Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.



एचआयव्ही / एड्स

मुळातच एड्स झालेल्या व्यक्तीकडे जेव्हा आपण पहातो तेव्हा नकळत आपल्या डोळयांवर एक नैतिकतेचा चष्मा चढत असतो. त्याचे कारणही तसेच आहे. हा आजार प्रामुख्याने लैंगिक मार्गातून पसरतो. यामुळे आपला आजार सर्वांपुढे येऊ नये असे एड्सच्या रूग्णालाही वाटत असते. समाजाचा दृष्टीकोन आणि रुग्णांची भीती यामुळे एड्स झाल्याचे निदान झाल्यावर सर्वात पहिली प्रतिक्रिया निराशेची, भीतीची आणि रोग लपवण्याची होते. डॉ. एडॉल्फ मेयर या मानसशास्त्रज्ञांचं एक वाक्य एड्सच्या आजाराचे अगदी चोख वर्णन करते. 'मानवी साद- प्रतिसादांच्या अनंत पैलूंनीच एखाद्या आजाराला आजारपण प्राप्त होत असते.'

कोणताही संसर्गजन्य आजार विषाणूंमुळे होतो. या विषाणूंना मारून टाकणारी लस जोपर्यंत सापडत नाही, तोपर्यन्त हताशपणे मानवजातीने या आजाराचे 'आजारपण' वाढवत ठेवायचे का? हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर नाही आहे. मग यासाठी आपण या रोगाबद्दलची आपली जागरुकता व माहिती वाढवली पाहिजे. एचआयव्हीची लागण झाल्यावर म्हणजे आपल्या शरीरात विषाणूचा प्रवेश झाल्यावर व्य‍क्ती साधारणपणे पुढील अवस्थांमधून जाते.

१. अवगुंठीत काळ (विंडो पिरिअड) -
संसर्ग झाल्यापासून सरासरी ३ते १२ आठवडे या काळांत मानवी शरीरात विषाणूंचा सामना करण्यासाठी प्रतिप्रथिने (Antibodies) निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असते. म्हणून या काळात शरीरामध्ये एचआयव्ही विषाणू असूनसुद्धा प्रतिप्रथिनांद्वारे होणारी प्रचलित रक्तचाचणी (एलिसा टेस्ट) नकारात्मक होऊ शकते. हा काळ कधी कधी सहा महिन्यांपर्यंत सुद्धा असू शकतो.

२. लक्षणविरहित काळ -
या काळात एचआयव्हीबाधित व्य‍क्तींमध्ये काहीही लक्षणे दिसून येत नाहीत. ही अवस्था ८ ते १० वर्षापर्यंत आढळून येते. काही व्यक्तींमध्ये १२ वर्षे किंवा अधिक असू शकते, तर काहींमध्ये अत्यल्प असू शकते, या काळात रक्ताची एलिसा टेस्ट सकारात्मकच येते.

३. एचआयव्ही - एड्स -
एचआयव्हीबाधित व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारशक्ती हळूहळू खूप कमी होते आणि रूग्णामध्ये पुढील लक्षणे मुख्यत्वेकरुन दिसतात.

लक्षणे -
- वजन कमी होणे- मूळ वजनात १० टक्के किंवा अधिक घट होणे.
- एक महिन्याहून अधिक काळ खोकला किंवा जुलाब होणे.
- सतत किंवा अधूनमधून येणारा ताप.

शिवाय वरचेवर न्युमोनिया, फुफ्फुसाचा क्षय, नागीण, कावीळ, अन्ननलिकेला बुरशीमुळे येणारी सूज, कातडीचे आजार, त्वचा कर्करोग असे अनेक आजार होतात. या अशा नव्या जंतुसंसर्गांनी शरीर दुबळे बनते, अनेक रोगांचे जंतू शरीरावर ताबा मिळवतात. या विशिष्ट चिन्हे व लक्षणे असलेल्या अवस्थेलाच 'एड्स' संबोधतात. ही लक्षणे आढळल्यावर योग्य उपचार न झाल्यास, या आजारांमध्ये २ वर्षांच्या आत एड्सच्या रुग्णाचा मृत्यू होतो.

उपाय -
यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे एचआयव्ही होऊ नये म्हणून काळजी घेणे. मुख्य म्हणजे या आजारावर रामबाण औषध अथवा लस उपलब्ध नाही, म्हणून प्रतिबंध हाच उत्तम मार्ग होय. हा आजार बर्‍याच अंशी माणसाच्या जोखीमपूण वागणूकीशी किंवा मानसिकतेशी निगडीत असल्याने तो टाळता येणे सहज शक्य आहे.

