Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
अथेलेट फूट
#रोग तपशील#बुरशीजन्य संसर्ग



काही जणांना उष्म्यामुळे पायाला भेगा पडतात. त्यामुळे पायाची आग होणे, पाय जळजळणे अशा तक्रारींना सामोरे जावे लागते. पायांच्या भेगांचा उपचार वेळीच करणे शक्य आहे. पायाच्या भेगा या वेदनादायी असतात, त्यामुळे या भेगा पडायला सुरुवात झाल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. कामाचे स्वरूप गेल्या काही वर्षांमध्ये बदलते आहे. त्यामुळे सतत प्रवास करावा लागतो. अशावेळी पायांना भेगा पडतात, टाचा दुखण्याचा त्रास उद्भवतो, पायांच्या टाचांना भेगा का पडतात, याचा विचार गांभीर्याने करणे गरजेचे आहे. पायांची व्यवस्थित निगा राखली नाही, तर पायांना भेगा पडतात. काही वेळा चांगल्या कंपनीच्या चपला न घातल्याने पाय दुखावतात. पायांच्या टाचा नाजूक असल्याने चांगल्या दिसण्यासाठी घातलेल्या चपलांचा फायदा पायांना होत नाही. त्यांचा आकार, उत्पादनाची गुणवत्ता आणि दर्जा यानुसार पायांच्या टाचांवर दुष्परिणाम दिसून येतात.

काळजी

- पाय कायम स्वच्छ ठेवावेत

- कोमट पाण्याने धुवावेत.

- भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरिन लावून पायमोजे घालून ठेवावेत. सकाळी गार पाण्याने पाय धुवावेत. आंघोळीच्या आधी कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यात पाय बुडवून ठेवावेत.

- मधाच्या पोळ्यातील ताजे मेण काढून, वितळवून त्यात थोडी बोरीक पावडर मिसळून टाचांच्या भेगांवर लावल्यास भेगा बंद होतात.

- आंघोळ झाल्यावर मोहरीच्या तेलामध्ये थोडी हळद घालून भेगांवर लावणेही फायदेशीर ठरते. गरज नसेल तेव्हा पादत्राणे काढून ठेवावीत. ऑफिसमध्येही हाच नियम ठेवावा.

- उतारवयात पायाला भेगा पडण्यामध्ये प्रमुख कारण हे कोरडे हवामान आहे. कोरड्या वातावरणाचा, घर्षणाचा धुळीचा परिणाम होऊन पायाला भेगा पडतात.

- हाता-पायांना पडलेल्या भेगा लपविण्यापेक्षा त्यावर उपचार करून त्या बर्‍या करणे केव्हाही चांगले असते.

- घरात कायम ठेवता येणारे, तुलनेते स्वस्त आणि कोणताही अपाय न करणारे कोकम तेल मलमाचे काम अधिक चांगल्याप्रकारे करते.

- पायाला असलेले केस कमी होणे, पायाची त्वचा कोरडी होणे, पूर्वी अगदी नितळ असलेले पाय अचानक खडबडीत होणे, त्यांना भेगा पडणे आणि पायाचे तापमान थोडे वाढणे ही प्राथमिक लक्षणे झाली. अशा पायांना जखम लवकर होते आणि ती बरी व्हायला वेळही लागतो.

पायाची कातडी कोरडी होणे, टाचा फुटणे यासारख्या समस्या जाणवू लागतात.
त्या दूर करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात.

टाचांना भेगा:
टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शिअम आणि स्निग्धतेची कमतरता होय. पायाची त्वचा जाड असते. त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम (तेल) पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहचत नाही. शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात. व त्यावर भेगा पडू लागतात. टाचांच्या भेगांमुळे आग होणे, दुखणे हा त्रास होतो. शिवाय कधीकधी त्यातून रक्तही येते.

भेगांचा त्रास असा कमी करा
दीड चमचा व्हॅसलीन व एक लहान चमचा बोरीक पावडर चांगल्या प्रकारे कालवा व भेगांवर हा जाड लेप लावा (आतपर्यंत त्याचा ओलावा जाणवेल) काही दिवसातच फुटलेल्या टाचा भरू लागतील.

टाचा जास्तच फुटलेल्या असतील तर मिथिलेटेड स्पिरीटमध्ये कापसाचा बोळा भिजवून फुटलेल्या टाचेवर ठेवा. असे दिवसातून 3-4 वेळेला करा. त्यामुळे टाचा बर्‍या होऊ लागतात.कोमट पाण्यात थोडा शाम्पू व एक चमचा सोडा आणि काही थेंब डेटॉल टाका. त्या पाण्यात 10 मिनीटे पाय बुडवून ठेवा. त्वचा मऊ झाल्यावर मिथिलेटेड स्पिरीट लावून टाचांना प्युमिक स्टोनने किंवा मऊसर घासणीने घासून तिथली त्वचा साफ करा. त्यामुळे टाचेवरील माती निघून जाईल. नंतर टॉवेलने पुसून कोमट तेलाने मालीश करा.

पाय स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी पॅडीक्यूअरचा अवश्य वापर करा. कारण पायाची नखे, टाच यांच्या स्वच्छतेचा हा एक चांगला उपाय आहे.या सर्व उपायांचा अवलंब केल्यास गुलाबी थंडीतही तुम्ही तुमच्या पायाच्या नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण करू शकता.

पॅडिक्यूअर
पॅडिक्यूअर एक सोपा प्रकार आहे. त्याला आपण घरी सुध्दा करू शकतो. पण पायाची अवस्था जास्तच खराब असल्यास पॅडीक्युअर चांगल्या ब्यूटी स्पेशालिस्टकडून करून घेणे चांगले.पॅडिक्यूअरसाठी साहित्य: छोटा टब, कोमट पाणी, शाम्पू, हायड्रोजन पेरॉक्साईड, नेलपॉलीश, रिमूव्हर, नेलकटर, ऑरेंज स्टीक, क्यूटीकल पुशर, नेल फायलर, प्यूमिक स्टोन, कोल्ड क्रिम, कापूस व टॉवेल.

पॅडिक्यूअरची पध्दत:
पहिल्यांदा नेलपेंट रिमूव्हरने पायावरची जुनी नेलपेंट काढा. नेलकटर किंवा छोट्या कात्रीने वाढलेली किंवा वाकडी झालेली नखे कापा. पायाची नखे नेहमी सरळच कापावीत. नेलफायलरने नखांना चांगला आकार द्यावा.
टबात कोमट पाणी घेऊन त्यात थोडा शाम्पू व एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड टाकून मिसळा किंवा कोमट पाण्यात 3 चमचे मीठ, अर्धा लिंबाचा रस, व एक छोटा चमचा गुलाबपाणी टाकून मिक्स करा. त्यात पाय 5-10 मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे मृत त्वचा ओलसर होते. 8-10 मिनिटानंतर प्यूमिक स्टोन किंवा घासणीने (नरम) घासून घाण साफ करा. पायापासून मळ निघाल्यावर स्वच्छ टॉवेलने पाय पुसा. त्यानंतर पायाच्या नखांवर क्रिम लावून चांगल्या‍ र‍ितीने मालीश करा. मालीश केल्यावर ऑरेंज स्टिकवर थोडा कापूस लावून नखाच्या आतला मळ साफ करा. क्युटीकल पुशरच्या सहाय्याने नखाच्या जवळचा भाग आतल्या बाजूला ढकला. त्यामुळे नखाचा आकार चांगला दिसू लागेल.
पायांवर कोल्ड क्रिमने 10-15 मिनिटे मालीश करा. त्यामुळे पायाची त्वचा मुलायम होईल. कापसाच्या बोळ्यानी नखे व त्वचेवरचे क्रिम पुसून टाका. पॅडिक्यूअर नंतर पायांना धुळ, घाणीपासून वाचवा. आणि कमीतकमी 4 दिवस मोजे वापरावेत. मोज्यांचा वापर तुम्ही पुर्ण हिवाळाभरही करू शकतात.

पायांच्या भेगा नाहीशा करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात:

आता हिवाळ्याची चाहूल लागत आहे. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, ओठ फाटणे, या समस्या उद्भवू लागतात. या साठी अनेक क्रीम्स आणि लोशन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. थंडीमध्ये चेहरा मुलायम दिसावा म्हणून हर तऱ्हेची क्रीम्स आपण बाजारातून आणून वापारत असतो. पण चेहऱ्याइतके लक्ष आपण आपल्या पायांकडे देत नाही. पायाला भेगा पडायला लागल्या की त्या भरून येण्यास वेळ लागतो. तसेच या भेगा जर खोलवर गेल्या तर त्यातून रक्त यायला लागते, आणि पायांच्या साध्या हालचालींनी देखील वेदना होऊ लागतात. त्यामुळे पायांच्या भेगांची समस्या उद्भवू नये या करिता घरच्याघरी उपाय करता येतील.

पायांना पडणाऱ्या भेगा भरून येण्याकरिता सर्वात उत्तम पर्याय म्हणजे पेट्रोलियम जेली. हा उपाय करण्याकरिता रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून घेऊन कोरडे करून घ्या आणि त्यानंतर पावलांना पेट्रोलियम जेली लावा. त्यानंतर पायांवर मोजे घालून रात्रभर ठेवा. थंडीच्या दिवसांमध्ये पायांना भेगा पडत असतील तर बहुतांश वेळेला पायांवर मोजे ठेवावेत. जर सकाळच्या उन्हामध्ये काही वेळ बसणे शक्य असेल, तर उन्हामध्ये बसून पायांवर कोमट खोबरेल तेलाने मालिश करून परत मोजे घाला.

आठवड्यामध्ये एक दिवस पेडीक्युअर करावे. पेडीक्युअर करण्याकरिता ब्युटी पार्लरमध्ये जायलाच हवे असे नाही, घरच्याघरी देखील पेडीक्युअर करता येते. या करिता एका टबमध्ये किंवा बादलीमध्ये आपल्याला सोसेल इतपत गरम पाणी घ्यावे. त्या पाण्यामध्ये थोडासा शँपू आणि थोडे मीठ घालावे. या गरम पाण्यामध्ये पावले काही वेळाकरिता बुडवून ठेवावीत. नंतर फूट स्क्रबर किंवा प्युमिस स्टोन ने पावले हळुवार गोलाकार घासावीत. त्यानंतर परत काही वेळ पाय गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत. पावले घासल्याने आणि गरम पाण्यातील मिठामुळे पावलांवरील त्वचेच्या मृत पेशी निघून जाऊन त्वचा मुलायम होते. पाच मिनिटांनी पावले गरम पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ पुसून कोरडी करा. त्यानंतर पावलांवर पेट्रोलियम जेली लावून मोजे घालावे.

जर पावलांना खोल भेगा पडल्या असतील, तर रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून कोरडे करावेत, व त्यानंतर भेगांना वितळलेले मेन लावावे. मेणामुळे खोल भेगा लवकर भरून येण्यास मदत मिळते. दररोज पायमोजे घालणे शक्य नसेल, तर दिवसातून दोन वेळा पायाच्या भेगांना मोहोरीचे किंवा खोबरेल तेल लावून मालिश करावी. त्याने पावले नरम राहून भेगा कमी होतील.

Dr. Shilpa Jungare Tayade
Dr. Shilpa Jungare Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 8 yrs, Pune
Dr. Chhaya Helambe
Dr. Chhaya Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
Dr. Amruta Kolte (Chaudhary)
BDS, Dental Surgeon, 5 yrs, Pune
Dr. Supriya Jagtap
Dr. Supriya Jagtap
BHMS, Family Physician Homeopath, Pune
Dr. Sachin Kuldhar
Dr. Sachin Kuldhar
BHMS, Gynaecologist Homeopath, 8 yrs, Pune