Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
दातदुखी
#रोग तपशील#दातदुखीदातदुखी लक्षण कारणे आणि उपाय
* साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. दात किडल्यावर ती कीड पार दाताच्या हृदयापर्यंत (डेंटल पल्प) पोहचते. त्यामुळे होणाऱ्या वेदना डोक्यापर्यंत जातात.
* हिरड्यांचे रोग झाले असल्यास दात दुखतात.
* अपघातात जबड्याला दुखापत झाल्यास अनेकदा दातदुखी होते.
* एड्समध्ये काही लक्षणं ही दातांच्या रोगांशी निगडीत असतात.


दातदुखी झाल्यावर काय?
* दात दुखायला लागले, की अनेक जण पेन किलर घेतात. पेन किलर घेतल्यानंतर दातदुखी तात्पुरती थांबते. पण, संपूर्ण आराम मिळत नाही. त्यामुळे डेंटिस्टकडे जाणं हा उत्तम उपाय आहे.
* दातांच्या हृदयापर्यंत कीड गेली असेल (पल्प डीसिज) आणि त्यामुळे दात दुखत असतील, तर रूट कॅनाल ट्रीटमेंट करावी लागते. ही ट्रीटमेंट केल्यानंतर पाच मिनिटांच्या आत दातदुखी थांबते.
* काही हिरड्यांचे रोग हे फक्त दात साफ करून किंवा अगदी लहान ऑपरेशन करूनही बरे होतात.


डेंटिस्ट केव्हा?
* साधारणपणे दाताच्या मुळापर्यंत दुखणं गेलं, की लोक डेंटिस्टकडे धाव घेतात.
* अनेकदा दात दुखत नसतील, तरी इतर आजारांसाठी लोक डेंटिस्टकडे धाव घेतात. यात अनेकदा जबड्याचे स्नायू दुखणे, डोळे किंवा कान दुखणं, अर्धशीशी यांचा समावेश असतो. या दुखण्याला 'ओरोफेशियल पेन' असं म्हणतात.
* 'ओरोफेशियल पेन'शी लढण्यासाठी आता डेंटिस्ट 'मॅनेजमेंट ऑफ ओरोफेशियल पेन' हे नवीन तंत्रज्ञान वापरतात.


सॉफ्ट टागेर्ट्स
* गरोदर बायकांना हिरड्यांचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.
* डायबीटिस झालेल्यांनीही दातांची काळजी घ्यावी.
* हृदयाचे विकार असणाऱ्यांना दातदुखी किंवा दातांचे आजार संभवतात.
* लहान मुलांना दातांचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
* दात चावण्याची सवय असलेल्या लोकांना दातांचे आजार आणि दातदुखी होण्याची शक्यता जास्त असते.
* तोंडाचे आजार झालेल्यांना दातांचे आजार पटकन होऊ शकतात.


दुर्लक्ष का?
* ९० टक्के लोकांना कीड दाताच्या गाभ्यापर्यंत पोहचली, तरी त्यांचे दात दुखत नाही. त्यामुळे दातांच्या आरोग्याकडे अनेक लोकांचं दुर्लक्ष होतं.
* दातांच्या आजारामुळे मृत्यू होत नसल्याने दातांचं दुखणं गंभीरपणे घेतलं जात नाही.
* देशातील ६० टक्के लोक गरीब किंवा अशिक्षित आहेत. दैनंदिन गरजा भागवण्यात त्यांचा बराचसा वेळ जातो. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं.
* बऱ्याचदा सुशिक्षित लोक इतर गोष्टींप्रमाणे दातांच्या आरोग्याला प्राधान्य देत नाहीत. त्यामुळे दातांच्या दुखण्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं.


दातदुखी टाळण्यासाठी काय?
* मागील भागात सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज दातांची स्वच्छता ठेवायलाच हवी.
* दर सहा महिन्यांनी एकदा डेंटिस्टकडे जाऊन दातांची तपासणी करावी. यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेत असलेले दातांचे आजार कळून येतात. यामुळे अशा दातांच्या आजारांवर वेळेत उपचार करणंही शक्य होतं.
* आपल्या जीवनपद्धतीत आवश्यक ते बदल केल्यास दातांचे अनेक आजार आणि दातदुखी टळू शकते.
* सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'उपचारापेक्षा खबरदारी चांगली' ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. दातांच्या आरोग्यावर आपलं सर्वांगीण आरोग्य अवलंबून असतं. त्यामुळे आपल्या मौल्यवान दातांची काळजी घेणं, हे खूप महत्त्वाचं आणि आवश्यक असतं.

Dr. Shashikant J Avhad
Dr. Shashikant J Avhad
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Sachin Nandedkar
Dr. Sachin Nandedkar
MS/MD - Ayurveda, Obesity Specialist Ayurveda, 22 yrs, Pune
Dr. Kirtiraj Dilip Kate
Dr. Kirtiraj Dilip Kate
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Praisy David
Dr. Praisy David
BAMS, Pune
Dr. Sabir Patel
Dr. Sabir Patel
MBBS, General Medicine Physician General Physician, 2 yrs, Bharuch