ये होणारे बदल, मॉर्निंग सिकनेस, उलट्या या लक्षणांसोबतच मूड स्विंग्सही होतात. महिलांमध्ये हे मूड स्विंग्स होण्यामागे अनेक कारणं आहेत.

का होतात गरोदर स्त्रीयांमध्ये मूड स्विंग्स ?
मूड स्विंग्स होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात झपाट्याने होणारे बदल.


गरोदरपणाच्या काळातील फिजिकल डिसकम्फर्ट

गरोदरपणाच्या काळात विविध टप्प्यांवर वाढणारी भीती

काही स्त्रियांमध्ये मूड स्विंग्स हे अत्यंत वेगाने होतात. बघता बघता हसणारी स्त्री रडायला लागते असे अनेकींचे अनुभव आहेत.

कशी कराल मूड स्विंग्सवर मात ?
1. झोप
गरोदरपणाच्या काळात झोपेशी कधीच तडजोड करु नका. या काळात शरीरात होणारे बदल, सतत वॉशरूमला जाणं, वाढतं वजन, थकवा यामुळे झोप अत्यंत गरजेची आहे.

झोपताना फार काळ त्रासदायक स्थितीत पडू नका. दिवसभरात सुमारे 8-10 तास आराम करणं आवश्यक आहे.

दुपारच्या वेळेस पॉवर नॅप घ्या. यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. विकेंडला पुरेसा आराम करा.

2. साथीदाराशी बोला
तुमच्या इतकाच तुमचा साथीदारदेखील भविष्यात काय होईल याची काळजी करत असतो. त्यामुळे तुमच्यावरीण ताण एकटेच विचार करून वाढवण्यापेक्षा बोलून तो कमी करण्याचा प्रयत्न करा.

3.गरोदर स्त्रीयांशी, मैत्रिणींशी बोला
तुमच्या आजुबाजूला, नात्यामध्ये, मित्रपरिवारामध्ये गरोदर स्त्रिया असल्यास त्यांच्याशी बोला. तुमची भीती कमी होण्यास मदत होईल. त्यांच्यांसोबत काही वेळ घालवा, फिरायला जा. यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल.

उत्तम आरोग्यासाठी सर्व पोषकघटक योग्य प्रमाणात शरीराला मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. पोषकघटकांचे कमी-अधिक प्रमाण आरोग्याच्या समस्या निर्माण करते. मग एकातून दुसरी आणि त्यातून मग तिसरी समस्या उद्भवते. हे चक्र असेच सुरु राहते. परिणामी स्वास्थ्य बिघडते. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

या समस्या निर्माण होतात
महिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. आयोडीनच्या गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर वंधत्व, नवजात बालकात व्यंग निर्माण होण्याचा धोका वाढतो.

असा होतो परिणाम
मानवी शरीरासाठी आयोडीन हे एक महत्त्वपूर्ण मायक्रो न्युट्रिएंट आहे. जे थॉयरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपो थायरॉईडिज्मची समस्या उद्भवते.


तज्ञांनुसार, महिलांच्या शरीरातील आयोडीन कमतरतेचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन संस्थेवर पडतो. हायपोथायरॉईडिज्ममुळे वंधत्व आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य जेव्हा मंदावते तेव्हा आवश्यक प्रमाणात हार्मोनची निर्मिती होत नाही. याचा अंडाशयात अंड उत्पत्तीवर परिणाम होतो आणि हेच वंधत्वाचे कारण ठरते.

त्यावर उपचार महत्त्वाचे
हायपो थॉयरॉईडिज्म असलेल्या महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होणे, मासिक पाळीचे चक्र बिघडणे आणि गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होणे, अशा समस्या उद्भवतात. हायपो थॉयरॉईडिज्मची समस्या दूर करण्यासाठी त्यावर उपचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावर उपचार करुनही जर वंधत्वाची समस्या कायम राहत असेल तर त्यासाठी दुसरे उपचार करण्याची आवश्यकता निर्माण होते.

गरोदरपणाचा काळ म्हटला की त्या स्त्रीपेक्षा तिच्या आजुबाजूच्या व्यक्तीच अधिक सतर्क असतात. अनेक लहान लहान गोष्टींबाबत सल्ला देत असतात. गरोदरपणाच्या काळात प्रवास करण्याबाबतही सतत सल्ले दिले जातात. प्रामुख्याने विमानप्रवास करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. हे तुम्हांला ठाऊक आहे का?

विमानप्रवासादरम्यान गरोदर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी ?

विमानप्रवासात सीटबेल्ट लावणं आवश्यक असतं. मात्र गरोदर स्त्रियांनी हा सीटबेल्ट पोटाच्या खालच्या बाजूला बांधावा.

प्रवासादरम्यान योग्य कपड्यांची निवड करण आवश्यक आहे. आरामदायी कपडे घालावेत. फार घट्ट कपडे टाळा.

प्रवासादरम्यान पाणी मुबलक प्रमाणात पिणे आवश्यक आहे. यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.

तुमची विमानातील आसनव्यवस्था वॉशरूमच्या जवळपास असेल याची खात्री करा. त्यासाठी फ्लाईट अटेन्टंटशी बोला.

अनेकांना टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या दरम्यान श्वास घेताना त्रास होईल अशी भीती असते. मात्र विमान उंचावर असले तरीही पुरेसा ऑक्सिजन असतो.

मेटल डिटेक्टरच्या बाबतीतही अनेकींच्या मनात शंका असते. मात्र त्याचा बाळाच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याचा धोका नसतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पुरेशी काळजी घेत विमानप्रवास करायला घाबरू नका.

Dr. Tushar Suryavanshi
Dr. Tushar Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Panchakarma, 24 yrs, Nashik
Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Ashwin Prasad
Dr. Ashwin Prasad
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Cosmetic Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Prakash Dhumal
Dr. Prakash Dhumal
BHMS, Family Physician Dietitian, 5 yrs, Pune
Dr. Chandrashekhar Jadhav
Dr. Chandrashekhar Jadhav
BAMS, Ayurveda Child Abuse Pediatrician, 15 yrs, Pune
Hellodox
x