Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

झणझणीत खाणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात? तर मग, तुमच्यासाठी एक फायद्याची गोष्ट आहे. ही गोष्ट अर्थातच तुमच्या खाण्याच्या सवयींशीच निगडीत आहे. सहसा आपल्या आहारात, रोजच्या जेवणात मिरची आली की लगेचच ती बाजूला काढली जाते. पण, काहीजण ही तिखट मिरचीही तितक्याच आवडीने खातात. मुख्य म्हणजे भल्याभल्यांना घाम फोडणारी हीच मिरची डाएटमध्ये समाविष्ट केल्यास त्याचे बरेच फायदेही होतात. चला तर मग जाणून घेऊया या तिखट, हिरव्या मिरचीच्या फायद्यांवर...

वजन घटवण्यासाठी उपयुक्त-
हिरव्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचं जास्त प्रमाण असून त्यात कॅलरीचं प्रमाण शून्य असल्यामुळे वजन घटवण्यासाठी या घटकांची मदत होते.

हाडांची बळकटी-
हाडांच्या बळकटीसाठी हिरव्या मिरचीतील अ जीवनसत्वं उपयोगी ठरतात. इतकच नव्हे, तर त्यामुळे दातही मजबूत होतात.

रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण-
मधुमेह झालेल्या अनेकांसाठी हिरव्या मिरचीचं सेवन करणं खूपच फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

मूड स्विंग-
हिरव्या मिरच्यांच्या सेवनामुळे एंडोर्फिन नावाचं रसायन तयार होतं. ज्यामुळे वेळोवेळी बदलणाऱ्या मानसिक स्थिती किंवा मूड स्विंगवर अधिकाधिक प्रमाणात नियंत्रण ठेवता येतं.

रक्तस्त्राव थांबवण्यास उपयुक्त-
एखादी जखम झाल्यास आणि त्यातून खूप रक्तस्त्राव होत असल्यास तिखट पदार्थ किंवा हिरव्या मिरच्यांचं सेवन करणं फायद्याचं ठरतं. हिरव्या मिरच्यांमध्ये व्हिटामिन के चं प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तस्त्राव थांबवण्यास त्याची मदत होते.

मधुमेह- आपल्या परिवारात कोणालाही डायबिटीज असल्यास आपण साखर कमी करावी. कारण की अनुवांशिक रूपात याचे सेवन मधुमेहाचे कारण बनू शकतं.

खाज- साखरेची अतिरिक्त मात्रा सेवन केल्याने गुप्तंगामध्ये खाज सुटण्याची तक्रार होते. याने गुप्तांगाहून अत्यधिक तरल स्त्राव आणि संक्रमण होण्याची शक्यताही असते.

हृदय रोग- अधिक साखरेमुळे हृदय नलिकेत चरबी जमा होऊन ती ब्लॉक होण्याची शक्यता असते. याने हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

इसब- त्वचेवर अधिक साखर सेवन केल्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. एका संशोधनाप्रमाणे साखरेमुळे इसब होण्याची शक्यता वाढते.

कमजोर हाडं- साखरेमुळे हाडं कमजोर होतात आणि ऑस्टिओपोरोसिस रोग होण्याची शक्यता असते.

मधुमेह फार मोठय़ा प्रमाणात पसरलेला आजार आहे. हल्ली तर लहान वयातच मधुमेह होत असल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच ह्या

रुग्णांसाठी आहारविहारांचे नियोजन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही टिप्स :-

लिंबाचा रस :
मधुमेही रुग्णांना तहान जास्त लागते. या अवस्थेत त्यांनी लिंबाचा रस प्यायला हवा. त्याने त्यांची तहान भागते.

काकडी :
मधुमेही रुग्णांनी थोडा कमी आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांना सारखी भूक लागते. काकडी खाल्ल्याने भूकशांत होऊ शकते.

गाजर-पालकाचा रस :
या रुग्णांनी डोळ्यांसाठी गाजर आणि पालकाचा रस प्यायला हवा.

बीट : मधुमेही रुग्णांना बीट, दुधी भोपळा, गिलकी, पालक, पपई इत्यादी भाज्यांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. बीटाने रक्तात असलेल्या साखरेची मात्रा कमी होऊ लागते. म्हणून बीट भाजी, परोठे, सलाड आदी प्रकारे खावी.

