Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consultबहिरेपणा –

ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.

आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ज्याप्रमाणे वास येत नाही, म्हणजेच त्या इंद्रियाचे काम मंदावते त्याचप्रमाणे कानाला सर्दी झाली की ऐकू येणे मंदावते. म्हणून सर्दीसाठी जे उपचार सांगितले आहेत तेच उपचार ह्या कानाच्या सर्दीसाठी करावेत. नाकाच्या सर्दीमध्ये नाकाच्या आतल्या श्लेष्मल त्वचेला (म्युकस मेम्ब्रेनला) सूज येते तशीच सूज इथे कानाच्या पडद्याला येते. सर्दी म्हणजे ओलेपणा. नाकाच्या भागात जास्त झालेले किंवा साठलेले पाणी शरीर बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सतत नाक वहाते. पडद्याच्या सूजेमुळे श्वासमार्ग आकुंचित होऊन शिंका येतात. श्वासोच्छवासाच्या क्रियेत बाह्य वातावरणाचा सतत संपर्क येत असल्यामुळे नाकाला सर्दी लवकर होते. अशी सर्दी जास्त काळ टिकून राहिली तर त्याचा विस्तार वाढून पुढे कानाच्या पडद्यापर्यंत पोचतो. म्हणून सर्दी बरेच दिवस राहिल्यामुळे कानात दडे बसण्याची सुरुवात होते आणि बहिरेपणा सुरु होतो.

तबला किंवा डमरूचे चामडे ओले झल्यावर त्याचा नाद किंवा आवाज बरोबर येत नाही त्याचप्रमाणे कानाचा पडदा ओला - दमट झाल्यामुळे त्याचा आवाज बरोबर येत नाही आणि तो मेंदूपर्यंत सहजगत्या पोचत नाही. काहीवेळा कानाच्या पडद्याचा ताण कमी होऊनही कानात दडे बसतात. तबल्याच्या वाद्या घट्ट करून जसा त्याचा नाद सुधारता येतो त्याप्रमाणे तोंडात हवा दाबून हा ताण कमीअधिक करता येतो. घाटात प्रवास करतांना किंवा विमानप्रवासात असा अनुभव बहुतेक सर्वांनाच येतो. असे दडे सहजपणे सुटतात, त्यासाठी काही औषधोपचार करण्याची गरज नसते. कानाच्या सर्दीमध्ये दडे बसून बहिरेपणा येण्याच्या आजाराला नाकाच्या सर्दीप्रमाणे पथ्यपाणी आणि औषधोपचार करावे लागतात.

पथ्यपाणी विचार –

ओलसरपणा किंवा दमटपणा हे ह्या आजाराचे मुख्य कारण आहे. त्यामुळे तहान नसतांना उगाचच जास्त पाणी पिऊ नये हे सर्वात महत्वाचे पथ्य लक्षात ठेवावे. विशेषतः झोपण्यापूर्वी किमान तासभर अगोदर पाणी पिणे टाळले पाहिजे. अर्थातच सरबत, दूध, चहा, कॉफी, मद्य किंवा तत्सम कोणताही द्रव पदार्थ पाण्याप्रमाणेच ओलसरपणा किंवा दमटपणा वाढवेल हे ध्यानात ठेवावे. रोज डोक्यावरून स्नान करणे टाळावे. पाण्यामुळे निर्माण झालेला ओलेपणा कमी करण्यासाठी ह्याठिकाणी ऊब निर्माण करणे गरजेचे आहे. तबला किंवा डमरूच्या चामड्याला शेक देऊन ज्याप्रमाणे कोरडे करण्याची पद्धत आहे तसेच ह्यात करण्याची गरज आहे.

सोपा घरगुती उपचार –

हिंगाचा मुगाएवढा खडा आणि लसणाच्या पाकळीचा चण्याएवढा तुकडा एका तलम सूती कापडात गुंडाळून रात्री झोपतांना कानात ठेवावा व सकाळी काढून टाकावा. ह्याने कानाच्या पडद्याला शेक मिळतो आणि त्यातील ओलसर दमटपणा नाहीसा होतो. सर्दी ज्याप्रमाणे नाकातून पुढे कानात प्रवेश करते त्याच तत्वावर औषधी चिकित्सा करण्याचा मार्ग देखील नाकातूनच करावा. सर्दीमध्ये ज्याप्रमाणे नस्य चिकित्सा केली जाते, त्याचप्रमाणे षड्बिंदू तेल, पंचेंद्रियवर्धन तेल, अणु तेल ह्या तेलांचा उपयोग प्रकृती आणि लक्षणांनुसार करावा. पोटातून घेण्यासाठी नागगुटी, लक्ष्मीविलास, चित्रकहरीतकी अवलेह ह्यापैकी सुयोग्य औषधाची निवड करावी.

कानाचे यंत्र –

कानात दडे बसून ऐकायला कमी येणे सुरु झाले की सामान्यतः कानाचे यंत्र लावून घेण्याची पद्धत आहे. ह्या यंत्रात मायक्रोफोन, अॅम्प्लीफायर आणि स्पीकर असे मुख्य तीन भाग असतात. मायक्रोफोनमुळे बोलण्याचा आवाज ग्रहण केला जातो, अॅम्प्लीफायरच्या सहाय्याने तो मोठा (लाऊड) केला जातो व स्पीकरच्या सहाय्याने हा आवाज कानाच्या पडद्यावर पोचवला जातो. मोठा किंवा कर्णकर्कश आवाज कानाच्या वातनाड्यांना कमकुवत बनवतो आणि पडद्याला अधिकच कमजोर बनवतो. वर निर्देशित साध्या सोप्या घरगुती आणि विना खर्चाचे प्रयोग करूनही उपयोग झाला नाही तरच फक्त असे यंत्र बसविण्याचा विचार करावा. कान हे एक महत्वाचे ज्ञानेन्द्रीय आहे, त्याच्या चिकित्सेत हेळसांड करून कायमचे अपंगत्व येणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे.

रस्त्यावर चालताना, गाडी चालवताना किंवा बस-ट्रेनमध्ये प्रवास करताना अलिकडे सगळेच मोबाइलवर हेडफोन लावून गाणी ऐकताना बघायला मिळतात. एकदा का हेडफोन लावले की, जगाशी त्या व्यक्तींचा संपर्कच तुटतो. मोबाइलवर छोटे किंवा मोठे हेडफोन लावणं हे जरी कूल वाटत असलं तरी तितकं ते नाहीये. तुम्हालाही स्मार्टफोनवर हेडफोनने मोठ्या आवाजात गाणी ऐकण्याची सवय असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हावे. याआधीही अनेक रिसर्चमधून हेडफोन वापरण्याच्या तोट्यांबाबत सांगण्यात आले आहेत. पण आता एका रिपोर्टनुसार, याचा जगभरातील कोट्यवधी लोकांना मोठा फटका बसणार आहे. या अभ्यासानुसार केवळ ४ मिनिटेच हेडफोन वापरणे योग्य आहे.

यूनायटेड नेशन्सच्या एजन्सी रिपोर्टनुसार सांगण्यात आलं आहे की, स्मार्टफोनमध्ये संगीत ऐकणं आणि सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने जगभरातील साधारण १ अरबपेक्षा जास्त लोकांना बहिरेपणाचा धोका आहे. ही समस्या दूर करण्यासाठी त्यांनी काही नवीन गाइड लाइन्सही जाहीर केल्या आहे.

१२ ते ३५ वयोगटातील लोकांना अधिक धोका

यूएनच्या रिपोर्टनुसार, १२ ते ३५ वयोगटातील लोकांना ही समस्या होण्याचा धोका अधिक आहे. हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ने सांगितले की, हिअरिंग लॉसच्या समस्येमुळे जगभरात ७५० मिलियन डॉलर खर्च होण्याचा अंदाज आहे. WHO च्या तांत्रिक अधिकारी शेली चढ्ढा यांच्यानुसार, जगभरातील एक अरबपेक्षा अधिक तरूणांना स्मार्टफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकायला पसंत असतं. ते यासाठी इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करतात. पण यामुळे ते बहिरेपणाचे शिकार होत आहेत. त्यांची ऐकण्याची शक्ती कमी होत आहे.

४ वर्ष केला गेला अभ्यास

शेली चड्ढा यांच्यानुसार, ही आकडेवारी त्यांच्या एका अभ्यासावर आधारित आहे. हा अभ्यास साधारण ४ वर्ष करण्यात आला. यात तरूणांची ऐकण्याची सवय आणि किती मोठ्या आवाजात ते गाणी ऐकतात या दोन गोष्टींवर फोकस करण्यात आला होता. या अभ्यासातून तरूणांचा बहिरेपणापासून बचाव करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीही समोर आल्या आहेत. प्रयत्न हाच केला जात आहे की, यूजरला सशक्तआणि जागरूक केलं जावं, जेणेकरून ते योग्य ऐकू शकतील आणि निर्णय घेऊ शकतील.

फोनमध्ये व्हॉल्यूम कंट्रोल वापरा

चड्ढा यांनी सांगितलं की, आपणा सर्वांच्या स्मार्टफोनमध्ये एक साउंड कंट्रोलिंग सिस्टीम असते, त्यावरून हे कळतं की, आवाज किती प्रमाणात आहे. तसेच आवाज प्रमाणापेक्षा जास्त होत आहे हेही दाखवलं जातं. अशात जर बहिरेपणा टाळायचा असेल तर स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली गाइडलाइन्स आवर्जून फॉलो करा. त्यासोबतच बहिरेपणाचा त्रास कमी करण्यासाठी ऑटोमॅटिक व्हॉल्यूम डिवाइसचा वापरही करू शकता. याने कानात होणारा आवाज आपोआप कमी होईल.

धुम्रपनामुळे बहिरेपणाचा धोका असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासासाठी 50,000 लोकांचा आठ वर्षांसाठी अभ्यास करण्यात आला होता. जपानधील जागतिक आरोग्य आणि औषध केंद्रातील संशोधकांनी लोकांच्या वर्षिक आरोग्य चाचणीतून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले.


यामध्ये अभ्यासात सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तींना आरोग्य आणि जीवनशैलीविषयक प्रश्र्न विचारण्यात आले. अभ्यासात धू्म्रपान करणार्‍या, धू्म्रपान सोडून दिलेल्या आणि कधीही धू्म्रपान न केलेल्या लोकांची तपासणी केली. यावेळी एका दिवसात किती वेळा धू्म्रपान केले जाते आणि किती प्रमाणात धू्म्रपान केल्याने श्रवण यंत्रणेला धोका होतो याचे विश्लेषण करण्यात आले.
कामाच्या ठिकाणी किंवा इतरत्र मोठ्या प्रमाणात असणारे ध्वनिप्रदूषण आदी घटकांचे समायोजन केल्यानंतर धू्म्रपान करणार्‍यांमध्ये कधीही धू्म्रपान न करणार्‍यांच्या तुलनेत 1.2 ते 1.6 टे जास्त धोका असल्याची संशोधकांनी नोंद केली. धू्म्रपानामुळे कमी तीव्रतेच्या ध्वनी लहरींच्या तुलनेत उच्च तीव्रतेच्या ध्वनिलहरी ऐकण्याची क्षमता कमकुवत होते. धू्म्रपान सोडण्याच्या पाच वर्षांनंतर बहिरेपणाचा धोका कमी होतो.

मोठ्या कालावधीसाठी भरपूर लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून धू्म्रपान बहिरेपणाचा धोका निर्माण करू शकत असल्याचे सबळ पुरावे समोर आले आहेत, असे जपानधील जागतिक आरोग्य आणि औषध केंद्रातील हुआनहुआंग हू यांनी सांगितले. बहिरेपणाचा धोका टाळण्यासाठी तंबाखूचे सेवन टाळणे गरजेचे असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे, असेही हू यांनी सांगितले. हा अभ्यास निकोटिन आणि टोबॅको रिसर्च या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आनुवंशिक बहिरेपणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी शास्त्रज्ञांनी एक नवीन औषध विकसित केले असून त्याच्या मदतीने या लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन डीफनेश अँड अदर कम्युनिकेशन डिसऑर्डरचे शास्त्रज्ञ थॉमस बी. फ्राइडमॅन यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे नवीन औषध तयार केले आहे. त्यांनी सांगितले की, या अध्ययनात खासकरून निम्न वारंवारितेवर ऐकण्याची क्षमता आणि काही सेन्सरयुक्त हेयर सेल्सला काही प्रमाणात सुधारण्यात शास्त्रज्ञ सक्षम आहे. यासंबंधी उंदरांवर केलेल्या एका प्रयोगामध्ये शास्त्रज्ञांनी त्यांच्यात एक जनुक आरई1 सायलेन्सिंग ट्रान्सक्रिप्शन फॅक्टर वा रेस्ट जनुकाची ओळख पटविली. श्रवणक्षमतेसाठी या जनुकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे जनुक डीएएनए 27 भागात आढळून येते. शास्त्रज्ञांनी बहिरेपणात डीएफएनए 27 च्या रहस्याचे अध्ययन केले. या अध्ययनात सॅल-मॉलेक्यूल आधारित औषधे डीएफएनए 27 बहिरेपणाच्या उपचारात प्रभावी आढळून आले. या पद्धतीने आनुवंशिकतेशी संबंधित बहिरेपणाच्या अन्य समस्यांचाही उपचार शक्य होऊ शकतो.

आरोग्यदायी आहारामुळे महिलांमधील कर्णबधीरतेची जोखीम कमी होते, असे अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेतील ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या आहारपद्धती व कर्णबधीरता यांच्या संबंधावर संशोधन करण्यात आले आहे. भूमध्य सागरी आहारातील (एएमइडी) ७०९६६ महिलांच्या २२ वर्षांतील आहाराची नोंद यात तपासण्यात आली. या आहारात ऑलिव्ह तेल, धान्ये, डाळी, भाज्या, फळे, दाणे, मासे व माफक अल्कोहोल यांचा समावेश आहे. डाएटरी अप्रोचेस टू स्टॉप हायपरटेन्शन (डॅश) व दी अल्टरनेटिव्ह हेल्दी इटिंग इंडेक्स २०१० या आणखी दोन आहारांचा संशोधनात समावेश करण्यात आला होता. डॅश आहारात कमी मेद, फळे, भाज्या व कमी सोडियम यांचा समावेश आहे. जर्नल न्यूट्रीशनमध्ये प्रसिद्ध संशोधन अहवालानुसार आरोग्यदायी आहारामुळे महिलांमधील कर्णबधीरत्व कमी होते.

जे लोक आरोग्यदायी आहार घेतात त्यांच्यात कर्णबधीरतेची जोखीम कमी होत असल्याचा दावा ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलच्या श्ॉरॉन कुरहान यांनी केला आहे. चांगल्या आरोग्यात कर्णबधीरता नसण्याला महत्त्व आहे. संशोधकांच्या मते एमएइडी व डॅश आहारपद्धतीत कर्णबधीरत्वाचा धोका ३० टक्के कमी होतो. इतर आहारपद्धती वापरणाऱ्या महिलांच्या तुलनेत त्यांच्यात कर्णबधीरत्व कमी असते.

यात एकूण एएचइआय २०१० प्रकारच्या आहारात ही शक्यता आणखी ३० टक्के कमी होते असे ३३ हजार महिलांच्या अभ्यासातून दिसून आले आहे.

Dr. Vasudha Pande
Dr. Vasudha Pande
MBBS, Ophthalmologist, 16 yrs, Pune
Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Pradnya Shirke
Dr. Pradnya Shirke
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 17 yrs, Pune
Dr. Khushbu Kolte
Dr. Khushbu Kolte
BDS, Dentist Cosmetic and Aesthetic Dentist, 8 yrs, Pune
Hellodox
x