Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
सोरायसिस
#रोग तपशील#सोरायसिस



सोरायसिस

सोरायसिस एक त्वचारोग आहे. इतर सर्वसामान्य त्वचारोगांसारखाच सुरुवातीला वाटणारा हा त्वचारोग मात्र अचानक गंभीर वळण घेऊ शकतो. मानवी त्वचेचे डोळ्यांनी न दिसणारे अनेक पातळ थर असतात. सर्वात वरचा थर हा परिपक्व असा थर असून संपूर्ण वाढ झालेल्या पेशी यात असतात. आतील सर्व अवयवांचे रक्षण करणे व तापमान नियंत्रण अशा महत्त्वाच्या कार्यात त्या मदत करतात. हा परिपक्व थर बनवण्यासाठी साधारण 21 ते 28 दिवस लागतात; परंतु हे 28 दिवसांचे चक्र काही विशिष्ट कारणांमुळे 5 ते 7 दिवसांवर जेव्हा येऊन पोहोचते तेव्हा हा परिपक्व पेशीचा थरावर थर साचत जातो. त्यालाच सोरायसिस असे म्हणतात.

डोक्यात होणा-या कोंड्यांच्या स्वरूपातील सोरायसिसला स्कल्प सोरायसिस असे म्हणतात, संपूर्ण शरीरावर छोट्या-छोट्या थेंबांप्रमाणे येणा-या सोरायसिसला गटेट सोरायसिस म्हणतात, संपूर्ण शरीरावर मोठ्या आकाराच्या सोरायसिसच्या चट्ट्यांना प्लेक सोरायसिस म्हणतात. फक्त तळहात व तळपायावर येणा-या सोरायसिसला पाल्मोप्लँटर सोरायसिस असे म्हणतात. काही सोरायसिसच्या रुग्णांमध्ये नखे काळीनिळी पडतात व वेडीवाकडी होतात. याला नेल सोरायसिस म्हणतात. संपूर्ण शरीरावर पसरलेल्या सोरायसिसमध्ये जेव्हा पू किंवा पाणी भरलेले लहान पुरळ दिसतात त्याला पस्टलर सोरायसिस म्हणतात. काखेमध्ये, जांघेमध्ये व इतर झाकून राहणा-या या भागांमध्ये होणा-या सोरायसिसला इन्व्हर्स सोरायसिस म्हणतात. तसेच त्वचेबरोबर काही वेळा सोरायसिस रुग्णांना संधिवात होतो याला सोरायाटिक आथ्रिटिस असे म्हणतात.

सोरायसिसवर उपचार करताना प्रकार कोणता आहे यावरदेखील लक्ष देणे आवश्यक असते. कारण ब-याचदा वेगवेगळे प्रकार बरे होण्यासाठी वेगवेगळा कालावधी लागतो. तसेच उपचारांमध्ये बदल करावा लागतो. एकाच सोरायसिस रुग्णामध्ये एकाच वेळी एकापेक्षा अनेक प्रकार असू शकतात. अनुभवी चिकित्सक चाणाक्ष नजरेने हे ओळखून उपचारामध्ये बदल करतात.

सोरायसिसच्या रुग्णांना पडणारा प्रश्न एकच - मलाच सोरायसिस का झाला? या प्रश्नाचे उत्तर देणे प्रत्येक डॉक्टरला जरा जडच जाते. आधुनिक वैद्यकशास्त्रात सुरुवातीला सोरायसिस हा एक मिसिलेनिअस स्किन डिसिज म्हणून ओळखला जात असे. या प्रकारात बरेचसे आजार कारणाअभावी पडून असतात. त्यामुळे अर्थातच ठोस अशी उपचारपद्धतीसुद्धा नसतेच. ब-याच दिवसांनी काही संशोधकांनी सोरायसिसला अ‍ॅटोम्यून स्किन डिसिजच्या पंक्तीमध्ये नेऊन ठेवले. या प्रकारातील आजार हे मानवी रोगप्रतिकारशक्तीमध्ये झालेल्या बिघाडामुळे होतात; परंतु अ‍ॅटोम्यून स्किन डिसिज या आजारात रुग्णाच्या शरीरात अँटिजेन-अँटिबॉडी कॉम्प्लेक्सेस आढळतात किंवा फक्त अ‍ॅटोएॅटिबॉडीज तरी आढळतातच; परंतु सोरायसिसच्या रुग्णांमध्ये अशा प्रकारचे काहीच घटक न आढळल्यामुळे सर्वांनी आता हा आजार अ‍ॅटोम्यून नसल्याचे मान्य केले आहे.