जांभूळ :
मधुमेहावर जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. या फळांना मधुमेहींचे फळही म्हणतात. या फळाची बी, साल, रस आणि गर सर्व मधुमेहींसाठी गुणकारी आहे. जांभळाच्या बिया एकत्र करून ठेवाव्यात. त्यात जांबोलीन नावाचा घटक असतो. स्टार्चचे साखरेत रूपांतर करण्यापासून तो रोखतो. या बियांची बारीक पूड करून ठेवावी आणि दिवसातून २-३ वेळा पाण्यासोबत घ्यावी. यामुळे साखरेचे प्रमाण कमीहोते.

कारले :
पूर्वीच्या काळापासून कारल्याचा प्रयोग मधुमेहींच्या औषधाच्या रूपात केला जात आहे. याचा कडू रस साखरेचे प्रमाण कमी करतो. मधुमेही रोग्यांना याचा रस रोज प्यायला द्यायला पाहिजे. उकळलेल्या कडुलिंबाचा रस प्यायल्यास चांगले.

मेथी :
मधुमेही रोग्यांनी मेथीदाणे पोटात जाऊ द्यावेत. मेथी दाण्याची पूड आता बाजारापर्यंत आली आहे. या पुडीमुळे मधुमेहावर नियंत्रण राहूशकते. हे चूर्ण सकाळी उपाशी पोटी २ चमचे घ्यायला हवे. काही दिवसांत याचे चांगले परिणाम दिसून येतात.

इतर उपचार :
रोज दोन चमचे कडू लिंबाचा रस, चार चमचे केळीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यायला हवा. आवळ्याचा रस ४ चमचे घेतल्यानेसुद्धा फायदा होतो.

डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचे अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठीच या टिप्स -

* साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गूळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस झालेल्या रुग्णांनी सेवन करू नये.

* ज्या भाज्या जमिनीत येतात, उदा. बटाटे, रताळू, इत्यादी भाज्या खाणे टाळाव्यात.

* केली, चीकू, आंबा, सीताफल, द्राक्ष, पपई, पेरू, ऊस आदी फळे वर्ज्य करावीत.

* काजू, मनुका, बदाम, भुईमुगांच्या शेंगा, अख्रोड आदी सुकामेवा टाळावा.

* मांसाहर टाळावा.

* भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे विचडा आदी पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

* कच्च्य भाज्या उदा. मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोथिंबिर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लिंबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.

विशेष फायदेशीर

* कारले, कडूलिंब, मेथीदाना यांचा काढा दररोज प्यावा.
* सकाळच्या पहरी मोकळ्या हवेत फिरावे.
* जास्त तणावात राहू नये.
* जागरण कमी करावे.
* नियमित व्यायाम, प्राणायाम
करावा.
* शांत झोप घ्यावी.

डायबेटिसच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचे अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठीच या टिप्स -

* साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गूळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस झालेल्या रुग्णांनी सेवन करू नये.

* ज्या भाज्या जमिनीत येतात, उदा. बटाटे, रताळू, इत्यादी भाज्या खाणे टाळाव्यात.

* केली, चीकू, आंबा, सीताफल, द्राक्ष, पपई, पेरू, ऊस आदी फळे वर्ज्य करावीत.

* काजू, मनुका, बदाम, भुईमुगांच्या शेंगा, अख्रोड आदी सुकामेवा टाळावा.

* मांसाहर टाळावा.

* भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे विचडा आदी पदार्थ कमी प्रमाणात खावेत.

* कच्च्य भाज्या उदा. मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोथिंबिर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लिंबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.

विशेष फायदेशीर
* कारले, कडूलिंब, मेथीदाना यांचा काढा दररोज प्यावा.

* सकाळच्या पहरी मोकळ्या हवेत फिरावे.

* जास्त तणावात राहू नये.

* जागरण कमी करावे.

* नियमित व्यायाम, प्राणायाम
करावा.

* शांत झोप घ्यावी.

Dr. Vasudha Pande
Dr. Vasudha Pande
MBBS, Ophthalmologist, 16 yrs, Pune
Dr. Vijay Mane
Dr. Vijay Mane
BHMS, Homeopath Family Physician, 22 yrs, Pune
Dr. Suryakant Bhise
Dr. Suryakant Bhise
BAMS, Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Pooja Hemnani
Dr. Pooja Hemnani
MPTh, Cardiovascular And Pulmonary Physiotherapist Neuro Physiotherapist, 1 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Hellodox
x