रोग टाळण्यासाठी करावयाच्या गोष्टींचे पालन -
अ) एकनिष्ठ जोडीदाराशीच लैंगिक संबंध ठेवावे. एकापेक्षा अनेक व्य‍क्तींशी किंवा अनोळखी व्यक्तींशी शरीरसंबंध टाळावे. संभोगाच्यावेळी निरोधचा (कंडोम) वापर करावा.
ब) अधिकृत रक्तपेढ्यांमधूनच रक्त घ्यावे. निर्जंतुक न केलेल्या सुया व सिंरींजेसचा वापर टाळावा. याबरोबरच इंजेक्शनद्वारे मादक द्रव्यांचे सेवन टाळावे.
क) एचआयव्हीबाधित मातेने गर्भधारणा किंवा गर्भपाताविषयी जबाबदार निर्णय घेण्यास योग्य सल्ला घ्यावा.

रोग परीक्षण चाचणी -
एचआयव्हीची लागण झालेली व्यक्ती बाह्यांगावरुन ओळखू येत नाही म्हणून प्रयोगशाळेत रक्तचाचणी करूनच याचे निदान करता येते. सर्वसाधारणपणे एलिसा टेस्ट व रॅपिड टेस्ट या दोन चाचण्यांनी निदान केले जाते. एचआयव्हीचा संसर्ग झालेली व्यक्ती रोजच्या आयुष्यात आवश्यक ती खबरदारी घेऊ शकते, जेणेकरुन आयुष्याचा कालावधी व दर्जा वाढवू शकेल. एकचआयव्हीची लागण झाल्याचे कळल्यावर त्या व्यक्तींस धक्का बसून राग, दु:ख, चीड, नैराश्य, भीती अशा भावना मनात येऊ शकतात. अशा वेळी त्या व्यक्तीला जवळच्या माणसाच्या आधाराची व मदतीची आवश्यकता असते. स्वत: एचआयव्हीबाधित व्यक्तीने काळजी घेताना. योग्य सकस आहार, व्यायाम, डॉक्टरांचे मार्गदर्शन, सुरक्षित लैगिक जीवन, आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. घरातल्या इतर लोकांनी आपल्या विश्वासाच्या डॉक्टरांकडून एचआयव्ही-एड्सबद्दल शास्त्रीय माहिती करुन घेतली पाहिजे व रूग्णास मानसिक आधार दिला पाहिजे. त्याची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन त्याचे आयुष्य मानसिक व शारीरिक अशा दोन्ही रीतीने सुसह्य होईल.

एचआयव्ही-एड्स पसरण्याचे टप्पे -
एखाद्या सांसर्गिक आजाराच्या साथीचा विचार करता तो कसा, किती प्रमाणात पसरतो, त्याचे टप्पे कसे असू शकतात याचा अंदाज करता येतो. एचआयव्ही-एड्सबद्दल हे पुढीलप्रमाणे सांगता येतील.

पहिला टप्पा (अत्यंत जोखमीचे समाज घटक) -
अनेकांशी शरीरसंबंध येणारे वेश्याव्यवसायातील स्त्री-पुरूष हे अत्यंत जोखमीचे समाजघटक आहेत. त्यांच्यात या आजाराचे प्रमाण दिसणे हा या साथीच्या आजारातील पहिला टप्पा. अनेकांशी शरीरसंबंध येत असल्यामुळे आजार होण्याचा धोका जास्त असतो.

दुसरा टप्पा (वेश्यागमन करणारे) -
वेश्या-स्त्रीपुरूषांशी शरीरसंबंध ठेवणारे समाजघटक लिंग सांसर्गिक आजाराची लक्षणं घेऊन दवाखान्यात उपचारासाठी येणार्‍या पुरूषांच्या संख्येवरून आजार किती प्रमाणात पसरला आहे ते लक्षात येते. जर ही संख्या वाढत असेल तर सा‍थ दुसर्‍या टप्प्यात आहे असे म्हणता येते.

तिसरा टप्पा (कमी जोखमीचे समाजघटक) -
सर्वसाधारणपणे वेश्यांव्यतिरिक्त इतर स्त्रियांना कमी जोखमीचे समाजघटक समजलं जातं. कारण त्यांचे शरीरसंबंध, विशेषत: विवाहित स्त्रियांचे संबंध सहसा फक्त त्यांच्या पतीशीच येतात. मात्र त्यांनाही हा आजार होणं म्हणजे साथीनं तिसरा टप्पा गाठणं आणि साथीचं सार्वत्रिकीकरण झाले. असं म्हणावं लागतं. गरोदर स्त्रियांच्या तपासणीतून आजार झाल्याचं लक्षात येतं आणि अशा स्त्रियांच प्रमाण वाढूण, ते १ टक्क्यापेक्षा जास्त असणं हे साथ पसरल्याचं निदर्शक आहे.

भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या चार राज्यांत साथीचं सार्वत्रिकीकरण झालेलं आहे. याबरोबरच मणिपूर, नागालॅंड या राज्यातूनही हीच परिस्थिती दिसते. मात्र तिथे शिरेतून मादक द्रव्य घेण्याचं प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने येथे एचआयव्ही पसरण्याचे हे प्रमुख कारण दिसून येतं. गुजरात, गोवा ही राज्यही वरील चार राज्यांच्या मार्गावर आहेत.

त्यामानाने उत्तर भारत व केरळमध्ये साथ इतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नाही. शिवाय कमी प्रमाण असलेल्या राज्यांची वाटचाल जास्त प्रमाणाकडे असं चित्रही कमी प्रमाणात दिसतंय. अर्थात यात केव्हाही बदल होऊ शकतो. त्यामुळे समाधानी रहाण्यात अर्थ नाही. यामुळे सा‍थीला अटकाव आणि नाश करण्यासाठी सदैव सज्जच रहावं लागेल.

एड्सचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त -
रोचेस्टर येथील मायो क्लिनिकच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, एचआयव्ही बाधित व्यक्तींपैकी स्त्रियांची संख्या फार वेगाने वाढतेय. स्त्रियांना भेडसावणारे एचआयव्हीचे धोके आणि गुंतागुंत पुरुषांपेक्षा वेगळी असते. जीवशास्त्रदृष्ट्याच एचआयव्ही होण्यासाठी त्या अधिक संवेदनशील असतात. विशेषत: वीर्याद्वारे येणार्‍या विषाणूंना योनिमार्गातील नाजुक पेशीसमूहांना गाठणे फारच सोपे असते. एचआचव्हीबाधित स्त्रियांपैकी ७५ टक्के स्त्रियांनी एचआयव्हीबाधित पुरुषाशी शरीरसंबंध केल्यामुळे हा आजार होतो. स्त्री-पुरूषांसाठी एचआयव्हीची प्राथमिक लक्षणे तीच असू शकतात, उदा. बारीक ताप, रात्री घाम येणे, वजन कमी होणे. पणे स्त्रियांना या शिवायही सातत्याने होणारे लिंग-सांसर्गिक आजार, पॉपिलोमा विषाणूमुळे येणार्‍या चामखिळी यामुळे सर्व्हिकल कॅन्सर तसेच ओटीपोटाचा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. अर्थात जोडीदाराच्या एचआयव्ही स्थितीबद्दलची माहिती आणि कण्डोमचा वापर यामुळै लागण थोपता येऊ शकते. पण स्त्रियांसाठी या आजाराचे निदान लवकरात लवकर होणे आवश्यक असते. कारण त्यामुळै औषधोपचारांचा फायदा निश्चितच होऊ शकतो, शिवाय महत्वाचं म्हणजे आईकडून मुलांना होणारी लागण .

पुरूष, स्त्रियांप्रमाणेच समाजाचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे कुमारवयीन मुले. साधारणत: १२ ते १८ वयोगटातील मुलांचे एचआयव्ही-एड्सची लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे या समाजघटकाला लैंगिक शिक्षण देणे, एचआयव्ही-एड्सची शास्त्रीय माहिती देणे खूप गरजेचे आहे. असे झाल्यास आपल्या देशाचे भावी नागरिक या प्राणघातक आजारापासून दूर राहतील. आपली येणारी पिढी दूर राहिल.

एड्स हा असा रोग आहे ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू संभवतो. एड्स कोणत्याही वयात होऊ शकतो. एड्स हा व्यक्तिचं संपूर्ण शरीर हळूहळू निकामी करतो. महत्वाचं म्हणजे या रोगावर अजून कोणत्याही देशात औषध सापडलेलं नाही. पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की एड्स कसा आणि कधी होतो.

एड्स कसा होतो?

एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.


किती दिवसात होतो?
एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यानंतर संपूर्ण शरीरात पोहचण्यासाठी त्याला 10 वर्ष लागतात. हा व्हायरस आणखी कमी दिवसांमध्ये पण शरीरात पसरू शकतो. वयानुसार तो शरीरात पसरतो.

प्राथमिक संकेत
निरुत्साही आणि सारखं थकल्या सारखं वाटणे, शरीरात दुखणं, उलटी होणं ही एड्सची प्राथमिक लक्षणे आहेत. अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर लगेचच रुग्णालयात जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे

एड्स हा असा रोग आहे ज्यामुळे व्यक्तीचा मृत्यू संभवतो. एड्स कोणत्याही वयात होऊ शकतो. एड्स हा व्यक्तिचं संपूर्ण शरीर हळूहळू निकामी करतो. महत्वाचं म्हणजे या रोगावर अजून कोणत्याही देशात औषध सापडलेलं नाही. पण खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की एड्स कसा आणि कधी होतो.

एड्स कसा होतो?

एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्यानेच होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचं रक्त जर तुमच्या शरीरात गेलं तरी तो होऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो.


किती दिवसात होतो?
एड्सचा व्हायरस शरीरात गेल्यानंतर संपूर्ण शरीरात पोहचण्यासाठी त्याला 10 वर्ष लागतात. हा व्हायरस आणखी कमी दिवसांमध्ये पण शरीरात पसरू शकतो. वयानुसार तो शरीरात पसरतो.

प्राथमिक संकेत
निरुत्साही आणि सारखं थकल्या सारखं वाटणे, शरीरात दुखणं, उलटी होणं ही एड्सची प्राथमिक लक्षणे आहेत. अशा प्रकारे जर त्रास होत असेल तर लगेचच रुग्णालयात जाऊन त्याची तपासणी केली पाहिजे

जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये 1988 मध्ये साजरा केला. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. जगात दर 6.5 सेकंदाला एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होते. म्हणजे 4.85 मिलियन माणसाला दरवर्षी एचआयव्हीची लागण होते. UNAIDS ह्या जागतिक संस्थेने 2006 च्या शेवटी असा निष्कर्ष काढला की, जगातील 39.5 मिलियन माणसे एचआयव्हीसहीत जगत आहेत. 15 ते 49 ह्या वोगटात सर्वात जास्त लागण होणारा मृत्यूच्या दिशेने घेऊन जाणारा विषाणू म्हणून आपली (कु)ख्याती करून घेतली आहे.


हा दिवस साजरा करण्याचे कारण असे की, अजूनही समाजामध्ये एड्सबद्दल व्यक्तीच्या चेहेर्‍यावर शरमेची व अपराधीपणाची भावना असते. लोक या बाबत बोलायला सुद्धा घाबरतात आणि कुटुंबाची चिंता करीत बसतात. एड्स म्हणजे-अक्वायर्ड ईमून डेफिशियन्सी सिन्ड्रोम- एवढेच आपल्याला माहीत असून चालत नाही. त्यासहीत जगणार्‍या माणसाचे आयुष्य किती खडतर असते, ते त्यातून कसे बाहेर पडतात हेही माहीत असणे गरजेचे आहे. सहवेदनेतून जाणार्‍यांनी एकत्र येणे म्हणजे स्वमदत गट तयार करणे गरजेचे आहे. एड्स असणारी माणसे जेव्हा एकटी असतात तेव्हा असहायतेने दुर्बळ बनतात. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की ह्या विषाला वाहून घेतलेल्या अनेक व्यक्ती, संस्था आहेत. अनेक मदत गट आहेत. ज्यावेळी एच.आय. व्ही.ग्रस्त माणसे एकत्र यायला लागतात, तेव्हा हळूहळू त्यांची मनाची उभारी वाढायला लागते. स्वमदत गटाकडून ह्या सर्वाना त्यांचे दु:ख, निराशा, यातना, व्यथा यातून बाहेर येण्याकरिता एक वाट मोकळी होते.

एच.आय.व्ही.चे संक्रमण कसे होते : एच.आय.व्ही. विषाणू हा वीर्यातून, योनीस्त्रावातून, रक्तातून व स्तनपानातून संक्रमित होतो. संक्रमणाचे प्रमुख मार्ग पुढील- असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्ताद्वारे, दूषित रक्त असलेल्या सुई, इंजेक्शनमधून, सांसर्गिक महिलेकडून तिच्या बाळाला प्रसूतीसमयी किंवा स्तनपानाद्वारे होतो.

एच.आय.व्ही.चा विषाणू सहजरीत्या शरीराच्या बाहेर जगू शकत नाही. त्यामुळे स्वच्छतागृह वापरल्यामुळे, आलिंगन दिल्यामुळे, चुंबनाने किंवा हातात हात घेतल्याने, ताट-वाटी किंवा पिण्याची भांडी वापरल्याने किंवा खोकल्याने पसरत नाही. डास चावल्यानेही एच.आय.व्ही.चा प्रसार होत नाही.

एच.आय.व्ही.चे संक्रमणाचे क्रम : तीव्र संसर्ग, लक्षणविरहित प्रदीर्घ अवधी पण प्रोगशाळेतील चाचण्यामध्ये रोगाच्या वाढीचा आढावा घेता येतो, प्रतिकारशक्तीच्या अभावी संधिसाधू आजार जे मृतूचे मुख्य कारण आहे. (उदा. क्षयरोग)

एच.आय.व्ही.ची तपासणी का करून घ्यावी : आधीच घेतलेली काळजी ही आपल्या भविष्यातील निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ठरते. तंदुरुस्त राहणे आणि योग्य ती काळजी घेणे, एच.आय.व्ही.ची लागण न होण्यासाठी पहिली पारी आहे. एच.आय.व्ही. चाचणी नियमित करणे आणि आपण पॉझिटिव्ह निघाल्यास ताबडतोब एच.आय.व्ही. स्पेशालिस्टना जाऊन भेटणे, त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य ते उपचार घेणे.
एच.आय.व्ही. लस : लस ही शरीरात रोगप्रतिकारक जागृत करून, रोगजंतूंच्या संसर्गाला प्रतिबंध करणारा पदार्थ आहे. मानवाच्या शरीरात उपजतच रोगप्रतिकारक क्षमता असते. जेव्हा एखादी व्यक्ती आजारी असते, तेव्हा तिची रोगप्रतिकारक शक्ती शरीराचे त्या जंतुसंसर्गापासून रक्षण करण्यास शिकवते.

जगात आणि भारतात लाखो लोक एच.आ.व्ही.बाधित जीवन जगत आहेत. एड्समुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षित वर्तणूक आणि सवयीमुळे एच.आय.व्ही.च्या संसर्गाला प्रतिबंध करता येतो, पण त्यालाही काही मर्यादा आहेत. या सर्वांच्या बरोबरच या साथीचा वाढता प्रसार थोपविण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीसारखे नवे उपाय विकसित करण्याचे प्रयत्न करणेही आवश्क आहे.

एॅन्टीरेट्रोव्हारल उपचार पद्धती : हा एक एच.आय.व्ही. आणि एड्सवर करण्यात येणार्‍या उपचारांपैकी एक मुख्य उपचार आहे. ह्या उपचारामुळे हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण आयुष्य वाढवतो. ह्या उपचारांमध्ये घेण्यात येणारी औषधे ही कायम घ्यावी लागतात.

निर्णय व सद्य:स्थितीचा विचार : आयुष्यात आपल्याला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असतात. परंतु प्रत्येक निर्णयाच्या वेळी आपल्याला त्याची HIV शी सांगड घालूनच निर्णय घ्यावा लागतो. आपण पॉझिटिव्ह आहात हे माहीत असेल, आणि आपल्याला मूल होऊ द्यायचे असेल, तर पहिल्यापासूनच काळजी घेतली तर मूल पॉझिटिव्ह न होता आपण त्याला जन्म देऊ शकता. पोटातल्या बाळाचाही आपण बचाव करू शकतो.

PSI व NMP + हे एच.आय.व्ही.सह जगणार्‍या व्यक्तीरित्या आरोग्य विमा उपलब्धीसाठी एकत्रितरीत्या काम करीत आहेत. HIV
शुश्रूषा विम्याची रचनाच मुळात ग्रस्त लोकांच्या गरजांवर प्रकाश टाकण्यासाठी आहे.

आरोग्याची नियमित तपासणी करुन घेणे, CD4 चाचणी करुन घेणे, आणि त्या त्या वेळी योग्य व्यक्तीला योग्य ते प्रश्न विचारून व्यवस्थित काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.

आपल्या निर्णयावरच उद्याच्या समाजाचे भविष्य अवलंबून आहे.

Dr. Ramesh Ranka
Dr. Ramesh Ranka
MS - Allopathy, Orthopaedics, 25 yrs, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Anamika Ghodke
Dr. Anamika Ghodke
BDS, Dental Surgeon Dentist, 4 yrs, Pune
Dr. Smita  Patil
Dr. Smita Patil
BHMS, Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Amit Murkute
Dr. Amit Murkute
MBBS, Dermatologist Hair Transplant Surgeon, 6 yrs, Pune
Hellodox
x