Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मूत्राशय संक्रमण
#रोग तपशील#मूत्राशय संक्रमण



मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजे काय?
मूत्राशयमुख किंवा मूत्राशयाला झालेला संसर्ग

मूत्रमार्गाचा संसर्ग सामान्य आहे काय?
१०० व्यक्तींपैकी २ व्यक्तीमध्ये हा रोग दिसून येतो. बहुतांशी महिलांमध्ये हा दिसून येतो कारण त्यांचे मूत्राशयमुख लहान असते आणि गुदद्वाराजवळ असते. पुरूषांमध्ये याचे प्रमाण कमी असते. पौढांमध्ये मूत्रशय व मूत्रपिंडाचा दाह वाढण्याची शक्यता असते.

मूत्रमार्गाला संसर्ग कसा होतो?
सामान्यत: मूत्राशयमुख आणि मूत्रशयात बॅक्टेरिया नसतात. जेव्हा एखादा जंतू मूत्राशयमुख आणि मूत्राशयात शिरतो तेव्हा संसर्ग होतो. मूत्राशयमुख किंवा मूत्राशयात रक्तप्रवाह तुंबुन अडथळा निर्माण होणे, रबरी नळी मूत्राशयात घालणे, गर्भारपण, मधुमेह यात मूत्रमार्गाला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

मूत्रमार्गाला संसर्ग झाल्याची लक्षणे कोणती?

सारखे लघवीला जावे लागणे.
मूत्रोत्सर्जन करताना दाह होणे.
मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे.
मूत्रात काही प्रमाणात रक्त दिसणे.
कोणत्या जीव-जंतूमुळे संसर्ग होतो?

सगळ्यात जास्त E.coli मुळे,
इतरांमध्ये S.saprophysticus, Pseudomonas (हा दवाखान्यात भरती केलेल्या रूग्णांमध्ये जास्त आढळतो.)
प्रौढांमध्ये मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त का असतो?
पुरूषांमध्ये मूत्राशयामुखाभोवती ज्या ग्रंथी असतात (Prostategland) त्या मोठ्या झाल्यामुळे पूर्णपणे मूत्रोत्सर्जन होत नाही. तसेच वय झाल्यामुळे संसर्गास विरोध करण्याची शक्ती, प्रतिकारशक्ती कमी होते आणि द्रवपदार्थ कमी प्रमाणात होणे, या कारणांमुळे प्रौढांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.

या संसर्गाचा उपचार कसा केला जातो?
मूत्रमार्गाचा संसर्ग झाला आहे हे निश्‍चित करण्यासाठी मूत्राची तपासणी केली जाते. बॅक्ट्रीम, ऍमोक्सीसीलीन प्रतिबंधक औषधे देऊन उपचार केला जातो. सामान्यत: बायकांमध्ये जेथे जास्त गुंतागुंत नाही अशा केसेसमध्ये तीन दिवसांचा उपचार दिला जातो. प्रौढांमध्ये कृत्रिम माध्यमामध्ये सूक्ष्म जीवाणू मुद्दाम वाढविण्याची (Urine Culture) गरज नसते, परंतु दवाखान्यात भरती केलेले रूग्ण इत्यादींच्या बाबतीत Culture करणे आवश्यक आहे.

मूत्रपिंडदाह म्हणजे काय?
मूत्रपिंड किंवा गर्भाशयावर ज्या संसर्गामुळे परिणाम होतो, त्याला मूत्रपिंडदाह असे म्हणतात.

मूत्रपिंडदाह कसा होतो?
मूत्राशयमुख आणि मूत्राशय यातून संसर्ग फैलावतो. मूत्रपिंडदाह खालील परिस्थितीत दिसून येतो.

मुतखडा
जुना किंवा पुन्हा-पुन्हा होणारा मूत्रमार्ग संसर्ग,
प्रतिकारशक्ती क्षीण झालेले रूग्ण उदा. (कर्करोग किंवा एडस्‌ झालेले रूग्ण)

मूत्रमार्गातील संसर्ग रोखण्यासाठी उपाय

स्त्रियांना मूत्रमार्ग संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. स्त्रियांना वारंवार होणा-या व दीर्घकाळ टिकणा-या संसर्गाचे प्रमाण इतके जास्त आहे, की आयुष्यभर हा त्रास सहन करणा-या स्त्रियांची संख्या दोनपैकी एक असते असे काही तज्ज्ञांचे मत आहे.


bladder-cancer-v2मूत्रमार्गातील संसर्ग (युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन- यूटीआय) समस्येत मूत्रमार्गाला इजा होते. खालच्या मूत्रमार्गाला (लोअर यूटीआय) इजा झाल्यास त्याला ब्लॅडर इन्फेक्शन (सायटिस) असे म्हणतात, तर वरच्या मूत्रमार्गाला संसर्ग झाल्यास त्याला किडनी इन्फेक्शन (पायलोनफ्रायटिस) असे म्हणतात.

लोअर यूटीआयच्या लक्षणांमध्ये लघवी करताना होणा-या वेदना आणि वारंवार लघवी होणे या लक्षणांचा समावेश आहे. किडनी इन्फेक्शनमध्ये ताप, कमरेत दुखणे तसेच लोअर यूटीआयच्या लक्षणांचा समावेश होतो. काही दुर्मीळ प्रसंगांमध्ये लघवीत रक्तही दिसून येते. अतिशय वृद्ध व तरुणांमधील लक्षणे वेगवेगळी असतात तसेच कित्येकदा ती नेमकेपणाने सांगता येत नाहीत.

इश्वचिरीया कॉली बॅक्टेरिया हे यूटीआयचे प्रमुख कारण असते, हे जीवाणू सामान्यत: आतडय़ांमध्ये आणि गुदाशयामध्ये राहतात. दुर्मीळ घटनांमध्ये बुरशी किंवा इतर जीवाणूही कारणीभूत असतात. यूटीआय होण्यामागे स्त्रियांची शरीररचना, लैंगिक संबंध, मधुमेह आणि स्थूलत्व ही कारणेही असतात.

लैगिंक संबंधाचाही या कारणांत समावेश असला, तरी यूटीआय हा लैंगिक संबंधांतून होणारा रोग (एसटीआय) समजला जात नाही. मूत्रिपडाला संसर्ग झाल्यास त्यापाठोपाठ लगेच मूत्राशयालाही संसर्ग होतो, मात्र त्यामागे रक्तातून आलेल्या संसर्गाचाही संबंध असू शकतो. यूटीआय झाल्यास काय करावे तसेच ते होऊ नये यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करता येईल याची माहिती घेऊ.

बहुतेक यूटीआय जीवाणूंच्या संसर्गामुळे होतात, जे योनीच्या िभतीला चिकटून राहतात व हळूहळू त्यांची संख्या वाढत जाऊन मूत्रमार्गापर्यंत पसरते. मूत्रमार्गापर्यंत गेलेले जीवाणू मूत्राशयापर्यंत (लोअर ट्रॅक्ट इन्फेक्शन) जाऊन तिथेही संसर्ग करू शकतात किंवा मूत्राशयापासून गर्भाशय आणि मूत्रिपडाला (अप्पर ट्रॅक्ट इन्फेक्शन) संसर्ग निर्माण करू शकतात. यूटीआयची समस्या होऊ नये म्हणून स्त्रियांना काही सर्वसाधारण सूचना पाळता येतील आणि जीवाणूंची वाढ रोखता येईल. या सूचना स्वच्छता, कपडे, व्यायाम व औषधे अशा चार भागांत विभागता येतील.

स्वच्छता – लघवीला जाऊन आल्यानंतर तो भाग कायम पुढून मागे पुसून काढा. मागून पुसायचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण त्यामुळे गुदाशयातील जंतू हात व टिश्यूपर्यंत पोहोचू शकतील. शौचाला जाऊन आल्यानंतर गुदद्वार सौम्यपणे, पुढून मागे स्वच्छ करा. एकाच टिश्यूने दोनदा पुसू नका. गुदाशयापासून सुरू झालेली पुसण्याची क्रिया मूत्राशयाच्या पुढच्या बाजूपर्यंत गेल्यास संसर्गजन्य जीवाणू मूत्राशयापर्यंत जाण्याची शक्यता खूप जास्त असते.

स्वच्छ आंघोळ करा आणि खूप वेळ आंघोळ करणे टाळा. आंघोळीचे पाणी आंघोळ करणा-याच्या अंगावरील जंतूंमुळे संसर्गजन्य होऊ शकते. टबमध्ये बसल्याने जीवाणू मूत्राशयाच्या पुढच्या भागापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते. शॉवर घेताना किंवा आंघोळ करताना पुढून मागे पुसा. स्वच्छ धुवा आणि योग्य पद्धतीने पुसून घ्या.

