Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
रातांधळेपणा
#रोग तपशील#दृष्टी गमावणे



रातांधळेपणा :

या आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ-या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत. डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. (बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे.) आता हा आजार फार क्वचित आढळतो.

उपचार
'अ' जीवनसत्त्वाचे जास्त शक्तीचे तेलकट औषध बाटलीतून मिळते. याचा एक चमचा म्हणजे दोन लाख युनिट असतात. आजाराच्या उपचारासाठी एकूण सहा लाख युनिट द्यावे लागतात (रोज एक चमचा तीन दिवस).मात्र आजार नसल्यास केवळ एक चमचा द्यावे.

रातांधळेपणा टाळण्यासाठी, सर्व मुलांना 5 वर्षापर्यंत दर 6 महिन्यांनी एक चमचा "अ" जीवनसत्त्वाचा डोस द्यावा.

'अ' जीवनसत्त्वाअभावी येणारे अंधत्त्व हे पूर्णपणे टाळण्यासारखे आहे. त्यासाठी करायची उपाययोजना ही अतिशय साधी आहे. त्यामुळे मुलाचे आयुष्यभराचे भावी नुकसान टाळता येईल.

उपचार केल्यानंतर रातांधळेपणा, डोळयाचा कोरडेपणा, पूर्ण बरा होतो. पण बिटॉटचे ठिपके एकदा तयार झाले की जात नाहीत. मात्र, बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा जाऊन ते परत पूर्ववत चकचकीत होऊ शकते. पण बुबुळ मऊ पडून फुटले तर परत कधीही दृष्टी येऊ शकत नाही. गरोदर मातेस 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो. म्हणून गरोदर मातेलाही रातांधळेपणासाठी डोस देणे आवश्यक आहे. बुबुळाचा कोरडेपणा व धूसरपणा ही अंधत्त्वाची पूर्वसूचना समजा. यावर अजिबात वेळ न दवडता उपचार करा. या बरोबरीने जंतासाठी बेंडेझोल हे औषध द्यावे.

'अ' जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, (विशेषत: शेवग्याचा हिरवा पाला, पालक, मेथी, इत्यादी) रंगीत फळे (उदा. गाजरे, टोमॅटो,पपई, आंबा,भोपळा, इ.) व प्राण्यांचे मांस, यकृत, अंडी, मासे उपयोगी आहेत. या सर्व पदार्थांमध्ये'अ' जीवनसत्त्व भरपूर असते.

'ड' जीवनसत्त्वाचा अभाव (मुडदूस)
हाडांमध्ये चुन्याचे क्षार जमून हाडे मजबूत होण्यासाठी 'ड' जीवनसत्त्वाची गरज असते. 'ड'जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास हाडांमध्ये चुन्याचे क्षार न जमल्याने हाडे दुबळी व मऊ बनतात.

लक्षणे व रोगनिदान
- अशा मुलांचे कपाळ पुढे आलेले दिसते.
- घाम जास्त येतो.
- पुढची टाळू वर्षानंतरही वयाच्या प्रमाणात भरलेली नसते.
- एरवी एक वर्ष वयाला खूपच थोडी टाळू शिल्लक राहिलेली असते व दीड वर्षापर्यंत भरून येते.
- विकासाचे टप्पे लांबतात. उदा. आठ-नऊ महिन्यांचे झाले तरी अजून बाळ बसत नाही, एक वर्षाचे मूल उभे राहत नाही, चालण्याचे वय लांबते.
- सांध्याच्या बाजूची हाडांची टोके फुगतात व सांधे सुजल्यासारखे दिसतात. (विशेषत: मनगटे, गुडघे)
- छातीच्या फासळया व पायांना बाक येतो.
- पोट मोठे दिसते.

प्रतिबंधक उपाय
दूध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादींमध्ये 'ड' जीवनसत्त्व भरपूर असते. सूर्यप्रकाशात (विशेषत: कोवळे ऊन) त्त्वचेखाली 'ड' जीवनसत्त्व त्यार होत असते. म्हणून मुले बाहेर हिंडायच्या वयाची झाली, की मुडदूस आपोआप कमी होतो. बाळास रोज सकाळच्या कोवळया उन्हात 15 मिनिटे ठेवल्यास 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागते.

Dr. Sohan Narkhede
Dr. Sohan Narkhede
MBBS, Ophthalmologist, Pune
Dr. Snehal Pharande
Dr. Snehal Pharande
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Vishwas Takale
Dr. Vishwas Takale
BAMS, General Physician, 19 yrs, Pune
Dr. Kirtiraj Dilip Kate
Dr. Kirtiraj Dilip Kate
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Tushar Ghode
Dr. Tushar Ghode
BDS, Dentist, 6 yrs, Pune