
ब्रोन्कायटिस
ब्रोन्कायटिस (Bronchitis) ही एक वैद्यकीय संज्ञा फुप्फुसातील श्वासनलिका व तेथील इंद्रियांना आलेली सूज यासाठी वापरली जाते. ब्रोन्कायटिसचे दोन भागात वर्गीकरण करता येऊ शकते. तीव्र ब्रोन्कायटिस व कालांतराने घडणारा ब्रोन्कायटिस.
Acute
तीव्र ब्रोन्कायटिस मध्ये अनेकदा हा रोग सर्दी-ताप ह्यांच्या बरोबरीने बाधा घडवून आणतो. ९०% वेळी हा रोग विषाणूंमुळे होतो. मात्र १०% वेळी जीवाणूंपासून बाधा होणे सुद्धा शक्य असते.[१]
Chronic
कालांतराने घडणारा ब्रोन्कायटिस हा "सी.ओ.पी.डी." म्हणजेच श्वसनातील अडथळ्यांचे विकार ह्यांचा प्रकार आहे. हा आजार वर्षातून साधारणपणे तीन महिने, कमीत कमी दोन वर्षे चालतो. ह्या प्रकारचा ब्रोन्कायटिस हा सारखं सारखं श्वसनातून घातक / त्रासदायक कण घेतले गेल्यामुळे होतो. तसेच भरपूर प्रमाणात धूम्रपान केल्यामुळेही हा आजार होतो. .
वर्गीकरण
तीव्र ब्रोन्कायटिस
साधारणतः तीव्र ब्रोन्कायटिस हा तीन आठवड्यांपेक्षा कमी वेळात बरा होतो. त्याचे मुख्य लक्षण म्हणजे खोकला येणे. ह्याशिवाय खोकल्यातून कफ, छातीत दुखणे हे सर्व बघून ब्रोन्कायटिसचीच खात्री पटते.
दीर्घकालीन ब्रोन्कायटिस
कालांतराने घडणारा ब्रोन्कायटिस हा सर्वसाधारणपणे उत्पादनक्षम खोकला जर वर्षातून तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकून किमान दोन वर्षे राहिला तर ओळखू येतो- हे तेव्हाच, जेव्हा ह्याच्या साथीने आणखी रोग शरीरात नसतात. नाहीतर इतर रोगांच्या सह ह्याचा काल हा वाढूही शकतो. तिसरा प्रकार म्हणजे जिवाणूंमुळे झालेला ब्रोन्कायटिस. मात्र हा बरा करण्यासाठी जैवाविरोधक औषध घ्यावी लागतात.[२]
लक्षणे
खोकला हे ह्या आजाराचे सर्वात सामान्य, प्राथमिक लक्षण आहे. श्वसनलिकेतील जास्तीचा कफ बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात खोकला केला जातो. ह्याव्यतिरिक्त आणखी लक्षणे: गळते नाक, घसा दुखी, दम लागणे, भरभर श्वासोच्छ्वास, नाक चोंदणे व लहान प्रमाणात ताप. मात्र नियतकालिक ब्रोन्कायटिसमध्ये फक्त श्वासोच्छ्वासात त्रास होतो, खोक्ल्यासह.
आजाराचे कारण
तीव्र ब्रोन्कायटिस हा ऱ्हायनो, कोरोना, आडीनो, मेटान्यू सारख्या काही विषाणूंमुळे होतो. तर दीर्घकालीन ब्रोन्कायटिस धूम्रपान, तंबाखू इत्यादींमुळे होतो. बऱ्याचदा कापड उद्योग, पशुपालन उद्योग यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना ह्या आजाराचा बळी बनावे लागते. [३]
रोगाचे निदान
रुग्णाची तपासणी करतेवेळी वैद्यांना ह्या रोगाचे निदान करता येऊ शकते. क्ष-किरणांच्या निदानाने न्युमोनिया नाही ना, ह्याची खात्री करून घ्यावी. अशाप्रकारे रोगाचे निदान करणे सोयीस्कर होईल.
उपचार
रोगावर उपचार हा त्याच्या लक्षणांवर आधारित असून वेगळ्या लक्षणांसाठी वेगळया उपचाराची गरज असते. ९०% वेळी विषाणू रोगाचे कारण असल्यामुळे जैवाविरोधाके घेणे योग्य ठरत नाही. ब्रोन्कायटिस साठी सामान्यतः एक उपकरण देतात, ज्यातून औषधी पूड श्वासावाटे देता येते.




