Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
टॉन्सिलिटिस
#रोग तपशील#घशातील गाठींची सूज



टॉन्सिलिटिस : दरवर्षी लक्षावधी लोक टॉन्सिलिटिसने ग्रस्त असतात. खालील लेखाच्या माध्यमातून टॉन्सिलिटिसची लक्षणं आणि उपचार याची माहिती आपण घेऊयात. त्यात घरगुती आणि डॉक्टरांनी करावयाच्या उपचारांचाही मागोवा घेतला आहे.

टॉन्सिलिटिस म्हणजे काय?
टॉन्सिलिटिस हा टॉन्सिल्सना म्हणजे घशाच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पेशींच्या दोन पुंजक्यांना होणारा संसर्ग होय. हा संसर्ग सामान्यपणे विषाणूंमुळे होतो. पण कधी-कधी तो जीवाणूमुळेही होऊ शकतो. स्ट्रेप्टोकॉकसच्या 'अ' गटातील जीवाणूंमुळे हा संसर्ग झाल्यास त्याला 'स्ट्रेप थ्रोट' असं म्हणतात. बहुतांश लोकांमध्ये औषधं न देताही काही दिवसात हा संसर्ग बरा होतो. बहुतांश लक्षणं ७-१० दिवसांमध्ये नाहीशी होतात.

टॉन्सिलिटिसच्या मुख्य बाबी
टॉन्सिलिटिसबाबतचे महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. अधिक तपशील आणि त्यासोबतची माहिती मुख्य लेखामध्ये आहे.
- टॉन्सिलिटिस हा जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे होऊ शकतो.
- बहुतांश टॉन्सिलिटिसच्या केसेस १० दिवसांच्या आत आपोआप बऱ्या होतात.
- घसा आणि जीवाणूंच्या चाचणीतून टॉन्सिलिटिसचे निदान करता येऊ शकते.
- संसर्गाला कारणीभूत होणारे अनेक घटक असून ते या आजाराला कारण ठरतात.
- टॉन्सिल्स हे बाह्य रोगजंतूंच्या विरुद्ध शरीराच्या संरक्षणाची पहिला फळी असतात.

मूलभूत उपचार
1. विश्रांती - विश्रांतीच्या काळात आपले शरीर दैनंदिर कामांवर ऊर्जा खर्च करण्याऐवजी संसर्गाशी सामना करण्यावर ती एकाग्र करु शकतो.
2. द्रव पदार्थ - द्रव पदार्थांमुळे आपला घसा कोरडा पडत नाही आणि जास्त त्रासदायक ठरत नाही.
3. मीठाचे पाणी - मीठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने त्रास कमी होऊ शकतो.
4. आर्द्रता - आर्द्र हवेमध्ये किंवा वाफयुक्त बाथरुममध्ये बसल्याने कोरड्या हवेचा होणारा त्रास कमी होऊ शकतो.
5. त्रासदायक गोष्टी टाळणं - धुम्रपान टाळा, धुराने भरलेल्या जागा टाळा.
6. औषधोपचार - वेदना आणि ताप यावर इब्युप्रोफेन किंवा अॅसिटामिनोफेन घेऊन उपचार करता येऊ शकतात.

प्रतिजैविकं
टॉन्सिलिटिसला जीवाणूंचा संसर्ग कारणीभूत असेल तर बहुतांश वेळेस प्रतिजैविकं देण्यात येतात. पेन्सिलिन हे सर्वसामान्यपणे वापरण्यात येतं. लक्षणं दूर होवोत वा न होवोत, पण प्रतिजैविकांचा पूर्ण कोर्स घ्यायला हवा. असं न केल्यास संसर्ग वाढू शकतो आणि लांबच्या टप्प्यात ऱ्ह्युमॅटिक ताप किंवा मूत्रपिंडाची सूज हे त्रास होऊ शकतात.

शस्त्रक्रिया
टॉन्सिलिटिसवर सामान्यपणे शस्त्रक्रिया करण्यात येत असे. आताच्या काळात अगदीच गंभीर आणि वारंवार उद्भवणारा नसेल, तर टॉन्सिलेक्टॉमीजचा वापर करण्यात येत नाही. स्लीप अॅप्निया, श्वास घेताना किंवा गिळताना त्रास होणं किंवा उपचारास अवघड असणारे अॅबसेस अशा दुय्यम समस्या उद्भवत असतील तर टॉन्सिलेक्टॉमी करावी लागते. शस्त्रक्रिया ही वाढत्या प्रमाणात शेवटचा उपाय म्हणून योजण्यात येत आहे. शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम हे टॉन्सिल्स काढून टाकण्याच्या सकारात्मक परिणामांपेक्षा जास्त असल्याचं मानण्यात येतं.

Dr. Ashwin Prasad
Dr. Ashwin Prasad
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Cosmetic Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Nirnjn P.
Dr. Nirnjn P.
MD - Allopathy, Diabetologist Physician, 9 yrs, Pune
Dr. Sonawane Shivani
Dr. Sonawane Shivani
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 3 yrs, Pune
Dr. Ashwini Hirekar
Dr. Ashwini Hirekar
BHMS, Homeopath Family Physician, 4 yrs, Mumbai Suburban
Dr. Nishant Vyavahare
Dr. Nishant Vyavahare
MDS, Dentist, 13 yrs, Pune