Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
डोळे लाल होणे
#रोग तपशील#गुलाबी डोळा



डोळे लाल होणे :

विविध व्हायरस आणि संसर्गांमुळे डोळे लाल होणे सामान्य लक्षण आहे. तसेच डोळ्यांच्या संसर्गामुळेही डोळे लाल होणे, त्यातून पाणी निघणे, डोळ्यांच्या चारही बाजूंनी सूज येणे आणि प्रकाशाच्या प्रतिसंवेदनशील होणे यासारख्या लक्षणांचाही सामना करावा लागतो. अशा स्थितीत डॉक्टर्स पीडितास अँटिव्हायरल ड्रॉप्स घेण्याचा सल्ला देतात. याशिवायही अनेक कारणे आहेत.

उच्च रक्तदाब : डोळ्यांच्या पांढर्‍या भागावर दीर्घ काळापर्यंत किंवा कायमस्वरूपी लाल रंगाचा चट्टा दिसणे हा उच्च रक्तदाबाचा संकेत असू शकतो. अशा स्थितीत पीडिताच्या रक्तवाहिन्या सामान्यापेक्षा अधिक पसरायला लागतात. एवढेच नाही तर अनेकवेळा वाहिन्या बस्ट म्हणजे फाटण्याचाही धोका असतो.
1. हॅमरेज : जर एक डोळा अचानकपणे लाल झाला असेल तर हे हॅमरेज असू शकते. अशावेळी आयबॉलच्या पुढच्या भागाच्या पातळ थरावर रक्त लीक झाल्यावर झळकू लागते. सामान्यत: ही समस्या वयोवृद्धांमध्ये असते. डोळे कोरडे पडणे रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोनल बदलांमुळे डोळ्यांच्या ओलाव्याला नुकसान पोहोचते. अशावेळी डोळे कोरडे पडायला लागतात. त्यासाठी पीडिताने दर दहा मिनिटांमध्ये 20 सेकंदांसाठी डोळे बंद करत राहावे. याशिवाय एअर-कंडीशंड कार्यालयात काम करणे किंवा दीर्घ काळापर्यंत लेंस लावून ठेवल्याने सुद्धा डोळे कोरडे होतात. अशा स्थितीत डॉक्टर डोळ्यांचा ओलावा कायम राहावा यासाठी आय ड्रॉप्सचा वापर करण्याचा सल्ला देतात.

2. डोळ्यांतून पाणी येणे जेव्हा डोळ्यांची अर्शू वाहिनी ब्लॉक होते तेव्हा डोळ्यांतून अर्शू निघणे बंद होते. अशावेळी या वाहिन्यांतून चिकट पदार्थ निघायला लागतो आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. यादरम्यान पीडिताच्या डोळ्यांच्या चारही बाजूंनी सूज येते किंवा वेदना होऊ शकतात. वाढत्या वयासोबत त्वचेचे कोलेजन (त्वचेत असलेले एक प्रकारचे प्रोटिन) आकसणे किंवा कमी झाल्यावर असे होणे सामान्य बाब आहे.

3. डोळ्यांखाली सूज येणे मधुमेहाने पीडित असलेल्या व्यक्तीची मस्क्युलर किंवा नर्व्ह डॅमेज झाल्यावर डोळ्यांच्या खालची त्वचा झुलायला किंवा लटकायला लागते. अशा स्थितीत पीडिताच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचते. त्यामुळे याकडे कानाडोळा न करता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा. अनेकदा डोळ्यांचे ऑइल ग्लँड्स ब्लॉक झाल्यावर सुद्धा असे होऊ शकते. अशावेळी पीडिताच्या डोळ्यातून फ्लूइड निघू शकत नसल्यास डोळ्यांच्या पापण्यांवर वाटाण्याइतकी सूज दिसून येते. गरम कापडाने डोळे शेकल्याने डोळ्यांना आराम मिळू शकतो.