अगदी अलीकडच्या संशोधनाअंती असे स्पष्ट झाले आहे की, सोरायसिस हा काही विशिष्ट गुणसूत्रांमध्ये होणा-या बदलामुळेच होतो. मानवी शरिरातील प्रत्येक पेशींमध्ये 46 गुणसूत्रे असतात. प्रत्येक गुणसूत्रांवर असणा-या विविध जनुकांकडे विविध प्रकारची कार्ये वाटून दिलेली असतात. जीवनात विविध टप्प्यांवर सद्य:स्थितीतील गुणसूत्रांमध्ये विविध बदल संभवतात. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुढील पिढीची गुणसूत्रे तयार करणे. फलोत्पादन प्रक्रियेवेळी पुरुष व स्त्री बीजांकडून काही गुणसूत्रे येऊन पुढील पिढीची गुणसूत्रे तयार होतात. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत जे गुणसूत्रामध्ये चांगले-वाईट बदल घडतात ते पुढच्या पिढीमध्ये दिसतात. या प्रक्रियेत जर त्वचेच्या परिपक्वतेच्या कामामध्ये भाग घेणा-या जनुकांमध्ये काही वाईट बदल घडल्यास सोरायसिस आजार होतो, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

अशी गुंतागुंतीची कारणीमीमांसा असणा-या आजारावर उपचार सहज होतील काय? आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून सोरायसिसचा उल्लेख, त्याची लक्षणे, कारणे व उपचारासहित आढळतो. आयुर्वेदाच्या मदतीने आपण कफ व वात यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो तर सोरायसिसविरुद्धची लढाई जिंकू शकतो. सोरायसिस घालवताना आयुर्वेदिक तसेच संयुक्त उपचार पद्धतीचाही वापर करता येतो. त्यासाठी आपणास अनुभवी, चिकित्सक व मार्गदर्शकांची आवश्यकता असते.

अशा या सोरायसिस या गंभीर त्वचारोगाने संपूर्ण जगातील वैद्यकशास्त्राला आव्हान दिलेले असताना या रोगावर उपचार सुरू करण्याचे धाडस दाखवले व आम्ही सुरू केलेली सुरुवात आज इंडियन सोरायसिस फाउंडेशन या संस्थेला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेऊन गेली आहे. दूरदर्शन वाहिनीवर सलग सहा वर्षे समाजप्रबोधनपर माहितीपट ‘सोरायसिस मुक्तिगाथा’ ही प्रसारित होत आहे. या संस्थेतर्फे महाराष्ट्रासह देशभर मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत.

आता सोरायसिसवर अधिक प्रभावीपणे उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली संयुक्त उपचार पद्धतीची गरज ओळखून आयुर्वेदिक संशोधन केंद्राची स्थापना केली आहे. मुंबईस्थित हे मुख्यालय केवळ सोरायसिस व इतर त्वचारोगांवर संयुक्त उपचार करणारे भारतातील एकमेव सुसज्ज रुग्णालय आहे. महाराष्ट्रभर सीमित असलेले हे कार्य आता भारतभर नेण्यासाठी मुंबई, दिल्ली, इंदूर, जयपूर, अहमदाबाद, कोलकाता व बंगळुरूसारखी विभागीय कार्यालयेदेखील सज्ज झाली आहेत.

Dr. Yogesh  Wankhede
Dr. Yogesh Wankhede
BAMS, Ayurveda Acupressurist, 5 yrs, Pune
Dr. Maya Golikere
Dr. Maya Golikere
BAMS, Panchakarma General Physician, 2 yrs, Pune
Dr. Ankita  Bora
Dr. Ankita Bora
MBBS, Adolescent Pediatrics Allergist, 2 yrs, Pune
Dr. Cliford John
Dr. Cliford John
BDS, Dental Surgeon Root canal Specialist, 6 yrs, Pune
Dr. Mangal Thube - Buchade
Dr. Mangal Thube - Buchade
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 9 yrs, Pune