Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हाता पायाला मुंग्या येणे
#रोग तपशील#कार्पल टनेल सिंड्रोम



हाता पायाला मुंग्या येणे

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर किंवा झोपेतून उठताना मुंग्या येणे किंवा बधिरपणा जाणवू शकतो. हातापायाच्या एखाद्या शिरेवर बराच वेळ दाब आल्याने या संवेदना जाणवतात. हातपाय हलविणे किंवा हिंडू- फिरू लागले की त्रास जातो. झोपेतसुद्धा एकाच स्थितीत जास्त काळ राहण्याने असा शिरेवर दाब येणे संभवते. याकरिता निसर्गाने झोपेत कूस बदलली जावी, अशी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे. समजा आपण डाव्या कुशीवर झोपलो आहोत. हळूहळू आपल्या डाव्या नाकपुडीतील अस्तर सुजू लागते. साधारण २ तासांनी नाकपुडी बंद होते. नाकपुडी बंद झाल्याची माहिती मेंदूकडे जाते व आपोआपच कूस बदलली जाते. दीर्घकाळ एकाच जागी बसणाऱ्या व्यक्ती आपले पाय आलटून पालटून असा दाब येणे टाळतात. शरीराच्या एकाच भागावर मधूनअधून किंवा सातत्याने मुंग्या येण्याची अथवा तो भाग बधिर असण्याची भावना येणे हे लक्षण तेथील संवेदना मेंदूत नेणाऱ्या चेतासंस्थेच्या भागातील दोषांचे आहे. शरीराच्या डाव्या अथवा उजव्या भागावर मुंग्या येणे हे लक्षण मेंदूत दोष निर्माण होत असण्याचे आहे. पक्षाघात (शरीराची उजवी अगर डावी बाजू शक्तीहीन होणे, लुळी पडणे) किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी पडणे, या आजाराची सुरवात अशी होते. डोक्यााला इजा झाल्यावर काही काळाने अशा मुंग्या येऊ लागणे हे मेंदूच्या वरच्या आभ्रयात रक्ताची गुठळी झाल्याचे लक्षण आहे. मेंदूत गाठ होणे, मेंदूला सूज येणे, मेंदूत जिवाणू किंवा विषाणू यांच्यामुळे दाह होणे अशा अनेक मेंदूच्या आजाराची सुरवात झाल्याचे या मुंग्या येण्यापासून कळू शकते. एकाच हाताला मुंग्या येणे अथवा बधिरपणा जाणवणे हे मानेतील मणक्याकत दोष असल्याचे लक्षण असते. दोन मणक्यांवतील चकत्या झिजतात, त्या सरकतात, त्या सरकलेल्या भागाचा दाब मानेतून हातात येणाऱ्या शिरांवर येतो व मुंग्या येण्याचा त्रास सुरू होतो. असा त्रास बऱ्याच वेळा हाताला होतो तेव्हा पंज्याच्या करंगळी व अनामिका या बोटात होतो. जेव्हा मुंग्यांचा त्रास अंगठा व तर्जनी येथे होतो तेव्हा मनगटाजवळील “मीडियन’ शीर दाबली जात असते. कार्पल टनेल सिंड्रोम काही साध्या व्यायाम व औषधांनी बरे न वाटण्यास शस्त्रक्रिया करून हा आजार पूर्ण बरा करता येतो. नर्व्ह कंडक्शान स्टडीज या तपासानंतर हे निदान निश्चिरत करता येते. मधुमेह या विकारात पायाच्या (व हातांच्यासुद्धा) शिरा कमजोर होऊ लागतात. लघवीला वारंवार जावे लागणे, तहान लागणे, वजन कमी होणे, थकवा होणे अशी लक्षणे असली, तर लगेच रक्त-लघवी तपासून मधुमेहाचे निदान केले जाते. अनेक रुग्णांना तळपायाची आग होते. मधुमेहाखेरीज कोणत्याही कारणाने तळपायाला जाणाऱ्या शिरांवर दाब येत असला किंवा रक्ताचा पुरवठा कमी पडला तर तळपायांची आग होते. कॅपसॅसिन नावाचे एक द्रव्य मिरचीपासून काढतात. कॅपसॅसिन असणारे मलम तळपायावर चोळल्याने तळपायाची आग होण्याचा त्रास शमतो. . काही रुग्णांना उभे राहिले किंवा चालू लागले की पायांना मुंग्या येऊ लागतात. चालताना मधेच उभे राहण्याची वेळ आली तर पायात होणारा त्रास असह्य होऊ लागतो. आपल्या कमरेच्या मणक्याहतील चकत्या झिजून सरकल्या म्हणजे मज्जारज्जूतून पायात जाणाऱ्या चेताशिरांवर दाब येऊ लागतो, त्यामुळे हा त्रास होतो.

खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षण आहे. पण हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का? तर त्यासाठी ही ५ कारणे जबाबदार ठरतात.

व्हिटॅमिनची कमतरता:
जर तुमच्या हात व पाय दोघांना ही मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता आहे. तसंच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.


खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास दूर होण्यास मदत होईल.

मानेची नस आखडणे:
मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.

मधुमेह:
रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हायपरथायरॉईसम: थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य ठरेल.

हातापायाला मुंग्या

एकाच जागेवर बराच वेळ बसल्याने किंवा हातापायाच्या एखाद्या शिरेवर दाब आल्याने हातपाय सुन्न होतात. त्यालाच मुंग्या येणे म्हणतो, पण या मुंग्या नेमक्या कशामुळे येतात त्याची नेमकी कारणे जाणून घेऊ या.

– शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असेल तर हातापायाला मुंग्या येतात. त्यामुळे वारंवार थकल्यासारखं वाटणं, सारखा कंटाळा येणं, आळस येणं असं वाटत राहतं.
– तासन्तास संगणकावर टायपिंग करत राहिल्याने मनगटाच्या नसा आकुंचित होऊन हाताला मुंग्या येतात, पण फिजिओथेरपिस्टच्या मदतीने वा योग्य व्यायामाने बरे वाटते.
– मानेची नस आखडली असेल तर पाठीपासून पायापर्यंत आणि मानेपासून हातापायापर्यंतच्या भागांना मुंग्या येतात. बसण्याची चुकीची पद्धत आणि दुखापतीमुळे मान आखडली जाते.
– मधुमेही रुग्णांना हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास होत असतो. त्यामुळे या रुग्णाच्या हातापायांना मुंग्या येतात, पण याबरोबरच खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
– हायपरथायरॉईझम असलेल्यांना हा त्रास जाणवू शकतो. त्यांच्या थायरॉईड ग्रंथी निक्रिय असल्यास थकवा येणे, वजन वाढणे हा त्रास जाणवू लागतो, पण हायपरथायरॉईझम आहे की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करणे आवश्यक आहे.

Dr. Amar S. Shete
Dr. Amar S. Shete
BAMS, Family Physician, Pune
Dr. Arati Bayas-Pawar
Dr. Arati Bayas-Pawar
BPTh, Physiotherapist Homecare Physiotherapist, 12 yrs, Pune
Dr. Ashwin Prasad
Dr. Ashwin Prasad
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Cosmetic Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Mangal Thube - Buchade
Dr. Mangal Thube - Buchade
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Vikas Kumar
Dr. Vikas Kumar
Specialist, Gastroenterologist, Pune