Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

हाडे, सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्शियम महत्त्वाचे असते. त्याचबरोबर दात मजबूत होण्यासाठी देखील कॅल्शियमची आवश्यकता असते. तसंच कॅल्शियममुळे पेशी मजबूत होतात. रक्तसंचार सुरळीत होण्यात आणि मधुमेहाला आळा घालण्यात कॅल्शियम महत्त्वाची भूमिका निभावतो.

अनेकजण कॅल्शियमची कमतरता जाणवू लागल्यावर कॅल्शियमयुक्त आहार किंवा सप्लीमेंट्स घेण्यास सुरुवात करतात. पण त्यासंबंधित पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कॅल्शियमची कमतरता नेमकी कशी ओळखावी...

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे स्नायू आखडल्यासारखे वाटतात आणि दुखू लागतात. इतकंच नाही तर थकल्यासारखेही वाटते. थोडेसे काम केल्यावरही थकवा जाणवत असेल तर शरीरात कशाची तरी कमतरता आहे, हे जाणावे.
कमजोर दात, नखं, केसांचे तुटणे, गळणे, कंबर दुखणे ही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत.
झोप न येणे, भीती वाटणे, टेन्शन येणे ही देखील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होऊ शकते.
नोट-
शरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवताच डॉक्टरांच्या सल्लाशिवाय कोणतेही सप्लीमेंट्स किंवा औषधे घेऊ नका. हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डॉक्टरांचा सल्लाच कामी येईल. हिरव्या पालेभाज्या, दही, बदाम, पनीर हे कॅल्शियमचे प्रमुख स्त्रोत आहेत.

मुंबई : शरीर-मनाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला विविध पोषकतत्त्वांची आवश्यकता असते. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम. हाडे, दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.

दूध -
शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी रोज ग्लास दूध प्या. शरीराला आवश्यक असलेली कॅल्शियम यातून मिळेल. त्याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस या आजाराची संभावना कमी होईल.

चीज -
यातही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात अन्य पोषकघटकही असतात. त्यामुळे प्रमाणात पण नियमित चीज खा.

हिरव्या पालेभाज्या -
पालेभाज्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीरातील कॅल्शियमची कमी भरून निघते. ब्रोकोली, पालक यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात अवश्य समावेश करा.

सुकामेवा -
शरीरातील कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी रोज सुकामेवा खा. अक्रोड, बदाम, पिस्ता आणि काजू नियमित खाणे नक्कीच फायदेशीर ठरेल.

Dr. Niranjan Vatkar
Dr. Niranjan Vatkar
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch
Dr. Sandip  Jagtap
Dr. Sandip Jagtap
MBBS, Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist, 14 yrs, Pune
Dr. Ganesh  Jangam
Dr. Ganesh Jangam
BHMS, Homeopath Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Yatin Bhole
Dr. Yatin Bhole
DNB, Pediatrician, 9 yrs, Pune
Hellodox
x