Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

प्रत्येकवर्षी डेंग्यूमुळे अनेकांचा जीव जातो. यामुळे डेंग्यूबाबतीत सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. डेंग्यु हा ताप मच्छरांनी कापल्यामुळे होत असतो. हा संक्रमण एडीज मच्छर चावल्यामुळे होतो. डेंग्युच्या या आजारात त्या व्यक्तीला भरपूर ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टे उटतात, डोकं दुखी, अंग दुखी, सांधेवात, भूक कमी लागणं, सतत उल्टी होणे यासारखे प्रकार होतात.

जाणून घेऊया डेंग्यूबाबत 4 गोष्टी

रात्री देखील लाईटच्या प्रकाशात मच्छर चावतात

डेंग्यूची मच्छर दिवसा उजेडी चालते. त्याचप्रमाणे खास गोष्ट ही आहे की, रात्री लाइटच्या प्रकाशात देखील मच्छर चावण्याची दाट शक्यता आहे. हे मच्छर खासकरून सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्त होताना चावतात. मच्छरची चावण्याची सर्वात आवडती जागा हाताच्या कोन्याच्या खाली, गुडघ्यांवर चावतात. सर्वात जास्त डेंग्यूचा त्रास हा जुलै ते ऑक्टोबर महिन्यात होतो.


श्वेत रक्त धमण्यांवर आक्रमण

डेंग्यू मच्छर एकाचवेळी 100 हून अधिक अंडी घालतो. यांच जीवन जवळपास 2 आठवड्यांच असतं. डेंग्यू मच्छरांनी सोडलेला वायरल हा व्यक्तीच्या सरळ शरीरात घुसून रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. कमी लोकांना माहित असेल की, एडिस मच्छरच्या चावण्यामुळे ती व्यक्ती सरळ मृत्यूपर्यंत पोहचू शकते.

घरातील टाक्या

एका रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे की, 41% मच्छर हे प्लास्टिकचे ड्रम आणि कंटेनरमध्ये निर्माण होतात. तसेच घरात अतिरिक्त पाण्याचा साठा. कुलरांमध्ये 12टक्के आणि लोखंडाच्या कंटेनरमध्ये 17 टक्के मच्छर निर्माण होतात.

प्लेटलेट्समुळे होत नाही मृत्यू

कायम असं सांगितलं जातं की, प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे लोकांचा मृत्यू झाला. खूप कमी लोकांना माहित आहे की, डेंग्यू दरम्यान मृत्यू होतो त्याच कारण कॅपिलरी लीकेजमुळो होते. जर कुणाला कॅपिलरी लीकेजचा त्रास सुरू झाला तर त्या व्यक्तीला पातळ आहार द्यावा.

ताप आल्यावर प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत.

काय आहेत हे घरगुती उपाय…

– तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.

–आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.

–तापात बेलफळाचं चूर्ण उपयुक्त ठरतं. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून ताप उतरेपर्यंत घ्यावं.

–सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.

– कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५-१० मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.

–तापकमी करण्यासाठी तुळशीचा रसदेखील फायदेशीर ठरतो. लहान मुलांसाठीदेखील हा उपाय सुरक्षित आणि फायदेशीर आहे. १०-१५ तुळशीच्या पानांना पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटावे. २-३ तासांनी तुळशीचा रस प्यावा. यामुळे ताप कमी होण्यास मदत होते.

पावसाळ्याचा मोसम आनंदी करत असला तरी रोगांच्या संक्रमणासाठी हाच मोसम जबाबदार असतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप अगदी सामान्य आजार आहे. बघू या सगळ्यांपासून आपण स्व‍त:चे रक्षण कसे करू शकतो.

रोग पसरण्याचे कारण

जागोजागी साठणार्‍या पाण्याने रोगांना आमंत्रित मिळतं,
पावसात भिजल्याने,
विषारी किटकांमुळे खाद्य पदार्थ दूषित होण्याने.

पावसाळ्यात येणार्‍या तापाचे लक्षणे:-

डोके दुखी आणि अंग ठणकणे

लघवीचा रंग लाल होणे

कळमळणे

तहान लागणे

तोंड कडू होणे

अस्वस्थता

काळजी:-
ताप आल्यावर रूग्णाला हवेशीर खोलीत झोपवावे.
हलकं फुलकं आणि सुपाच्य जेवायला घालावे.
दूध, चहा किंवा मोसंबी रस देऊ शकता पण तेल आणि मसालेदार खाद्य पदार्थ देऊ नये.
जास्त मेहनत न घेता शरीराला शक्यतो आराम लाभदायक ठरेल.

Dr. Ankita Bora
Dr. Ankita Bora
BHMS, Homeopath, 5 yrs, Pune
Dr. Vinod Shinde
Dr. Vinod Shinde
BAMS, Ayurveda Dietitian, 17 yrs, Pune
Dr. Manna  Varghese
Dr. Manna Varghese
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Avinash Deore
Dr. Avinash Deore
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 15 yrs, Pune
Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Hellodox
x