Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Burn Out म्हणजेच ऑफिसमध्ये थकवा जाणवणेही आहे आजार!
#निरोगी जिवन#थकवा आणि कंटाळा

आतापर्यंत ऑफिसमधील कामाच्या प्रेशरकडे किंवा कामाच्या प्रेशरमुळे आलेल्या थकव्याकडे सामान्य बाब म्हणून पाहिले जात होते. पण आता पहिल्यांदाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO ने बर्न आउच म्हणजेच ऑफिसमध्ये कामाच्याप प्रेशरमुळे थकवा आणि शक्तीहीन जाणवण्याच्या स्थितीला एक मेडिकल कंडिशन मानलं आहे. WHO ने त्यांच्या इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिजीजच्या यादीत बर्न आउटचा समावेश केला आहे. या यादीत समावेश झाल्यानंतर आता बर्न आउट आजारांच्या यादीत आला आहे. ज्यानंतर आता याला डायग्नोज केलं जाईल.

बर्न आउट जाणवणे आरोग्य समस्या

WHO ने २०१८ मध्ये इंटरनॅशनल क्लासिफिटेकशन ऑफ डिजीजेची यादी तयार केली होती. ही यादी वेळोवेळी अपडेट करण्यासाठी जगभरातील हेल्थ एक्सपर्ट मदत करतात. जीनेव्हातील हेल्थ असेम्बली दरम्यान अधिकृतरित्या बर्न आउट जाणवण्याच्या स्थितीला आजार मानलं आहे. त्यामुळे हेल्थ एक्सपर्ट्समध्ये यावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे.

कामाचा ताण कसा वाढतो

WHO ने बर्न आउट स्थिती समजावून सांगितली. बर्न आउट एक असा सिंड्रोम आहे जो वर्कप्लेसवर होणाऱ्या क्रॉनिक स्ट्रेस म्हणजेच कामाच्या वाढत्या ओझ्यामुळे उत्पन्न होतो आणि याला योग्यप्रकारे मॅनेज केलं गेलं नाही तर व्यक्ती बर्न आउटच्या स्थितीत पोहोचते. या सिंड्रोमचं तीन पद्धतीने विश्लेषण केलं जाऊ शकतं.

१) एनर्जी फार जास्त कमी आणि थकवा जाणवणे

२) प्रोफेशनल क्षमता आणि गुणवत्तेत कमतरता येणे

३) आपल्या कामाप्रति मनात नकारात्मक भावना येणे

WHO च्या डिजीज यादीत समावेश करण्यात आलेली बर्न आउट स्थिती केवळ काम आणि व्यावसायिक कॉन्टेक्स्टमध्ये आजाराच्या रूपाने वापरली जाणारी एक घटना आहे. याकडे जीवनाच्या इतर अनुभवांना त्याच पद्धतीने बघू नये. जगभरात लाखों लोक आपल्या कामाच्या हेक्टिक शेड्यूलमुळे प्रमाणापेक्षा जास्त थकलेले असतात आणि बर्न आउट फिल करू लागतात. इन्टाइटी हेल्थकडून १ हजार लोकांवर करण्यात आलेल्या सर्व्हेतून समोर आलं आहे की, यातील साधारण ४० टक्के लोक आठवड्यातून ३ वेळा कामामुळे तणाव आणि स्ट्रेसमध्ये असतात.

बर्न आउटची लक्षणे

- कमी झोपणे आणि सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे

- मोटिवेशनची कमतरता जाणवणे आणि कामात लक्ष लागण्यात अडचण येणे

- वर्कप्लेसवर छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे

- मित्रांपासून आणि कुटूंबियांपासून भावनिकदृष्ट्या दूर होणे

Dr. Rajesh Jagdale
Dr. Rajesh Jagdale
BAMS, Pune
Dr. Nitesh
Dr. Nitesh
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Sandeep Patil
Dr. Sandeep Patil
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Dr. Shashikant J Avhad
Dr. Shashikant J Avhad
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune