Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
पेप्टिक अल्सर
#रोग तपशील#पाचक व्रण



पेप्टिक अल्सरची लक्षणे आणि उपाय

पोटातील व्रण यालाच पेपटिक अल्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटातील आवरण खंडित होते. अधिक प्रमाणातील जाठररस व पोटातील आम्ल यामुळे उतींचा नाश होऊन व्रण तयार होतात. ‘पेपटिक’ या शब्दाचा अर्थ होतो; आम्लामुळे होणार्‍या समस्या. गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट पेपटिक अल्सरला फक्त अल्सर असेही म्हणतात.
पेपटिक अल्सरचे दोन प्रकार आहेत. ज्याठिकाणी व्रण आहेत त्या जागेवरून त्यांची नावे आहेत.

1. गॅस्ट्रीक अल्सर
2. ग्युओडेनल अल्सर

गॅस्ट्रीक अल्सर हे जठरामध्ये आढळते. तर ड्युओडेनल अल्सर हे लहान आतड्याच्या सुरुवातीस आढळते. एकाच व्यक्तीस एकाचवेळी दोन्ही प्रकारचे अल्सर होऊ शकतात.

* पेपटिक अल्सरची कारणे-

अन्न पचवण्यासाठी मदत करणारे आम्ल जेव्हा जठरभित्तीका किंवा ड्युगेनमला (लहान आतडीचा सुरुवातीचा भाग) हानी पोहचवते तेव्हा पेपटिकअल्सर तयार होतात. जठरातील ग्युओडिअममधील पाचनद्रव्यांच्या असंतुलनामुळे अल्सर होतात. पेपटिक अल्सरच्या प्रमुख कारणांमध्ये हेलिकोबॅक्टर पायलोरी या जीवाणूचा संसर्ग, छडअखज (एनसेड)औषधे उदा. अस्पीरिन यांचा समावेश होतो. अधिक मद्यपान, धूम्रपान यामुळे पेपटिक अल्सर होण्याची शक्यता असते. तणाव व मसालेदार पदार्थांमुळे अल्सर होत नाही; परंतु यामुळे व्रणाची स्थिती अधिक वाईट बनते.

* पेपटिक अल्सरची लक्षणे :

व्रणांची लक्षणे ही कधी दिसून येतात तर कधी दिसून येतही नाहीत. पोटात दुखणे हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. जेव्हा जठर रिकामे असते त्यावेळी आम्लामुळे पोटात दुखणे वाढते. आम्ल निष्फळ करणारे अन्न किंवा औषधे घेतल्यावरती दुखण्यापासून आराम मिळतो. जवळपास तीन चतुर्थांश लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.

पेपटिक अल्सरच्या लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो.
- पोटामध्ये जळजळणे.
- उदर भरल्यासारखे वाटणे.
- छातीत जळजळणे.
- मळमळणे, उलटी येणे.
- भूक न लागणे, वजन कमी होणे.
- व्रणातून होणार्‍या रक्तस्त्रावामुळे रक्तमिश्रित उलटी होऊ शकते.
- मेलिना ( विष्ठेचा खराब वास येणे).

पेपटिक अल्सरची लक्षणे ही त्याच्या स्थानानुसार आणि रुग्णांच्या वयानुसार बदलतात. सामान्यतः व्रण हे भरून येतात आणि पुन्हा परत काही दिवसानंतर दिसून येतात आणि त्यानंतर नाहिसे होतात. सहसा लहान मुले आणि वृद्ध माणसांमध्ये गुंतागुंतीशिवाय लक्षणे दिसून येत नाहीत.
* व्रणांमुळे
* रक्तस्त्राव- व्रणातून होणार्‍या रक्तस्त्रावामुळे रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) होऊ शकतो. रक्तस्त्राव अधिक असेल तर ते उलटीमध्ये किंवा शौचामध्ये दिसून येते.
* संसर्ग - पेपटिक अल्सरमुळे जठरभित्तिकेला किंवा लहान आतडीला छिद्र पडू शकते. यामुळे पेरिटोनायटिस होण्याची शक्यता वाढते.
* अडथळा - पेपटिक अल्सरमुळे सूज येते यामुळे पाचनतंत्रात अडथळा निर्माण होतो. पोट भरल्याची लगेच जाणीव होते. यामुळे वजन कमी होते, उलटी होते.
* व्रणाचे निदान