4. डोळ्यांत वेदना होणे कार्निअलमध्ये काही कारणांनी अपघर्षण झाल्यामुळे तीव्र वेदना व्हायला लागतात. तथापि, ही समस्या आपोआपच बरी होते, परंतु डॉक्टर अशा स्थितीत इतर इंफेक्शन्सपासून बचाव करण्यासाठी अँटिबायोटिक आयड्रॉप्स घेण्याचा सल्ला देतात.

डोळ्यामधील संक्रमणावर घरगुती उपाय
जेव्हा कधी तुम्हाला डोळे चालू-बंद करताना काही त्रास व काही वेगळे वाटत असेल तर सर्वप्रथम यास डॉक्टरांना नक्की दाखवा.
डोळ्यांची तपासणी नक्कीच करून घ्यावी. संक्रमण कोणते आहे व कशाप्रकारचे आहे हे जाणून घ्यावे.

डोळ्यांच्या संक्रमणाचे प्रकार :
१.नेत्रशोध किंवा गुलाबी डोळे :
या संक्रमणात डोळे लाल होतात. हि एक जीवाणूजन्य व्याधी आहे कधी कधी हे विषाणूंच्या प्रभावाने किंवा एलर्जी मुळेहि होते.

२.डोळ्यामध्ये सुजन :
हे संक्रमण स्टेफ्लोकोकल ब्याक्टेरियामुळे होते. डोळ्यांच्या पापण्या व त्याची त्वचा सुजते व त्यात बरेचदा फार वेदना असतात.

3.ब्लेफरीटीस :
या संक्रमणाची जाणीव तेव्हा होते, जेव्हा पापण्यांच्या टोकाशी तेलकट पदार्थ तयार होतो व तेथे चिटकतो. यामुळे खाज होते. डोळ्यात जळ जळ होणे तसेच डोळ्यातून पाणी येणे सोबतच डोळे गरम पडणे यासारखे लक्षण दिसू लागतात.

४. नेत्रगुहा संबंधी संक्रमण :
सेल्युलीटीस असे ह्या संक्रमणाचे नाव आहे. यामध्ये डोळ्यांच्या आतील खालच्या भागात तरल पदार्थ जमा होतो. हे एक ब्याक्टेरीयल संक्रमण असल्यामुळे डोळ्यांच्या रोगांना आमंत्रित करतो. नेत्रज्योत कमी करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

५.केराटीटीस :
हे संक्रमण अपायकारक ब्याक्टेरिया, वायरस, फंगी आणि पराजीवांमुळे होते. ह्यामुळे डोळे सुजून त्यामध्ये वेदना होतात. ह्यामुळे कोर्नियास इजा पोहोचू शकते.

६.डायक्रोसायटीटीस :
हे संक्रमण डोळ्यांच्या विविध रक्त वाहिनी व इतर नलीकांमध्ये होऊ शकते. हे संक्रमण शरीर प्रतिरोधक शक्तीमध्ये कमी, मानसिक आघात सर्जरी, हानिकारक केमिकल्स आणि अत्यंत कमजोर आहार विहार पद्धती या सर्वांनी होऊ शकते.

डोळ्यांच्या काही सामान्य संक्रमानासाठी काही घरगुती उपायांचा वापर आपण करू शकतो.

खाली काही डोळ्यांच्या संक्रमणावर उपाय म्हणून घरगुती उपाय दिलेले आहेत.
१-गरम पट्टी :
हे डोळे येणे यावर एक प्रभावशाली उपाय आहे. असे केल्याने डोळ्यांभोवतीचे रक्त संचालन सुरळीत होईल. डोळे अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतील. सुजन आल्यास त्यावरही आराम मिळतो.
१.स्वच्छ आणि नरम सुती कापड गरम पाण्यात भिजवून नंतर बाहेर काढून त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.
२.हा कपडा आपल्या हातांनी ५ मिनिटांसाठी डोळ्यावर ठेवा नंतर काढून कपडा पाण्यात टाका.
3.ह्या प्रक्रियेस २-3 वेळा परत करा.
४.डोळ्यामधील पाणी व संक्रमित तैलीय पदार्थास आपण घ्या कपड्यांनी साफ करू शकता.
५.जोपर्यंत तुम्हाला बरे वाटत नाही हि प्रक्रिया दोन तीन वेळा 3-४ दिवस करू शकता.

२-सलाईन सोलुशन :
घरीच बनविलेल्या या सलाईन सोल्युशन द्वारा तुम्ही डोळ्यातील संक्रमित चिकट पदार्थ व घन साफ करू शकता. डोळे साफ करण्यासाठीही वापरू शकता.
सलाईन सोल्युशन बनविण्याची विधी
१.चम्मच मीठ , १ कप गरम करून थंड केलेल्या पाण्यात मिळवा.
२.हे पाणी पुन्हा गरम करा व थंड करा.
3.हे पाणी स्वच्छ व संक्रमणरहित केलेल्या बादलीत भरा.
४.ह्या पाण्याच्या वापरासाठी स्वच्छ कपडा वापरू शकता.
५.पाण्याने डोळ्यामधील संक्रमण व घाण साफ करा.
६.हे पाणी शुद्ध व ताजे असावे.

3- कोलोईडल सिल्वर :
कोलोईडल सिल्वर याचा वापर डोळ्यातील जळन व सूजानावर केला जातो. हे जीवाणूजन्य व विशानुजन्य संक्रमानास दूर करते. यामुळे अशा संक्रमणावर हे प्रभावी ठरते.
हे द्रावण मुख्यतः शुद्ध व असंक्रमित पाण्यात चांदीचे अनु सोडून तयार केले जाते.
याचा वापर आई-ड्रोप म्हणूनही करता येतो.
-याच्या द्रावणाची २-3 थेंब डोळ्यातील संक्रमनावर टाकल्यास लवकरच आराम होतो.
-हे नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे
-याचा वापर डोळ्यांचे नरम होणे, खाज सुटणे, व जळ जळ करणे यावर केला जातो.

४- शहद :
- शहद हे एक एन्टी ब्याक्टेरीयल तत्व आहे त्यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचवणाऱ्या हानिकारक ब्याक्टेरीयांना हे समाप्त करतो.
- शहदमध्ये दृष्टी वाढवणारे तत्व आहेत. त्यामुळे डोळ्यात पाणी येणे , तसेच म्याम्बोमिआन ग्ल्याड संबंधी रोगांवर फारच परिणामकारक ठरते.
- चांगल्या परिणामासाठी मनुका शहद आणि जैविक शहदाचा वापर करावा.
- शुद्ध शहद आणि शुद्ध पाणी समप्रमाणात मिळवून स्वच्छ कापसाच्या बोन्ड्याने डोळ्यातील घाण साफ करावी. जोपर्यंत संक्रमण जात नाही तोपर्यंत या प्रक्रियेस करीत राहावे. दिवसातून २-3 वेळ हि प्रक्रिया करावी.
- सरळ शहदाचे थेंब डोळ्यात टाकण्यास करता यतो. यामुळे डोळ्यात आसू येतात. यामुळे डोळ्यातील धूळ आणि घाण साफ केली जाते.

५-ग्रीन टी :
ग्रीन टी हे टोनिक एसिड संपन्न असते त्यामुळे डोळ्यातील संक्रमण जसे डोळ्यात खाज सुटणे, पाणी येणे जळजळ करणे दूर करता येतात. ग्रीन टी मध्ये अनेक पोषके आणि प्रतिरोधके जे डोळ्यांसाठी लाभदायक आहेत.
ग्रीन टी वापराची विधी
१. १ चम्मच ग्रीन टी ची पत्ती १ कप २ वेळः गरम करून घेतलेल्या कोमट पाण्यात १ मिनिटांसाठी टाका.
२. गाळणीने ते पाणी गळून घ्या.
३. हे द्रावण निर्जंतुक बादलीत भरा व फ्रीज मध्ये ठेवा
४. स्वच्छ कपड्याने ग्रीन टीत बुडवून हळूहळू संक्रमित डोळे साफ करावे.
५. जोपर्यंत संक्रमण जात नाही तोपर्यंत डोळे साफ करीत राहा.

६-बोरिक एसिड :
बोरिक एसिड हे एक महत्वाचे संक्रमण नाशक मानले जाते. डोळ्यांच्या संक्रमनासाठी हे अत्यंत आवश्यक मानले जाते. डोळे लाल होणे, कोरडी दिसणे, डोळ्यांची जळजळ, डोळ्यात पाणी येणे, अशा समस्या याच्या वापराणे दूर होतात.यामध्ये एन्टीब्याक्टेरीयल एन्टी फंगल तत्व जे संक्रमनास दूर करते.
१. १/८ चम्मच मेडिकल ग्रेड बोरिक एसिड १ कप स्वच्छ व गरम करून थंड केलेल्या पाण्यात मिळवा व फ्रीजमध्ये थंड करा.
२. मिश्रण डोळ्यांना साफ करण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी करावा.
३. दिवसातून कमीत कमी 3 वेळा हि प्रक्रिया पुन्हा करावी. नेहमी ताजे वापरावे.वापरतांना जळ जळ होत असेल तर हळू हळू लावावे.

७.एप्पल साईडर विनेगर :
डोळे येणे सारख्या समस्यांसाठी एप्पल साईडर विनेगर अत्यंत लाभकारी आहे. यामधील मैलिक एसिड एक एन्टी मायक्रोबियल म्हणून काम करते डोळ्यामधील ब्याक्टेरिया पासून वाचवतो. डोळे साफ करून हानिकारक जैविकांना नष्ट करतो.
१. १ चम्मच एप्पल साईडर विनेगर, १ ग्लास निर्जंतुक पाण्यात मिळवा
२. मिश्रण स्वच्छ कापसाच्या बोळ्याने डोळ्यांच्या संक्रमित भागात लावा.डोळ्यातील घन साफ करा.
३. याचा वापर डोळ्यातील आतील व बाहेरील संक्रमित घाणीस साफ करण्यासाठी होतो.
४. ह्या प्रक्रियेस दिवसातून २-3 वेळा करावी.

८.स्तनाचे दूध :
हे लहान बालकांच्या डोळ्यांच्या संक्रमनासाठी एक उत्तम उपाय मानले जाते. यामध्ये एन्टीबायोटीक तत्व आणि आणि इम्युनोब्लोबीन इ असते. जो लहान बाळांच्या डोळ्याच्या संक्रमणास रोखतो.

वापराची विधी:
१. एका कपात ताजे स्तनांचे दूध घ्या
२. साफ आय ड्रोपर च्या मदतीने दुधाची २-3 थेंब संक्रमित डोळ्यांमध्ये टाका.
३. दिवसातून २-3 वेळा हि प्रक्रिया करावी.

डोळे निरोगी ठेवण्यासाठी टिप्स :
१. संक्रमण रोखण्यासाठी. डोळे रोज स्वच्छ पाण्याने सकाळी व रात्री झोपण्याआधी धुवून घ्यावे.
२. संक्रमण थांबवण्यासाठी डॉक्टरांचा नियमित सल्ला घ्यावा.
३. दिवसातून २-3 वेळा बाहेरून आल्यावर स्वच्छ पाण्यात गुलाब जल टाकून चांगल्या प्रकारे स्वच्छ करावे.
४. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कापासून दूर राहावे.
५. आपला टॉवेल व रुमाल दुसरयांना वापरू देवू नये.
६. संक्रमित हातानी डोळ्यांना नेहमी नेहमी स्पर्श करू नये.
७. संक्रमण झाल्यास चेहऱ्यावर मेकअप करू नये.
८. २-3 दिवस हे सर्व उपाय केल्यावरही संक्रमण जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dr. Himanshu Verma
Dr. Himanshu Verma
Medical Student, General Physician, 3 yrs, Bhopal
Dr. Vinod Shingade
Dr. Vinod Shingade
BHMS, General Physician Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Sonali wagh
Dr. Sonali wagh
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Kusum Garudkar
Dr. Kusum Garudkar
MS/MD - Ayurveda, Family Physician Ayurveda, 23 yrs, Pune
Dr. Snehal Pharande
Dr. Snehal Pharande
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune