Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
देशभरात स्वाइन फ्लू घालतोय थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणं, उपाय आणि कारणं
#स्वाइन फ्लू

पावसाळा आपल्यासोबत अनेक आजार घेऊन येतो. खरं तर पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असतो, त्यामुळे अनेक घातक बॅक्टेरिया पसरण्याचा धोका आणखी वाढतो. पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया या आजारांसोबत स्वाइन फ्लू देखील वेगाने पसरतो. H1N1 व्हायरसमुळे पसरणारा हा आजार सध्या हळूहळू आपलं डोकं वर काढताना दिसत आहे. देशभरामध्ये काही ठिकाणी स्वाइन फ्लूने पीडित रूग्ण आढळून आले असून काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. वेळेनुसार, या आकड्यांमध्ये वाढ होत आहे. जाणून घेऊया या आजाराचची लक्षणं, उपाय आणि कारणांबाबत...

काय आहे स्वाइन फ्लू (Swine Flu)?

स्वाइन इन्फ्लूएंजा हा एक संसर्गजन्य श्वसनाचा विकार आहे. जो साधारणतः डुकरांमध्ये आढळून येतो. हा आजार स्वाइन इन्फ्लूएंजा ए हा व्हायरस H1N1 स्ट्रेंसमुळे होतो. दरम्यान H1N2, H3N1 आणि H3N2च्या रूपामध्ये इतर डुकरांमध्ये हा व्हायरस अस्तित्वात असतो. खरं तर लोकांना स्वाइन फ्लूची लागण होणं हे सामान्य नाही. डुकरांच्या संपर्कात आल्याने होऊ शकतो.

स्वाइन फ्लूची लक्षणं (Symptoms of Swine Flu)

ताप आणि खोकला, घसा खराब होणं, सतत नाक वाहणं किंवा बंद होणं, श्वसनाचे विकार त्याचप्रमाणे अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, थंडी वाजणं, उलट्या होणं, कफ इत्यादी स्वाइन फ्लूची सामान्य लक्षणं आहेत. यांपैकी कोणतंही लक्षण दिसून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

असा पसरतो स्वाइन फ्लू :

- स्वाइन फ्लूच्या व्हायरसचा हवेमध्ये संसर्ग होतो.

- खोकला, शिंका येणं, थुंकणं यांमुळे हा व्हायरस हवेमार्फत इतर लोकांमध्ये पोहोचतो.

आराम करणं ठरतं फायदेशीर :

स्वाइन फ्लू पासून बचाव करणं हे रोखण्याचा उत्तम उपाय आहे. तसेच स्वाइन फ्लूवर योग्य ती औषधंही अस्तित्वात आहेत. आराम करणं, खूप पाणी पिणं, शरीरामध्ये पाणी कमी होऊ न देणं हा स्वाइन फ्लूवरील सर्वात उत्तम उपाय आहे.

सुरूवातीला पॅरासीटामॉलसारखी औषधं ताप कमी करण्यासाठी देण्यात येतात. जर समस्या आणखी वाढल्या तर टॅमी फ्लू आणि रेलंजा यांसारखी औषधं देण्यात येतात. परंतु ही औषधं डॉक्टरांच्या सल्लाने घेणं फायदेशीर ठरतं. स्वतःहून कोणतंच औषध घेऊ नये.
स्वाइन फ्लूमध्ये होणारे सर्दी-खोकला यांसारख्या लक्षणांवर उपाय म्हणून तुम्ही काही घरगुती उपायही ट्राय करू शकता. तुळस, कापूर, लसूण, कोरफड, आवळा यांसारखे आयुर्वेदिक उपायही स्वाइन फ्लूवर परिणाकारक ठरतात.

स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी हे उपाय करा :

- सतत साबण आणि पाण्यावे आपले हात स्वच्छ करा.

- जेव्हा खोकला किंवा शिंका येतील त्यावेळी तोंड आणि नाक टिश्यूच्या मदतीने झाकूण घ्या.

- वापरलेले टिश्यू लगेच टाकून त्या. पुन्हा वापरू नका. एका बॅगमध्ये व्यवस्थित टाकून त्याची विल्हेवाट लावा.

- ज्या वस्तूंना तुम्ही दररोज स्पर्श करता, त्या व्यवस्थित स्वच्छ ठेवा.

स्वाइन फ्लूपासून बचावासाठी काही घरगुती उपाय :

1. तुळस

तुळशीमध्ये अ‍ॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅन्टी-व्हायरस गुणधर्म आढळून येतात. यांमध्ये इम्युनिटी सिस्टम मजबुत करण्यासाठी मदत करते. याचा अर्थ असा नाही की, स्वाइन फ्लू एकदम बरा करण्यासाठी तुळस मदत करते. परंतु, 'एच1एन1' व्हायरसशी लढण्यासाठी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी तुम्हाला दररोज तुळशीची पानं चावून खाणं फायदेशीर ठरतं. तसेच तुळशीचा काढा किंवा चहा पिणंही फायदेशीर ठरतं.

2. गुळवेल

आयुर्वेदामध्ये गुळवेलीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. याचा काढा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. याची एक फांदी तुळशीच्या काढ्यासोबत 10 ते 15 मिनिटं उकळून घ्यावी. थंड झाल्यानंतर यामध्ये थोडी काळी मिरी, खडी साखर, सैंधव मीठ किंवा काळं मीठ एकत्र करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते.

3. लसूण

लसणामध्ये अ‍ॅन्टी-व्हायरल गुणधर्म असतात. जे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्यासाठी लसणाच्या दोन पाकळ्या दररोज सकाळी अनोशापोटी कोमट पाण्यासोबत घेणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Vishwajeet Desai
Dr. Vishwajeet Desai
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 8 yrs, Pune
Dr. Jitendar Choudhary
Dr. Jitendar Choudhary
BHMS, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. MUKUL TAMHANE
Dr. MUKUL TAMHANE
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Spinal Pain Specialist, 3 yrs, Pune
Dr. Sanjeev Parmar
Dr. Sanjeev Parmar
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 16 yrs, Pune
Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune