Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
नायटा (गजकर्ण)
#रोग तपशील#बुरशीजन्य संसर्ग



नायटा (गजकर्ण):

नायटे निरनिराळ्या प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत, कमरेवर दगडफूलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यात त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य करणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज, नायटा वाढतात. कडा असलेल्या गोलाकार स्वरुपात त्वचेवर उठणारा नायटा हा एक प्रकारच्या बुरशी, आळब्यासारख्या सुक्ष्म शेवाळामुळे होणारा रोग आहे. चामडीच्या कोणत्याही भागावर गोलाकार चट्टे उठतात. पण विशेषतः काखा, जांघा, बोटांच्या मधील भाग इ. नेहमी ओलसर राहणाऱ्या जागांमध्ये याचे प्रमाण जास्त असते. आपल्याकडे डोक्यामध्ये होणाऱ्या नायटाचे प्रमाण त्यामानाने कमीच आहे. कंबर व जननेन्द्रियाजवळील भागाला सुद्धा नायटा होतो. हे चट्टे गोलाकार असल्यामुळे त्यांना रिंग वर्म म्हणतात. त्यांना कमालीची खाज सुटते. जर हा चट्टा केसात झाला तर केस जावून तेवढया ठिकाणी टक्कल पडते आणि नखांवर झाला ते नखे वर उचलली जाऊन खरखरीत व वाकडी होता.

नायटे निरनिराळया प्रकारचे असतात. नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर,जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई,एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी.
अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही. या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण वाढतात
लक्षणे हे दोन्हीही आजार कंबर, पोट, मांडया,जांघा, इत्यादी भागांत जास्त करून होतात. यामुळे खूप खाज सुटते. गजकर्ण व नायटयाची वाढ वेगाने होते, पण कातडीवर बधिरता मात्र नसते. यावरून कुष्ठरोगापासून हे आजार वेगळे ओळखता येतात. (कुष्ठरोगात चट्टयांना खाज सुटत नाही व कमी अधिक बधिरता येते.)

लक्षणे
1. हा आजार कंबर, पोट, मांड्या, जांघा इ. भागात जास्त करून होतात.
2. खूप खाज सुटते व नायटाची वाढ वेगाने होते.
3. पण कातडीवर बधीरता मात्र नसते.

उपचार
स्वच्छता ही प्रथम महत्त्वाची आहे. - (रोज आंघोळ करणे, नखे कापणे.)
गजकर्ण, नायटयाचा भाग गरम पाणी व साबणाने स्वच्छ धुऊन नायटा मलम (व्हिटफिल्ड) रोज चोळून लावावे. व्हिटफिल्ड मलमाने सुरुवातीला आग होते, पण दोन-तीन आठवडयांत आराम पडतो व चट्टा जातो. नंतर आठवडाभर तरी मलम लावत राहावे. नाही तर नायटा परत उमटतो. व्हिटफिल्ड मलमापेक्षा मायकोल मलम जास्त चांगले आहे. याचा परिणाम लवकर (10 दिवसांत) होतो.
- नखे कापावीत.
- नायटा झालेला भाग साबण व स्वच्छ पाण्याने रोज धुतला तर हा रोग बरा होतो.
- हेक्झाक्लेरोफिन असलेल्या साबणाचा जास्त उपयोग होतो.
- घामाने भिजलेले सगळे कपडे नेहमी बदलावेत व स्वच्छ धुवून कोरडे असतांना वापरावे.
- नायटा झालेली जागा नेहमी स्वच्छ ठेवून ती सुर्यप्रकाशात राहील असा प्रयत्न करावा. १ भाग सल्फर व १० भाग तेल यांचे मिश्रण करून नायटा झालेल्या जागी लावावे.
- बाजारात मिळणारी नायटा, गजकर्ण विरोधी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.
- डोक्यात खवडे झाले असल्यास बाजारात मिळणारी मलमे आणि औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावीत.
- डोक्यातील नायटा पाण्याचा शेक देऊन तेथील केस उपटून वरील औषधांचा उपयोग करावा.

आयुर्वेद
गजकर्णासाठी उपाय करताना त्वचा कोरडी राहील अशी काळजी घेणे आवश्यक आहे. (अ) गजकर्णाच्या भागावर करंजतेलाचा बोळा घासावा.(ब) या बाह्य उपचाराबरोबर कोठा स्वच्छ राहण्यासाठी त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमट पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे 10दिवस घ्यावे. नायटयासाठी आणखी एक पर्यायी बाह्य उपाय म्हणजे बहाव्याची कोवळी पाने वाटून सकाळ- संध्याकाळ लेप द्यावा.

नायटा कसा टाळावा ?
नायटा व त्यासारखे चामडीचे बुरशीजन्य इतर विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात, ते टाळण्यासाठी पुढील गोष्टी कराव्यात.

नायटा झालेल्या रुग्णाला वेगळे झोपवावे.
1. एकच फणी व एकमेकांचे कपडे ( स्वच्छ धुऊन वाळविल्याशिवाय) वापरू नयेत.
2. नायटा झालेल्या रुग्णांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने लवकरात लवकर उपचार करावेत.
3. बाह्य उपचारांबरोबरच पोट सुद्धा साफ असणे गरजेचे आहे. त्वचा नेहमी कोरडी राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune
Dr. Sneha Jain
Dr. Sneha Jain
MD - Homeopathy, Homeopath, 4 yrs, Pune
Dr. Anand  Kale
Dr. Anand Kale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 2 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune