Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr.
Dr. Sandip Jagtap
MBBS Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist 14 Years Experience, Maharashtra
Consult
फोबिया म्हणजे काय?
#भीती

फोबिया

फोबिया म्हणजे काय?
फोबिया मध्ये त्रास अचानक सुरु होतो आणि काही मिनिटांपासून काही तास राहू शकतो. रुग्णांच्या मनामध्ये प्रचंड भीती बसते. त्यांना सतत कोणीतरी सोबत असावे असे वाटते. एकटे असताना झटका आला तर दवाखान्यात कोण भरती करणार अशी भीती मनामध्ये असते. कित्येक रुग्ण घराबाहेर जाण्याचे टाळतात. असे जे रुग्णांच्या वागण्यात बदल होतात त्यास "ऍग्रोफोबिया " असे म्हणतात. जर रुग्ण झटक्याविषयी सतत विचार करत असेल तर आजाराचे प्रमाण वाढते असे रुग्ण हृदयविकार तज्ज्ञांकडे जाऊन सर्व प्रकारच्या तपासण्या करून घेतात पण काही उपयोग होत नाही. डॉ. सांगून टाकतात कि तुम्हाला कोणताही आजार नाही पण रुग्ण तो त्रास अनुभवत असतो.परिणामी मनामध्ये नवीन भीती तयार होते कि,आपणास काहीतरी मोठा आजार आहे त्याचे निदानही होत नाही आणि उपचारही होत नाही.या सर्वप्रकारापासून सुटका करून घेण्यासाठी रुग्ण दारू किंवा झोपेच्या गोळ्या घेण्यास सुरुवात करतात आणि त्यांची हळूहळू सवय होत जाते.

फोबिया व आजारपणाची लक्षणे:
१) अचानक पोटामध्ये कालविल्यासारखे होणे.
२) छातीमध्ये धडधड करणे.
३) शरीराला घाम येणे.
४) श्वासोस्वास घेण्यास त्रास होणे.
५) आपण मरतो कि काय अशी भीती वाटणे.
६) हातापायास मुंग्या येणे.
७) छातीमध्ये दुखू लागणे.
८) चक्कर येणे.
९) शरीरामध्ये कंम्प सुटणे.
१०) आपण पागल होतो कि काय अशी भीती वाटणे.

फोबियावरील उपचार :
१) सायकोथेरपी : रुग्णाच्या वागण्याच्या आणि विचार करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणला जातो.
२) रेलॅक्ससेशन थेरपी : झटका आल्यानंतरही रिलॅक्स राहण्यासाठी उपचार केला जातो.
३) बिहेविअर थेरपी : एकटेपणाची भीती नाहीशी केली जाते.
४) औषधोपचार : वेगवेगळ्या प्रकारची औषधी उपलब्ध आहेत ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेता येतात, उपचार साधारण ३ ते ६ महिने चालतो.

Dr. Vinod Shinde
Dr. Vinod Shinde
BAMS, Ayurveda Dietitian, 17 yrs, Pune
Dr. Manna  Varghese
Dr. Manna Varghese
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Mayur Ingale
Dr. Mayur Ingale
MBBS, ENT Specialist, 4 yrs, Pune
Dr. Nishant Vyavahare
Dr. Nishant Vyavahare
MDS, Dentist, 13 yrs, Pune
Dr. Piyush  Jain
Dr. Piyush Jain
MS - Allopathy, Ophthalmologist Pediatric Ophthalmologist, 5 yrs, Pune