Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
उकडीचे मोदक आरोग्यास लाभदायक
#सुपर फूड्स#निरोगी उपचार#निरोगी जिवन

गणपती बाप्पा आज घरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांचा सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक. आज प्रत्येकाकडे उकडीचे मोदक असणारच. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हमखास असणारा एक पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट तितकेच आरोग्यालाही फायदेशीर आहे. जाणून घ्या उकडीच्या मोदकाचे हे आरोग्यदायी फायदे.
वजन घटवण्यास मदत - वेट लॉसच्या मिशनवर आहात म्हणून गोड खाणं टाळत असाल तरीही मोदक त्याला अपावाद ठरू शक्तो. कारण मोदकामध्ये फॅट्स आणि आवश्यक पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो. उकडीच्या मोदकाने पोट तृप्त होते सोबतच मनही शांत राहण्यास मदत होते.

कमी कोलेस्ट्रेरॉल - उकडीच्या मोदकामध्ये कोलेस्ट्रेरॉल कमी प्रमाणात असते. नारळ आणि सुकामेवा यामधील आरोग्यदायी घटक वाईट कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करतात तर चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढवतात.

रक्तदाब आटोक्यात - नारळामधील काही घटक हृद्याचे आरोग्य जपण्यास मदत करतात. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही फायदेशीर ठरतात.

सांधेदुखी - गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तूप हे प्रभावी औषध आहे. मोदकामध्ये तूपाचा समावेश असल्यास सांध्याच्या दुखण्याचे त्रास आटोक्यात ठेवण्यात मदत होते.

पोटाचे आरोग्य सुधारते - बद्धकोष्ठतेसारख्या समस्येचा त्रास कमी करण्यास उकडीचे मोदक फायदेशीर आहेत. मोदकातील पुरणामध्ये तूप असते. यामुळे आतड्यांजवळील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

Dr. Suryakant Bhoite
Dr. Suryakant Bhoite
BAMS, Family Physician, 34 yrs, Pune
Dr. Amruta Siddha
Dr. Amruta Siddha
MBBS, ENT Specialist, 9 yrs, Pune
Dr. Akash Kadam
Dr. Akash Kadam
BDS, Dentist Oral Medicine Specialist, 4 yrs, Pune
Dr. Amarsinha Nikam
Dr. Amarsinha Nikam
MD - Homeopathy, Homeopath, 33 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune