Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
फुफ्फुसांचे आजार
#रोग तपशील#कार्यकलापविस्तार



फुफ्फुसांचे आजार
फुफ्फुसांच्या आजाराने त्रासलेले लक्षावधी नवे रुग्ण दरवर्षी आढळतात, ज्या व्यक्तींच्या आजाराबद्दल माहिती नाही अशांची संख्या वेगळीच. फुफ्फुसांच्या आजाराची विशिष्ट लक्षणे असतात. मुख्य लक्षणे आणि त्यांचा तपशील खाली दिला आहे.

कफ किंवा खोकला
खरं तर खोकणे म्हणजे कफिंग ही आपल्या शरीराद्वारे केली जाणारी एक संरक्षक क्रिया आहे. हवेच्या मार्गातून म्यूकस म्हणजे श्लेष्मा किंवा बडका दूर करणे, विषारी द्रव्य अथवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली गेली तर ती बाहेर फेकणे अशी कामं ह्यामुळं होतात. अशा रातीनं खोकला चांगला (प्रॉडक्टिव) किंवा वाईट (अनप्रॉडक्टिव) असू शकतो. खोकल्यानं हवेचा मार्ग स्वच्छ करण्याचं काम केले जाते. मात्र सततचा किंवा वाढता खोकला, ताप चढणे, धाप लागणे किंवा कफातून रक्त पडणे अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे उत्तम. फुफ्फुसांच्या आजाराचं सर्वसामान्य लक्षण म्हणजे खोकला.

डिस्पिनिया
डिस्पिनिया म्हणजे श्वास घेताना धाप लागणे हे श्वसनसंस्थेचे विकार, दृदयरोग, चिंता ह्यांवरदेखील अवलंबून असू शकते. इतर लक्षणांसोबत सतत धाप लागणे हे रोगाचं चिन्ह असू शकते. अशावेळी लगेच डॉक्टरांना दाखवा. ध्यानात ठेवा, धाप लागण्याचा आणि वाढत्या वयाचा कोणताही थेट संबंध नसतो, त्यामुळं धाप लागण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

श्वास घेताना आवाज येणे
श्वास घेताना किंवा सोडताना शिट्टीसारखा आवाज येऊ शकतो. ह्याचं कारण म्हणजे श्वसनमार्ग अरुंद बनणे, त्यांमध्ये उतींची अनावश्यक वाढ होणे, त्यांची जळजळ होणे, श्लेष्माचं वाढलेले प्रमाण किंवा एखादी वस्तू श्वासावाटे आत खेचली जाणे. ह्या लक्षणानं फुफ्फुसांची एकंदर ढासळती स्थितीदेखील दाखवली जाते.

छातीत दुखणे
फुफ्फुसं, फुफ्फुसावरणाची जळजळ किंवा छातीच्या पिंजर्‍यामधील स्नायू तसंच हाडांच्या समस्यांमुळे छातीत दुखू शकते. हे दुखणे किरकोळही असू शकते तसंच गंभीरही - कधीकधी जिवावर बेतणारं देखील. छातीत सतत दुखू शकते किंवा फक्त श्वास घेताना. खोकला किंवा ताप येऊन छातीत दुखत असेल तर मात्र जंतुसंसर्गाची शक्यता असू शकते. छातीत दुखत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा.

हिमोटायसिस
हिमोटायसिस म्हणजे खोकताना रक्त पडणे. हे रक्त शुद्ध स्वरूपात थेट पडू शकते किंवा कफ अथवा बडक्यामध्ये लालसर-गुलाबी फेस अथवा रेषांच्या स्वरूपात. ही समस्या सततच्या खोकण्यामुळं उद्भवू शकते पण अशावेळी फुफ्फुसांचा काही गंभीर आजार आढळण्याची शक्यता जास्त असते.

सायनोसिस
रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण पुरेसं नसले तर अशा व्यक्तीची त्वचा निळसर-जांभळ्या रंगाची दिसते, विशेषतः ओठांभोवती आणि नखांच्या मुळाशी. फुफ्फुसांच्या गंभीर आजारांमुळं सायनोसिस अचानक उद्भवू शकतो किंवा फुफ्फुसांची स्थिती वर्षानुवर्षं बिघडत गेल्यास सायनोसिसचीही लक्षणे दिसत राहतात.

सूज
हातापायांवर, विशेषतः पायाच्या घोट्यावर सूज दिसल्यास हे फुफ्फुसांच्या आजाराचं लक्षण असू शकते. ह्याचा संबंध सामान्यतः हृदयविकाराशीदेखील असू शकतो आणि त्याबरोबरीनं धाप लागू शकते. बरेचदा, अनेक आजारांचा परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर एकदमच होत असल्यानं, सारखीच लक्षणे दिसू शकतात.

श्वसनक्रिया थांबणे
हे फुफ्फुसांच्या आजाराचं सर्वांत गंभीर लक्षण आहे. जबरदस्त मोठा जंतुसंसर्ग, फुफ्फुसांची जळजळ, हृदय थांबणे ह्यांमुळं हे होऊ शकते. फुफ्फुसं रक्ताला पुरेसा ऑक्सिजन पुरवू शकत नाहीत आणि/अथवा रक्तामधला कार्बनडायॉक्साइड काढून घेऊ शकत नाहीत.

फुफ्फुसांच्या आजारांची कारणे आणि त्यामधले धोके
फुफ्फुसांच्या आजारामुळे लहान-मोठ्या सर्वांनाच त्रास होतो. पण लहान वयात हा त्रास जास्त होतो आणि बालमृत्यूच्या कारणांपैकी फुफ्फुसांचा आजार हे एक मोठं कारण आहे.

धूम्रपान करू नका
धूम्रपानामुळं आपल्या शरीरावर भयानक परिणाम होतात. सिगरेट किंवा बिडी ओढल्यानं फक्त फुफ्फुसांचे आजारच होतात असं नाही तर एंफिसेमा, सीओपीडी आणि फुफ्फुसांचा कर्करोग होण्यचीही शक्यता असते. शरीराच्या इतर अनेक अवयवांवर आणि त्यांच्या कामावरदेखील धूम्रपानाचे वाईट परिणाम होतात.

Dr. Rajendra kadam
Dr. Rajendra kadam
BAMS, Ayurveda, 10 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Badrinarayan Mundada
Dr. Badrinarayan Mundada
MBBS, Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Dinkar Padade
Dr. Dinkar Padade
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 30 yrs, Pune
Dr. Harishchandra Chaudhari
Dr. Harishchandra Chaudhari
DNB, Physician, 10 yrs, Pune