व्रणाची पुष्टी करण्याकरिता डॉक्टर रेडिओलॉजिकल चाचणी/डायग्नोस्टिक इमेजिंग टेस्ट करतात. यामध्ये दोन चाचण्यांचा समावेश होतो.
1) अप्पर जी-आय सेरीज- हा एक्स-रे चा प्रकार आहे. यामध्ये रुग्णाला विशिष्ट पाणी पाजले जाते. यामुळे एक्स-रे अधिक चांगल्याप्रकारे दिसण्यास मदत होते. या पाण्यामध्ये बेरियम असते म्हणून या चाचणीला ‘बेरियम स्वालो’ असेही म्हणतात.

2) एन्डोस्कोपी- एन्डोस्कोप ही कॅमेरा असलेली लवचिक ट्यूब असते. ही ट्यूब तोंडावाटे पोटात टाकली जाते. यामुळे डॉक्टर पोटातील आवरण पाहू शकतात. या प्रक्रियेमध्ये काहीवेळा छोटासा उतीचा भाग सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्यासाठी काढला जातो. यालाच बायोप्सी म्हणतात. डायग्नोस्टिक इमेजिंग टेस्टमध्ये व्रण आढळला तर रुग्णामध्ये एच पायलोरी जीवाणू असू शकतात.

एच पायलोर दर्शवण्यासाठी तीन टेस्टस् आहेत.
* रक्तचाचणी- जीवाणू असतील तर, रक्तामध्ये विशिष्ट अ‍ॅन्टिबॉडीत आढळतात. अ‍ॅन्टिबॉडी हे एक प्रोटीन असते, जे आपल्याला विविध जीवाणूंमुळे होणार्‍या हानीपासून वाचवते. ज्या व्यक्तीला भूतकाळात अल्सर होता आणि त्याकरिता त्याने उपचार घेतलेत अशा व्यक्तींमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येते.

* श्‍वास चाचणी- यामध्ये विशिष्ट पेय पिल्यानंतर कार्बन डॉयऑक्साइड मोजला (पान 7 वरून) जातो. एच. पायलोरी हे जीवाणू या पेयाचे विघटन करतात. यामुळे कार्बनचे प्रमाण वाढते. हा कार्बन श्‍वासावाटे बाहेर टाकला जातो. श्‍वास चाचणी ही रक्तचाचणी पेक्षा अचूक आहे. ही चाचणी एच. पायलोर जिवाणू पूर्णपणे नष्ट झाले आहेत का, हे तपासण्यासाठीही करतात.

* उती चाचणी- ही चाचणी फक्त एन्डोस्कोपिक बायोप्सी केल्यानंतरच करतात. यामध्ये पोटातील उतींचा वापर करतात.

पेपटिक अल्सर आणि घरगुती उपचार: व्रणांरती अनेक घरगुती उपचार उपलब्ध आहेत. घरगुती उपचार हे जठराचे आम्लापासून रक्षण करणे यावरती केंद्रित आहेत. घरगुती उपायांबरोबरच डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक आहे. यामुळे व्रणांपासून दीर्घकाळापर्यंत आरामाची खात्री होईल.
* लसूण- लसणामध्ये अ‍ॅन्टिमायक्रोबियल गुणधर्म आहेत. यामुळे एच. पायलोरी जीवाणूंची संख्या कमी होण्यास मदत होते.
* मेथी- मेथी बीमध्ये जखम भरून येण्याचे गुणधर्म आहेत. हे जठरव्रणांच्या उपचारामध्ये वापरतात. मेथी बीमध्ये म्युसिलेज अधिक प्रमाणात असते. मेथी हे जठरभित्तीकेवर एक चिकट प्रकारचे आवरण बनवते. त्यामुळे जखम भरून येण्यास मदत होते.
* नारळाचे तेल- हे पोटातील व्रणांपासून त्रस्त असणार्‍या रुग्णांसाठी लाभदायक आहे. यामध्ये जीवाणूविरोधक गुण आहेत. हे जीवाणूंचा नाश करते.
* मध- जखम भरून येण्यामध्ये अधिक गुणकारी आहे. यामुळे हे पोटातील व्रणांच्या उपचारामध्ये वापरले जाते. मधामध्ये असलेले ग्लुकोज-ऑक्सिडेज हे हायड्रोजनपर ऑक्साइड तयार करते, जे हानीकारक जीवाणूंचा नाश करते. याशिवाय मध हे सूज शमवते व कमी करते.
* केळी- कच्चे व पिकलेली केळी हे दोन्हीही लाभदायक आहेत. यामध्ये अ‍ॅन्टीमायक्रोबियन्न गुण आहेत. ज्यामुळे एच. पायलोरी जीवाणूंची वाढ थांबते.
* कोबी- यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. हे पोटातील आवरणाचे रक्तप्रवाह उत्तेजीत करणारे अ‍ॅमिना अ‍ॅसिड तयार करण्यास मदत करते. यामुळे जखम भरून येण्यास आणि आवरणाच्या मजबुतीस मदत होते.

* पेपटिक अल्सम आणि पथ्य- ज्या अन्न घटकांमुळे जठराला त्रास होतो, असे घटक टाळावेत. अधिक साखरेचा आणि मीठाचा वापर टाळावा. फॅटयुक्त पदार्थ टाळावेत.
फळे, भाज्या, फॅटमुक्त किंवा कमी फॅटयुक्त दुधाचे पदार्थ, धान्ये, ब्राऊन राईस यांचा आहारामध्ये समावेश करावा.

खालील अन्नघटकांचा समावेश आहारामध्ये टाळावा-
पेय- कच्चे दूध, फ्लेवरड् मिल्क, कॉफीयुक्त पेये, ग्रीन आणि ब्लॅक टी, संत्री आणि द्राक्षेंचा रस, अल्कोहलयुक्त पेय.
मसाले- मिरची, मोहरी, जायफळ, टोमॅटो केचअप, टोमॅटो सॉस, फ्लेवरड् चीज.

* औषधोपचार-
1) ब्रोयानिया
2) सल्फर
3) ग्राफाइट
4) लायकोपोडियम
5) बोरॅक्स
6) नक्स वोमिका.

पेप्टिक अल्सर हे जरी एखाद्या भयंकर, असाध्य रोगाचे नाव वाटत असले, तरी हा विकार तितकासा असाध्य नाही. मानवी शरीरातील इसोफेगस ( अन्ननलिका ), पोट आणि लहान आतड्यांना काही कारणाने झालेल्या जखमांना पेप्टिक अल्सर म्हटले जाते. ह्या जखमा ( sores ) या अवयावांमधील पेशींचे काही कारणाने नुकसान झाल्याने किंवा पोटामधील अॅसिड्समुळे आतड्यांच्या लायनिंग चे नुकसान झाल्याने उद्भवतात. पेप्टिक अल्सर हा विकार सामान्य असून साधारणपणे साठीच्या वरील व्यक्तींमध्ये आढळतो. भारतामध्ये दरवर्षी सुमारे दहा मिलियन व्यक्तींना पेप्टिक अल्सर असल्याचे निदान करण्यात येते अशी माहिती एका वैद्यकीय जर्नल मध्ये नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. हा विकार पुरुष आणि स्त्रिया या दोहोंमध्ये उद्भवू शकतो. हा विकार असल्याने मृत्यू होण्याचे प्रमाण जवळ जवळ नाहीच. ह्या आजाराचे निदान झाल्यानंतर योग्य वेळी घेतलेला वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार, हा विकार पूर्णपणे बरा करू शकतात.

आपल्या पोटामध्ये जी अॅसिड्स तयार होतात, त्यांच्या मदतीने अन्न पचण्यास मदत होते. पण ही अॅसिड्स जर अतिरिक्त प्रमाणात तयार होऊ लागली तर पचनक्रियेस सहायक होण्याऐवजी या अॅसिड्समुळे आतड्यांना नुकसान होऊ लागते. यामुळे आतड्यावर लहान लहान जखमा होतात. पेप्टिक अल्सर होण्याची दोन कारणे आहेत. एक तर हेलीकोबॅक्टर पायलोरी ह्या बॅक्टेरिया मुळे झालेल्या इन्फेक्शनने अल्सर होऊ शकतात. दुसरे कारण म्हणजे जर एखादी व्यक्ती जर सतत वेदनाशामक औषधांचे सेवन करीत असेल, तर त्यामुळे ही पेप्टिक अल्सर होऊ शकतात.

पेप्टिक अल्सर असण्याचे सर्वात प्राथमिक लक्षण म्हणजे पोटामध्ये सतत तीव्र जळजळ होणे, किंवा सतत पोट दुखणे हे आहे. पोटदुखी निरनिराळ्या कारणांनी उद्भवू शकते, त्यामुळे पोट दुखले की पेप्टिक अल्सर झाला आहे असे समजण्याचे कारण नाही. पेप्टिक अल्सारने उद्भवणारी पोटदुखी साधारणपणे रात्रीच्या जेवणानंतर सुरु होते. पोटदुखीचे प्रमाण वाढणे किंवा कमी होणे हे मुख्यतः आपल्या आहारावर अवलंबून असते. टोमॅटो, चिंच वापरून बनविले गेलेले आंबट पदार्थ खाल्ल्याने अॅसिडीटी वाढू शकते, त्यामुळे रात्रीच्या वेळी आंबट पदार्थ खाणे टाळायला हवे. तसेच फार वेळ उपाशी रहाणे किंवा दोन जेवणांच्या मध्ये खूप अंतर असल्याने ही पोटदुखी किंवा अॅसिडीटी होऊ शकते. पोटदुखी आणि पोटात जळजळ या शिवाय मळमळणे, सतत ढेकर येणे, अपचन, भूक कमी होणे आणि पोट फुगल्यासारखे होणे ही सुधा पेप्टिक अल्सरची लक्षणे असू शकतात. या पैकी कोणतीही लक्षणे वारंवार उद्भवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पेप्टिक अल्सरचे निदान एका सोप्या तपासणीद्वारे करता येऊ शकते. याला ‘ अपर गॅस्ट्रोइंटेस्टीनल टेस्ट ‘ म्हटले जाते. या तपासणी दरम्यान रुग्णाला बेरियम नावाचे पांढरे द्रव पिण्यास सांगितले जाते व त्यानंतर त्याच्या पोटाचा एक्स रे काढला जातो. ह्या पांढऱ्या द्रवामुळे पोटातील अल्सर दिसून येण्यास मदत होते. अल्सरचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुचविले जातात. या मध्ये इन्फेक्शन मुळे अल्सर झाल्यास अँटी बायोटीक्स दिली जातात. योग्य औषधोपचार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारात बदल केल्याने पेप्टिक अल्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात.

Dr. Vijay Mane
Dr. Vijay Mane
BHMS, Homeopath Family Physician, 22 yrs, Pune
Dr. Mayur Patil
Dr. Mayur Patil
BHMS, Family Physician General Physician, 5 yrs, Pune
Dr. Amarsinha Nikam
Dr. Amarsinha Nikam
MD - Homeopathy, Homeopath, 33 yrs, Pune
Dr. Bhushan Chaudhari
Dr. Bhushan Chaudhari
MD - Allopathy, Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist, 10 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune