Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
नाकामध्ये येणारे वेदनादायक फोड
#रोग तपशील#नाकाची अलर्जीनाकामध्ये येणारे वेदनादायक फोड :

चेहर्‍यावर मुरूम, पुटकुळ्या येणे स्वाभाविक आहे; पण शरीरातील इतर काही अवयवांवरही मुरुमे येतात. विशेषत:, नाकाच्या आतल्या बाजूला वेदनादायी असलेल्या मुरुमांपासून बचाव करण्यासाठी...
पोट खराब होणे, वाढणारी उष्णता, यामुळे नाकाच्या आत मुरुमे येतात. त्यामुळे नाकावर सूज येते. नाकाच्या आत येणार्‍या मुरुमांचा परिणाम नाकातील कुर्च्या आणि हाडे यांच्यावरही होतो आणि नाकातून पू येऊ लागतो. त्यामुळे श्‍वास घेण्यासही त्रास होतो. काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास यापासून बचाव करता येतो.

- सतत स्पर्श टाळा : नाकाच्या आत फोड आल्यास अस्वस्थता येते. मात्र, सतत हाताने त्याला स्पर्श करू नका. त्यामुळे जीवाणू चेहर्‍यावर अधिक प्रमाणात पसरेल. चेहर्‍यावर जास्त मुरुमे येतील. पुसण्यासाठी कापूस किंवा टिशू वापरावेत.

- मोगर्‍याचा वास : नाकात फोड आल्यास सकाळी मोगर्‍याची ताजी 2-3 फुले घेऊन 2-3 वेळा दीर्घ श्‍वास घेऊन वास घ्यावा आणि फूल फेकून द्यावे. अनेकदा फुलाचा एकदा वास घेतला तरीही फूल सुकून जाते. गरज भासल्यास तीन दिवस हाच उपाय करावा.

- बर्फाने शेक : मुरूम खूप वेदनादायी असेल तर त्याला सूज आल्यासारखे वाटते. बर्फाचे तुकडे रुमालात बांधून त्याने नाकाच्या फोड आलेल्या भागाला वरून शेकावे. त्यामुळे मुरुमांचा प्रभाव कमी होईल.

- नाकात बोटे घालू नका : नाकात काही झाल्यास अस्वस्थता येते; पण नाकात सतत बोटे घालू नका. अनेकदा नाकात बोटे घालण्याच्या सवयीमुळेही मुरुमे होतात. हाताला असलेले जीवाणू नाकातील केसात जातात आणि अंतत्वचा दूषित करतात. नाकातील मुरुमांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा आणि औषधे घ्यावी.

नाक हा आपल्या चेह-यावरील एक महत्वाचे ज्ञानेद्रिय आहे. चाफेकळी नाकामुळे एखाद्याचे सौदर्य अधिक खुलून दिसू शकते. तसेच नाक हा अवयव श्वसनक्रियेसाठी देखील ते फार महत्वाची ठरतो. मात्र आजकाल वाढत्या हवेच्या प्रदूषणामुळे नाकामध्ये निरनिराळे विकार निर्माण होतात. प्रदूषणामुळे सर्दी होणे,नाक चोंदणे,शिंका येणे अथवा श्वसन समस्या अशा निरनिराळ्या समस्या निर्माण होतात. तर कधीकधी नाकामध्ये अचानक एखादा फोड अथवा बॉइल निर्माण झाल्यास देखील खूप वेदना होऊ लागतात.

शरीराच्या इतर भागावर येणा-या बॉइल पेक्षा नाकपुडीच्या आतील बाजूस येणारे बॉइल फारच त्रासदायक असतात.कारण एकतर आपल्या नाकाचा आतील भाग हा फारच संवेदनशील असतो.त्यामुळे नाकात फोड अथवा बॉइल आल्याने तुम्हाला त्याचा त्रास अधिक प्रमाणात जाणवू लागतो.या फोडांमुळे तुम्हाला अगदी दैनंदिन व्यवहारात चेहरा धुणे अथवा नाक साफ करणे अशा कामांमध्ये देखील अडचणी येतात.तसेच जर हा फोड नाकामध्ये अगदी आतल्या भागात असेल तर तुम्हाला तो दिसतही नाही व त्यावर एखादे औषध लावून उपचार देखील करता येत नाहीत.यासाठी नाकामध्ये होणा-या बॉइल अथवा फोड या समस्येबाबत डर्माटॉलॉजिस्ट डॉक्टरांचा सल्ला जरुर जाणून घ्या.