मासिक पाळीच्या कालावधीत टॅम्पून्सचा वापर करा. या कालावधीत सॅनिटरी नॅपकिन्स किंवा पॅड्सपेक्षा टॅम्पून्स वापरणे योग्य असते, कारण त्यामुळे मूत्राशयाचा पुढचा भाग सॅनिटरी पॅड वापरतानाच्या तुलनेत जास्त कोरडा राहातो व त्यामुळे जीवाणूंची वाढ मर्यादित राहाते.

दोन लघवींमध्ये फार अंतर असता कामा नये. दिवसा, जागेपणी किमान दर चार तासांनी लघवीची भावना झाली नाही, तरी ती करणे आवश्यक असते. लघवी करण्यासाठी योग्य जागा किंवा वेळ मिळेपर्यंत लघवी करण्याची भावना रोखून ठेवणे अतिशय चुकीचे आहे.

कपडे : घट्ट बसणारी, तंग कापडाची अंतवस्त्रे घालू नये. अशा कापडांमुळे ओलावा तयार होऊन त्वचा मऊ होते व मूत्राशयाच्या पुढच्या बाजूस जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता वाढते. नेहमीच्या वापरासाठी सुती अंतर्वस्त्रे वापरणे केव्हाही चांगले.

आहार : भरपूर पाणी प्या. प्रत्येक खाण्याबरोबर किमान एक ग्लास पाणी पिण्याने सुरुवात करा. लघवी नेहमीच्या फिकट पिवळ्या रंगापेक्षा जास्त गडद झाल्यास, त्याचा अर्थ शरीराला आवश्यक पाणी मिळालेले नाही असा होता. म्हणून भरपूर पाणी प्या. क्रॅनबेरीचा रस आणि गोळ्यांमुळे मूत्रमार्गाचा संसर्ग कमी होतो हे सिद्ध झालेले नाही. तरुण स्त्रियांमध्ये ते जास्त प्रभावी ठरले आहे.

व्यायाम : शारीरिक व्यायाम करताना दर थोडय़ा वेळाने लघवीला जाणे, भरपूर पाणी व इतर द्रव पदार्थ पिणे आवश्यक आहे. लैंगिक संबंधानंतर जास्त काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे मूत्राशयाच्या भागात जीवाणूंची वाढ होण्याची शक्यता फार जास्त असते.

लैंगिक संबंधांनंतर लघवीला जाणे आवश्यक असते. काही रुग्णांना त्यांचे डॉक्टर लैंगिक संबंधानंतर युरिनरी अँटीस्पेटिक किंवा अँटीबायोटिक घेण्यासाठी देतात. शुक्राणू नष्ट करणारी स्पर्मायसिडल जेली किंवा नेहमीचे व्हजायनल फ्लोरा वापरणे टाळा, जे संसर्गजन्य जीवाणूंची वसाहत रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

औषधे : इस्ट्रोजेनिक व्हजायनल क्रीममुळे मूत्राशय संसर्गाला प्रतिबंध होतो. रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांना इस्ट्रोजेन गोळ्या किंवा पॅच घ्यायला सांगितले जाते. क्रीममुळे मूत्राशयभोवती असलेल्या पेशी निरोगी राहतात तसेच संसर्गाला प्रतिबंध होतो. प्रतिबंधात्मक उपचार म्हणून औषधे दिली गेली असल्यास डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

वर दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि शिफारसींचा बहुतेक स्त्रियांना मूत्राशय संसर्ग रोखण्यासाठी बहुतेक वेळा उपयोग होतो. अशी काळजी घेऊनही संसर्ग झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. लघवीचा नमुना तपासणीसाठी द्यावा. योनीमार्गातून अतिरिक्त स्त्राव जात असेल किंवा योनीला सूज व संसर्गासाठी इतर लक्षणे दिसत असल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

यासाठी अँटीबायोटिक्स दिलेली असल्यास तातडीने त्या घेण्यास सुरुवात करावी आणि कोर्स पूर्ण करावा. काही बाबतीत डॉक्टरांनी अतिरिक्त चाचण्या (किडनी रेडिओग्राफ किंवा मूत्राशयाची तपासणी) सुचवल्यास त्या लगेच करून घ्याव्यात.

Dr. Ramit Kamate
Dr. Ramit Kamate
MBBS, Infertility Specialist In Vitro Fertilization Specialist, 1 yrs, Pune
Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Jayashree Suryavanshi
Dr. Jayashree Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Diet Therapeutic Yoga, 21 yrs, Pune
Dr. Sapna Mahajan
Dr. Sapna Mahajan
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune