Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर
#रोग तपशील#गर्भाशयाचा कर्करोग



निसर्गाने स्त्रीला पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण अधिकार बहाल केला आहे. त्यामुळे स्त्री-स्वाथ्याच्या दृष्टीने प्रजनन संस्थेतील अवयवांच्या आरोग्याचा विचार अनिवार्य ठरतो. प्रजनन संस्थेतील महत्त्वाचा अवयव म्हणजे स्त्रीबीजाची निर्मिती करणारा स्त्रीबीजकोश. आजच्या सदरात आपण स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरची माहिती जाणून घेणार आहोत.

स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर
स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर हा स्त्रियांमधील मृत्यूदराचे प्रमाण अधिक असणाऱ्या कॅन्सर प्रकारांत पाचव्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूटने २०१८ साली जगभरात स्त्रीबीजकोश कॅन्सरचे अंदाजे २२२४० नवीन रुग्ण असतील असा अंदाज वर्तविला आहे. स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरचे ५ वर्षे व्याधीमुक्त असण्याचे प्रमाण सुमारे ४७% आहे. भारतीय स्त्रियांमध्ये स्तन व योनिमुखाच्या कॅन्सरमागोमाग स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर आढळतो.

संभाव्य कारणे
* वयाच्या चाळिशीनंतर स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक;
* वयाच्या साठीनंतर स्त्रीबीजकोशाचा कॅन्सर होण्याची शक्यता दुप्पट;
* आहारात चरबीयुक्त पदार्थाचा अधिक प्रमाणात व वारंवार वापर;
* एकदाही गर्भधारणा न होणे;
* गर्भधारणेसाठी किंवा मासिक पाळी निवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचा अधिक काळ औषध म्हणून वापर करणे;
* स्त्रीबीजाण्ड – स्तन किंवा आंत्र व गुदाच्या कॅन्सरची आनुवंशिकता
* बीआरसीए 1 व 2 सारख्या विशिष्ट जनुकांमध्ये झालेले बदल
* स्थौल्य
* धूम्रपान
* खालील पदार्थाचे वारंवार व अधिक मात्रेत सेवन
हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाल्याचे पदार्थ, मांसाहार, वाल-पावटा-वाटाणा-राजमा-छोले-चवळी-मटकी यांसारखी वातूळ कडधान्ये, बेसन, ब्रेड-बिस्किटे असे अतिशय कोरडे पदार्थ, शीतपेय – आइस्क्रीम – फ्रिजमधील थंड पदार्थ, दही, केळे, काकडी, मिठाई
* उष्णसंपर्कात -उन्हात अधिक काळ काम करणे,
* दिवसा जेवणानंतर झोपणे,
* रात्री जागरण करण्याची सवय
* व्यायामाचा अभाव
* अतिशय चिंता करण्याचा तसेच तापट स्वभाव,
* मासिक पाळीच्या नैसर्गिक चक्रात व्यत्यय आणणारी, दीर्घकाळ घेतली गेलेली हार्मोन्सची चिकित्सा,

स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणे
* बरेचदा प्राथमिक अवस्थेत रुग्णस लक्षणे जाणवत नाहीत. रोगाचा प्रसार अन्य ठिकाणी झाल्यावर लक्षणे जाणवू लागतात.
* मासिक पाळी अनियमितता
* मासिक पाळीच्या वेळी अधिक प्रमाणात रक्तस्राव
* दोन मासिक पाळींच्या मध्ये किंवा मासिक पाळी निवृत्तीनंतर योनिगत रक्तस्राव होणे.
* योनिमार्गातून अनियमित रक्तस्राव.
* पोट फुगणे.
* पोटात दुखणे.
* थोडेसे अन्नसेवन केले तरी पोट जड होणे.
* भूक मंदावणे.
* मलबद्धता
* मथुनसमयी अतिशय वेदना होणे.
* अशक्तपणा.
* वजन कमी होणे.

अशी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, पेट स्कॅन, लॅपॅरोस्कोपी, बायॉप्सी, सीए-125 ही रक्त तपासणी करून स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरचे निदान निश्चित केले जाते.
* आधुनिक चिकित्सा
* शस्त्रकर्म – स्त्रीबीजकोशाचे व पूर्ण गर्भाशयाचे निर्हरण
* केमोथेरपी
* रेडिओथेरपी
* हार्मोनल चिकित्सा
* इम्युनोथेरपी
* आयुर्वेदीय चिकित्सा

1. शमनचिकित्सा – पित्तदोष व रक्तधातूचे प्रसादन करणारी अनंतमूळ, कमळ, कामदुधा अशी शीतगुणाची औषधे; वातदोषाच्या अनुलोमनासाठी एरंडस्नेह, हिंग्वाष्टक चूर्ण; स्त्रीबीजकोशाची रचना व क्रिया यावर विशेषत्वाने कार्यकारी शतावरी, आरोग्यवर्धिनी यांसारखी औषधे तसेच केमोथेरपी व रेडिओथेरपी काळात भूक वाढविणारी (दीपन), पचन सुधारणारी (पाचन), पित्ताचे शमन करणारी शमन चिकित्सा उपयुक्त ठरते.
2. रसायनचिकित्सा – स्त्रीबीजकोशाच्या कॅन्सरमध्ये आधुनिक चिकित्सा घेऊनही कॅन्सरचा पुनरुद्भव होणे, उदरपोकळीतील अन्य अवयवांत कॅन्सर पसरणे, उदरपोकळीत जलसंचिती होणे असे उपद्रव अनेक रुग्णांमध्ये उद्भवत असल्याने अशा अवस्थांमध्ये व्याधिप्रतिकारशक्ती वाढविणारी रसायन चिकित्सा लाभदायी ठरते.
3. पंचकर्म / शोधनचिकित्सा – रुग्णाचे बल चांगले असल्यास कॅन्सरच्या अपुनर्भवासाठी दरवर्षी बस्ति व वमन चिकित्साही वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करणे हितकर ठरते.
4. पथ्यकर आहार – विहार मार्गदर्शन – षड्रसयुक्त, पचण्यास हलका, पाचक परंतु पोषक आहार तसेच नियमित व्यायाम, योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नित्य प्राणायाम व योगासनांची जोड देणे श्रेयस्कर ठरते.
5. समुपदेशन- रुग्णाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच रुग्णाचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी समुपदेशन उपयुक्त ठरते.

Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Dr. Richa
Dr. Richa
BAMS, Mumbai Suburban
Dr. Sujit Shinde
Dr. Sujit Shinde
BHMS, Family Physician Homeopath, 24 yrs, Pune
Dr. Vishwajeet Desai
Dr. Vishwajeet Desai
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 8 yrs, Pune
Dr. BHARAT SARODE
Dr. BHARAT SARODE
MBBS, Addiction Psychiatrist Educational Psychologist, 25 yrs, Pune