Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गरोदरपणात स्तनाचा त्रास
#रोग तपशील#स्तन वेदना



गर्भारपणा, प्रसूती व स्तनपान
गर्भारपणाच्या काळात गर्भरक्षक प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाच्या प्रभावामुळे दुधाच्या ग्रंथींचा पुढील विकास होतो. यामुळे स्तनांचे आकारमान आणखी वाढते. त्यामुळे स्तनांच्या कातडीवर ताणल्याच्या रेषा दिसू लागतात. स्तनाग्रांचाही आकार वाढतो. स्तनाग्रे आणि भोवतालच्या चकतीचा रंगही जास्त गडद होतो.

प्रसूतीनंतर स्तनांचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे आणि दुधाची निर्मिती सुरू झाल्यामुळे स्तनांचे आकारमान आणखी वाढते. पहिले 3-4 दिवस ते दुधाने भरून आल्यामुळे जास्त घट्ट लागतात. त्यानंतर बाळाला पाजण्याच्या कालावधीत बाळाच्या चोखण्याप्रमाणे दूध पाझरत असल्यामुळे हा घट्टपणा कमी होतो.

बाळ अंगावर प्यायचे बंद झाल्यावर दोन गर्भारपणांच्या मधल्या काळात दूधनिर्मिती थांबते आणि स्तनांचा आकार बराचसा पूर्ववत होतो. पण प्रत्येक गर्भारपणात तो थोडा थोडा वाढत राहातो, स्तनाग्रे जास्त गडद होत जातात आणि ताणल्याच्या रेषाही वाढतात.

कार्य

स्तनपान करणारे मूल
स्त्रीयांमधे पूर्ण वाढ झालेल्या स्तनातील २/३ भाग दूध-निर्मितीच्या ग्रंथींनीच व्यापल्यामुळे स्तनांचे मुख्य काम दूध निर्मिती आणि बाळाला दूध पाजणे (स्तनपान देणे) हेच आहे.

मुलगा किंवा मुलगी, दोघांच्याही स्तनांची थोडी वाढ आणि थोडे चिकट दूध पाझरणे जन्मानंतर एक-दोन दिवस शक्य असते. कारण गर्भावस्थेत बाळ आईच्या दूध पाझरण्यास उत्तेजित करणार्‍या संप्रेरकांच्या प्रभावाखाली असते. किशोरवयात दुधाच्या ग्रंथींच्या मुख्यतः नलिकांच्या जाळ्याची आणि अनुषंगिक चरबीची वाढ होते.

गर्भारपणात स्तनांचा आणि मुख्यतः दुधाच्या ग्रंथींचा विकास प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या प्रभावाखाली होतो. प्रोलॅक्टीन या संप्रेरकाची रक्तातील पातळीही गर्भारपणात वाढत जाते. त्यामुळे दुधाच्या ग्रंथींचा आणखी विकास होऊन गर्भारपणाच्या अगदी शेवटी शेवटी त्या दूध निर्मितीसाठी तयार होतात आणि मुख्यतः बाळंतपणानंतर दुधाच्या ग्रंथींत दुधाची निर्मिती सुरू होते. बाळंतपणानंतर बाळाने चोखायला सुरुवात करताच स्तनाग्रांच्या उद्दीपनामुळे प्रोलॅक्टीन आणि ऑक्सीटोसिन (Oxytocin) या संप्रेरकांच्या निर्मितीला चालना मिळून त्यांच्या निर्मितीत झपाट्याने वाढ होते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली अनुक्रमे दूध-निर्मिती आणि दूध पाझरणे या गोष्टी घडतात. फक्त स्त्रीमधेच आणि बाळाला पाजण्याच्या वेळीच फक्त दूध निर्मिती आणि दूध पाझरण्याची क्रिया व्हावी हा यामागचा हेतू आहे. पण काही वेळा संप्रेरकांचे असंतुलन, अंतःस्रावी ग्रंथींचे विकार, काही औषधांचा दुष्परिणाम, अतीतणाव इत्यादी कारणांमुळे गर्भारपण नसतानाही दूधनिर्मिती होऊन दूध पाझरू शकते. स्तनाग्रांच्या उद्दीपनामुळे निर्माण होणार्‍या ऑक्सिटोसिनमुळे गर्भाशयाच्या आकुंचन-प्रसरणालाही चालना मिळते. यामुळे प्रसूतीनंतर रक्तस्राव कमी होण्याला आणि गर्भाशय पुन्हा मूळ स्थितीत येण्याला मदत होते.

बाळंतपणानंतर पहिले तीन ते चार दिवस स्तनांचा रक्तपुरवठा वाढल्यामुळे आणि दुधाने भरून आल्यामुळे ते जास्त घट्ट लागतात. त्यानंतर बाळाला पाजण्याच्या कालावधीत बाळाच्या चोखण्याप्रमाणं दूध पाझरत असल्यामुळे हा घट्टपणा कमी होतो आणि बाळाच्या गरजेप्रमाणे दूधनिर्मिती आणि पाझरणे चालू राहाते. दुधाच्या निर्मितीसाठी थोड्या जास्त तापमानाची गरज असते. दूध-निर्मितीच्या काळात जास्त रक्तपुरवठ्यामुळे स्तनांचे तापमान वाढते. त्यांतील उष्णता टिकून राहाण्यास मदत व्हावी, बाळाला अंगावर पिण्यासाठी सोयिस्कर व्हावे आणि पिताना त्याचे नाक स्तनावर दाबले जाऊन श्वास घ्यायला अडचण पडू नये म्हणून स्तनांचा वैशिष्ट्यपूर्ण गोल आकार विकसित झाला आहे.

नंतर बाळ अंगावर प्यायचे बंद झाल्यावर दोन गर्भारपणांच्या मधल्या काळात दूधनिर्मिती थांबते आणि स्तनांचा आकार जवळजवळ पूर्ववत होतो. पण प्रत्येक गर्भारपणात तो पूर्वीपेक्षा थोडाथोडा वाढतो. याप्रमाणे प्रत्येक गर्भारपण आणि बाळंतपणानंतर हे दूधनिर्मिती आणि दूध पाझरण्याचे कार्य आणि स्तनांतील बदल चालू राहातात.

स्तनांची ठेवण
स्तन छातीवर साधारण दुसर्‍या फासळीपासून सहाव्या फासळीपर्यंत आणि मध्यरेषेपासून काखेपर्यंत पसरलेले असतात. त्यांची ठेवण छातीवर पुढे समोर वाढलेले, बाकदार, दोन्ही बाजूंना झुकलेले, खाली झुकलेले किंवा लोंबणारे अशी असू शकते. दोन स्तनांतील अंतरही प्रत्येक स्त्रीत वेगवेगळे असते.

स्तनांचा आकार आणि आकारमान
वैय्यक्तिक रंग-रूपातील फरकांप्रमाणेच स्तनांच्या आकारातही नैसर्गिकपणेच खूप विविधता आढळते. शंकूप्रमाणे किंवा घुमटाप्रमाणे; बसके किंवा लांबट; टोकदार किंवा फुगीर; असे सर्व स्तनांचे आकार नैसर्गिकपणेच आढळतात. स्तनांच्या आकाराप्रमाणेच आकारमानातही नैसर्गिकपणेच मोठा बदल आढळतो. स्तनातील दुधाच्या ग्रंथी आणि भोवतालची चरबी यांचे प्रमाण निरनिराळ्या स्त्रीयांत वेगवेगळे असते. या प्रमाणांवर स्तनाचे वजन आणि घट्टपणा अवलंबून असतो. स्तनाचे वजन अंदाजे ५०० ते १००० ग्रॅम्सपर्यंत असू शकते (Breast: Anatomy). वय आणि आयुष्यातील टप्प्याप्रमाणेही स्तनांचे आकारमान आणि वजनात बदल होतात.

पण सर्वसाधारणपणे स्तनाच्या लहान-मोठेपणावरून त्यांच्यातील चरबी आणि दुधाच्या ग्रंथींचं प्रमाण आणि त्यांची दूधनिर्मितीक्षमता यांसंबंधी अंदाज बांधता येत नाहीत.

स्तनांची असमानता
जवळजवळ २५% स्त्रियांच्या दोन्ही स्तनांत लक्षात येण्याइतकी असमानता नैसर्गिकपणेच असते. किशोरवयात हे तात्पुरतं असतं. तसंच काही वेळा या वयात मुलींच्या स्तनांची खूप जास्त किंवा खूप कमी वाढही होऊ शकते. डावा स्तन मोठा असण्याचे प्रमाण सहसा जास्त असते. स्तनांची ठेवणही असमान असू शकते.

५ ते १०% स्त्रियांत ही असमानता जास्त प्रमाणात असू शकते. अशा वेळी किंवा असमानता नंतर निर्माण झाल्यास ते एखाद्या रोगाचे लक्षण आहे का याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे आहे. अनैसर्गिक असमानतेची किरकोळ कारणांपासून स्तनांच्या कर्करोगापर्यंत अनेक कारणे आहेत.

स्तन झाकणारे कपडे वापरले जात असल्यास नैसर्गिक असमानतेचा फारसा प्रश्न येत नाही. पण स्तनाकार दिसणारे कपडे वापरात असल्यास योग्य किंवा एका बाजूला पॅडिंग केलेल्या ब्रेसियरच्या किंवा इतर अंतर्वस्त्रांच्या वापराने असमानता लक्षात येत नाही. स्तनांतील असमानतेमुळे सौंदर्याला बाधा येत असेल तर स्तनाकारांतील तफावत दूर करणार्‍या स्तनांचे रोपण किंवा पुनर्रचना शस्त्रक्रियांची जरूर पडते. कोणत्या प्रकारची शत्रक्रिया करायची आणि एकाच स्तनावर का दोन्ही ते असमानतेच्या प्रमाणावर आणि प्रकारावर अवलंबून असते.

स्तन-सौंदर्य आणि गर्भारपण-स्तनपान
बाळाला पाजण्यामुळे स्तन ओघळतात, त्यांचा आकार बिघडतो आणि त्यांचे सौंदर्य कमी होते हे सर्वसाधारण गैरसमज असले तरी वाढते वय हे स्तन ओघळण्याचे प्रमुख कारण आहे. त्याशिवाय धूम्रपान, अनेक वेळा गर्भधारणा, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आणि वजनातील चढ-उतार ही स्तन ओघळण्याची कारणे आहेत असे संशोधकांना आढळले आहे.

Dr. Uday  Maske
Dr. Uday Maske
BAMS, Ayurveda, 18 yrs, Mumbai
Dr. Dr Amrut Oswal
Dr. Dr Amrut Oswal
Specialist, Orthopaedics Joint Replacement Surgeon, 29 yrs, Pune
Dr. Shweta Muley
Dr. Shweta Muley
BHMS, Homeopath, 6 yrs, Pune
Dr. Manish Pathak
Dr. Manish Pathak
MDS, Dentist Periodontist, 10 yrs, Pune
Dr. Vijay Satav
Dr. Vijay Satav
MD - Allopathy, Clinical Pathologist, 23 yrs, Pune