Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
त्वचेवर ऍलर्जी होणे
#रोग तपशील#ऍलर्जी#त्वचेची अलर्जी



त्वचेवर ऍलर्जी होणे

ऋतुबदलामध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा असे सातत्याने ऋतुबदल होत राहिले, तर त्वचेचा पोत बदलतो. त्वचा खराब होते. अशावेळी त्वचेला काळजी आणि पोषणाची आ‍वश्यकता असते. त्वचा ही लहान बाळाप्रमाणे नाजूक असते. तिची काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेविषयी आपल्या मनात अनेक चुकीच्या संकल्पना, गैरसमज असतात. अनेक हानिकारक रसायने, द्रव्यांचा मारा आपण त्वचेवर करतो. त्यामुळे त्वचेचा पोत बिघडतो. अन्य कोणाच्याही त्वचेला चालणारे घटक आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असतीलच असे नाही. त्यामुळे कोणतेही उप्तादन वापण्यापूर्वी विचार करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या!

ऋतुबदलातील गुंतागुंतीमुळे हवेतील आर्द्रता वाढते. अशावेळी घाम येतो आणि तेलकटपणा वाढतो. त्यामुळे नेहमीपेक्षा त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

चेहऱ्याची त्वचा : त्वचेचे ढोबळमानाने तीन प्रकार असतात. कोरडी त्वचा, तेलकट आणि दोन्ही प्रकारचे मिश्रण असलेली त्वचा. यात गालाची त्वचा कोरडी असते. चेहऱ्याच्या त्वचेचा टी-झोन हा तेलकट असतो.

कोरड्या त्वचेची पावसाळ्यात घ्यायची काळजी : आर्द्रतायुक्त त्वचा ही चांगली त्वचा समजली जाते. मात्र, ऋतुबदलामुळे त्वचेवर विविध प्रकारच्या अॅलर्जीचा मारा होत असतो. कोरड्या त्वचेवर अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते. या त्वचेवर कोणत्याही प्रकारची चमक नसते. इमोलिएन्ट प्रकारचे मॉइश्चरायझर हे त्वचेच्या सर्वात वरच्या थरावर पसरते आणि त्वचेवर पडणाऱ्या पाण्याच्या थेंबाचे बाप्पीभवन रोखते. काही प्रकारच्या मॉइश्चरायझर्समध्ये त्वचेची दुरुस्ती करणारे एनएएफ (सिरामाइडस्) हे घटक असतात. त्यामुळे अॅलर्जी व त्वचारोग बरे होतात. मात्र, आपल्या त्वचेचा पोत नेमका कोणता आहे, त्यानुसार त्वचाविकारांना कशाप्रकारचे वैद्यकीय उपचार द्यायला हवेत, हे समजून घ्यायला हवे.

तेलकट त्वचा : तैलग्रंथीचे नियंत्रण त्वचेतील संप्रेरके करतात. ही संप्रेरके पावसाळ्यात अधिक प्रमाणात कार्यरत होतात. यामुळे त्वचा चिकट होते. आणि जेव्हा तेलकट त्वचा असलेल्या व्यक्ती आपल्या त्वचेचा चिकटपणा घालवण्यासाठी सौंदर्य प्रसाधने त्वचेवर लावतात, तेव्हा त्याची परिणिती मुरुमे आणि पुटकुळ्या येण्यात होते. तेलकट त्वचा असल्यास त्वचेतील तैलग्रंथीवर परिणाम करणाऱ्या औषधी फेस वॉशचा वापर दिवसांतून दोन ते तीन वेळा करणे गरजेचे आह. दिवसभरात तेलकटपणा प्रमाणात ठेवण्यासाठी चेहरा दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने धुवावा. त्यापेक्षा अधिक वेळा चेहरा धुवू नये त्यामुळे तैलग्रंथींना अधिक प्रमाणात तैलपदार्थ स्त्रवण्यसाठी प्रोत्साहन मिळते.

तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी मेकअपचा वापर टाळावा, चिकट-आर्द्र वातावरणत क्रीमऐवजी लोशनचा वापर करावा आठवड्यातून एकदा माफक प्रमाणात स्क्रबिंग केले जाऊ शकते. मात्र, मुरुमे असलेल्या त्वचेचे स्क्रबिंग करणे टाळावे. त्वचातज्ज्ञांचा सल्ला घेऊन मुरुमांवर वेळीच उपचार करावे.

अॅलर्जी किंवा अतिहर्शिता ही लहान मुलांमध्ये दिसून येणारी सर्व साधारण समस्या आहे. शरीरामध्ये कुठल्याही अनोळखी गोष्टीचा शिरकाव झाल्यास शरीर त्या गोष्टीला पळवून लावण्यासाठी आपल्या प्रतिकार शक्तीचा उपयोग करून घेत असतं. कधी कधी ही प्रतिकार शक्ती अती प्रतिसाद देते आणि त्यामुळेच शरीरात निर्माण झालेल्या अॅन्टीबॉडीजमुळे (आयजीइ) शरीराच्या विविध अवयवांवर त्याचा प्रभाव दिसू लागतो. उदा. त्वचा, श्वसन मार्ग, पोटातील आतडी, डोळे. हे सर्व त्या परकीय घुसखोराला परतवून लावण्याचे प्रयत्न असतात. आपल्या स्वत:च्या शरीरातील अॅन्टीबॉडीजचा आघात झाल्याने रक्तामध्ये इस्टामाईन नावाचं रासायनिक द्रव्य तयार होतं. यामुळेच आपल्याला विविध अॅलर्जीची लक्षणं दिसू लागतात. अॅलर्जी ही लहान मुलांमध्ये प्रामुख्याने चार प्रकारची आढळून येते. अॅलर्जीमुळे होणारी वारंवार सर्दी (जी तुमच्या मुलीमध्ये दिसत आहे), अॅलर्जीमुळे दिसणारा बाल दमा, अॅलर्जीचा रूक्ष त्वचेवरील प्रभाव (अॅटॉपी), आणि अन्न पदार्थांमधून होणारी अॅलर्जी. (फूड अॅलर्जी) हवेतून, अन्नातून आणि त्वचेला होणा‍‍ऱ्या स्पर्शातून, डास आदी कीटक चावून किंवा औषधाचं इंजेक्शन या मार्फत अॅलर्जीचं संक्रमण होत असतं. सर्व साधारणपणे दिसणारी लक्षणं म्हणजे वारंवार शिंका येणं, नाकाला, कानाला, डोक्याला खाज येणं, त्वचा रूक्ष होऊन, त्यावर चटके पडून खाज येणं, सर्दीमुळे नाक चोंदणं, कधी कधी खोकला आणि पोटात दुखून उलटी किंवा अतिसार होणं अशी लक्षणं दिसू शकतात. तुमच्या मुलीमध्ये जर वारंवार सर्दी पडसं किंवा वरील लक्षणांपैकी कुठलंही लक्षण दिसत असेल तर अॅलर्जीक रायनीटीज (allergic rhinitis) हे निदान करता येऊ शकतं. अॅलर्जी ही सौम्य ते तीव्र या दोन प्रकारची असू शकते. तीव्र प्रकारच्या अॅलर्जीला अॅनाफीलक्सीस (anaphylaxis) असं म्हटलं जातं. अशी तीव्र प्रकारची अॅलर्जी असल्यास श्वास घ्यायला त्रास होणं, गुदमरल्यासारखं होणं किंवा चक्कर ही लक्षणं दिसतात. अशा वेळेस त्वरित अतिदक्षता विभागात दाखल करून औषधोपचार करणं अत्यावश्यक आहे. पण तुमच्या मुलीमध्ये सौम्य प्रकारची अॅलर्जी असल्याने चिंता करण्याची गरज नाही. अॅलर्जीसाठी कायम स्वरुपी उपचार नसल्याने ती टाळण्यासाठीच म्हणूनच आपण काही गोष्टी करू शकतो. हवेतून होणारी अॅलर्जी सर्व साधारणपणे डस्ट माईट्स (dust mites) किंवा पराग कण किंवा पाळीव प्राण्यांच्या केसांमुळे होण्याची शक्यता असते. तर अशा गोष्टींपासून मुलीला दूर ठेवणं गरजेचं आहे. घरातील डस्ट माईट्स कमी होण्यासाठी नियमितपणे व्हॅक्युम क्लीनरने मुलीची झोपण्याची जागा, खेळायची जागा, सॉफ्ट टॉइज स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जिथे धूळ जमा होते, ते कार्पेट, पांघरूण, रग, इत्यादी गोष्टी गरम पाण्याने धुणं आवश्यक असतं. कुठल्या प्रकारच्या गोष्टींची अॅलर्जी आहे, हे शोधण्यासाठी आज काल अॅलर्जी टेस्टिंग उपलब्ध आहे. जर खूपच जास्त त्रास होत असेल तर अॅलर्जी स्पेशलीस्टकडे किंवा बालरोगतज्ज्ञांकडे जाऊन अॅलर्जी टेस्टिंग करून घेणं आणि गरज भासल्यास इम्यून थेरपी करून घेणं योग्य ठरेल. परंतु काही गोष्टी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केल्यास फायदा होऊ शकतो. उदा. मुलांना थंड हवेचा झोत, अती तेलकट पदार्थ, फ्रीजमधलं थंड पाणी, आंबट फळं, ओलसर जागा या गोष्टींपासून लांब ठेवा. मग सर्दी-पडशासारख्या गोष्टी तुमच्या मुलीपासून लांब पळून जातील.

Dr. Sachin Nandedkar
Dr. Sachin Nandedkar
MS/MD - Ayurveda, Obesity Specialist Ayurveda, 22 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Sonal Shendkar
Dr. Sonal Shendkar
MBBS, Dermatologist Medical Cosmetologist, 7 yrs, Pune
Dr. Ajay Rokade
Dr. Ajay Rokade
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Sachin Kuldhar
Dr. Sachin Kuldhar
BHMS, Gynaecologist Homeopath, 8 yrs, Pune