नाकामध्ये बॉइल अथवा फोड का येतात?
नाकामध्ये बॉइल अथवा फोड येण्यासाठी स्टाफयलोकॉककस औरस (Staphylococcus Aureus)हे बॅक्टेरीया कारणीभूत असतात. डॉ.कंधारी यांच्यामते काही लोक हे बॅक्टेरीया कॅरीयर स्थितीत असतात. ज्यामुळे हे विषाणू त्यावेळी त्या व्यक्तीच्या शरीरात वास करतात. या स्थितीत जरी ती व्यक्ती संसर्गजन्य असली तरी तिच्यामध्ये तशी लक्षणे मात्र आढळत नाहीत.पण ही स्थिती संसर्गजन्य नक्कीच असू शकते. काहीवेळा नाकाच्या आतील पडद्याला नखांनी खाजवणे अथवा खरवडणे यामुळे तिथे जखम होते. कधीकधी थंड वातावरणामुळे देखील नाकाच्या आतील पडद्याचा भाग सुकतो.या स्थितीचा फायदा हे बॅक्टेरीया घेतात. ज्यामुळे नाकामध्ये नसल व्हेस्टिब्युलिटिस (Nasal vestibulitis) अथवा नाकाच्या केसांमध्ये समस्या निर्माण होतात. आटोपीक डेरमाटीटीस (Atopic dermatitis)ची समस्या असलेल्या लोकांना देखील नाकामध्ये बॉइल अथवा फोड येण्याचा धोका असू शकतो.

नाकामध्ये बॉइल अथवा फोड आल्यास काय समस्या निर्माण होऊ शकतात?

नाकामध्ये बॉइल अथवा फोड येणे या समस्येकडे आपण ब-याचदा एक साधी त्वचा समस्या समजून दुर्लक्ष करतो. पण डॉ.कंधारी यांच्या मते या समस्येकडे कधीच दुर्लक्ष करु नये. कारण त्यांच्या मते कधीकधी हे फोड दाबले जातात व त्यांचा समुह अथवा जाड थर तयार होतो. तसेच यामुळे कधीकधी नसल ऍब्सचेस(Nasal abscess)ही समस्या देखील निर्माण होऊ शकते.ज्या समस्येमध्ये बॅक्टेरीयल इनफेक्शनमुळे नाकाच्या आतील भागात पू निर्माण होऊ शकतो. आपण कधीच नाकामधील फोड अथवा बॉइलकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण ते अतिशय धोकादायक भागात झालेले असतात. नाकाचा त्रिकोणी भाग हा आतील बाजूने आपल्या तोडांजवळ जोडलेला असून त्याची आतली बाजू अतिशय संवेदनशील असते. त्या भागातील रक्तपुरवठा करणा-या जाळ्यांना जर या इनफेक्शचा प्रादूर्भाव झाला तर त्याचा संसर्ग थेट मेंदूपर्यंत पसरु शकतो. डॉक्टरांच्या मते मधुमेह व रोगप्रतिकार शक्ती कमजोर असलेल्या लोकांनी या भागात फोड आल्यास विशेष दक्षता घ्यावी. कारण मधुमेहींमध्ये नाकामध्ये बॉइल येणे ही समस्या निर्माण होण्याची अधिक शक्यता असते. तसेच या समस्येवर वेळीच उपचार नाही केले तर ही समस्या गंभीर देखील होऊ शकते.

जाणून घ्या नाकामध्ये बॉइल झाल्यास याबाबत नेमकी काय काळजी घ्यावी-

1. डॉक्टरांच्या मते सर्वात पहिली व महत्वाची गोष्ट म्हणजे कधीही नाक खरवडू नये. तसेच जर तुम्हाला तीव्र पिम्पल्स येण्याची समस्या असेल तर अशावेळी ते पिम्पल्स फोडण्याचा मोह टाळा व त्यांच्यावर व्यवस्थित उपचार करा. कारण पिम्पल्स फोडल्यामुळे त्याचे इनफेक्शन तुमच्या त्वचेत खोलवर पसरु शकते.

2. डॉक्टरांच्या मते नाकाच्या आतमध्ये कोणतेही तेल अथवा मॉश्चराइजर लावू नये. कारण ते तेल अथवा मॉश्चराइजर गोठून नंतर तुमच्या नाकाच्या आतील त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो.

3. नाक कडक झाले असेल तर ते साफ करण्यासाठी नाक पिळून अथवा शिंकरुन नाकामध्ये जखम करणे टाळा.

4. नाकामधले येणारे बॉइल आपोआप बरे होतात. पण तसे नाही झाले तर याबाबत त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Dr. Prashant S Mane
Dr. Prashant S Mane
BAMS, Critical Care Medicine Specialist, 10 yrs, Pune
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Dr. Suhel  Shaikh
Dr. Suhel Shaikh
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 2 yrs, Pune
Dr. Kusum Garudkar
Dr. Kusum Garudkar
MS/MD - Ayurveda, Family Physician Ayurveda, 23 yrs, Pune
Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune