Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
फुफ्‍फुसाचा कर्करोग
#रोग तपशील#फुफ्फुसांचा कर्करोग



फुफ्‍फुसाचा कर्करोग
फुफ्फुसाचा कर्करोग हा कर्करोगाचा एक उपप्रकार आहे. हा रोग फुफ्फुसातील अनियंत्रितपणे वाढलेल्या हानिकारक पेशींमुळे होतो. फुफ्फुसांचा कॅन्सर हा सामान्यपणे आढळणारा एक धोकादायक कॅन्सर आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे, वातावरणातील प्रदुषित हवा, धुम्रपानाची सवय फुफ्फुसांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. तरूणांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण कमी असले तरीही वाढत्या वयासोबत त्याचा धोका झपाट्याने वाढत आहे.

कॅन्सर या आजाराच्या नावावेही अनेकांचा थरकाप उडतो. त्यामुळे कोणालाही कुठल्याही टप्प्यावर गाठू शकणार्‍या कॅन्सरची शरीराकडून मिळणारी लक्षण वेळीच ओळखल्यास त्यावर मात करता येऊ शकते. 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर फुफ्‍फुसाचा कर्करोग दिवस म्हणून पाळला जातो. मग भविष्यात या आजाराचा धोका कमी करण्यासाठी या लक्षणांकडे दुर्लक्ष नको.

फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं -
1. क्रोनिक कफाचा
2-3 आठवड्याहून अधिक काळ जर कफ कायम राहत असेल तर तो धोक्याची घंटा आहे. सतत खोकला वाढणं त्यामधून छातीत वेदना जाणवणं याकडे दुर्लक्ष करू नका.

2. खोकताना रक्त पडणं
जर खोकताना कफामध्ये रक्त आढळल्यास ते कॅन्सरचं एक लक्षण आहे. कफाचा सामान्य रंग पिवळा, हिरवट असतो. मात्र रक्त मिश्रित कफ तांबूस रंगाचा दिसतो.

3. श्वास घेताना त्रास होणं
श्वास घेताना त्रास होणं, छाती भरून आल्यासारखं वाटणं, सतत दम लागणं हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे संकेत देतात.

4.चेहर्‍यात, आवाजात बदल जाणवणं -
आवाज जाडसर होणं, श्वास घेतानाही आवाज जाणवणं, चेहर्‍यावर सूज जाणवणं, हळूहळू सूज हात, मानेजवळही पसरते.

5. पुन्हा पुन्हा इंफेक्शन होणं -
कमवुवत झालेली रोगप्रतिकारक्षमता, शरीरात पुरेशी उर्जा असणं यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. ब्रोन्कायटीससारखे श्वसनाचे आजार अधिक बळावतात. छातीमध्ये अनियमित प्रमाणात फ्ल्युईड साचल्याने न्युमोनिया बळावतो. कावीळ, अस्थमा यांचा त्रास वाढतो.

6. हाडांचं दुखणं -
जसाजसा कॅन्सर बळावतो तो शरीराच्या इतर भागमध्ये पसरू शकतो. यामुळे सांध्याचं दुखणं, कंबरेचं दुखणं वाढतं.

7. न्युरोलॉजिकल लक्षणं -
कॅन्सरचे सेल्स नर्व्हस सिस्टीममध्ये पोहचतात. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणं, वागणूकीत बदल जाणवणं, सुन्न होणं अशी लक्षण वाढतात.

आजाराची कारणे
- धुम्रपान करणे
- रेडॉन वायू फुफ्फुसात जाणे
- अ‍ॅजबेसटॉसची धूळ फुफ्फुसात जाणे
- विषाणूंचा प्रादुर्भाव

कर्करोगाशी लढण्याची क्षमता
छत्तीसगढ मध्ये पिकविल्या जाणाऱ्या 'गटवान' 'महाराजी' व 'लिचा' या तीन जातीच्या तांदुळात कर्करोगाशी लढण्याची क्षमता असण्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे.या जातीमध्ये कर्करोगाशी लढा देण्याचे आवश्यक ते वैद्यकीय गुणधर्म आहेत असे संशोधनातून आढळुन आले आहे. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रात या तांदळाच्या जातीवर अभ्यास करण्यात आला.
फुफ्फुस व स्तनाचा कर्करोग यामधील सामान्य पेशींना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचविता, तो बरा करण्याची क्षमता या तांदुळांमध्ये आहे असा त्याचे अभ्यासानुसार दावा करण्यात आलेला आहे.यापैकी 'लिचा' या जातीत तर, कर्करोगाच्या पेशींचा प्रचार रोखून त्या नष्ट करण्याची अत्यंत प्रभावी अशी क्षमता आहे असे आढळले.

Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Sadashiv K. Deshpande
Dr. Sadashiv K. Deshpande
BHMS, Homeopath, 40 yrs, Pune
Dr. Pradnya  Gurav
Dr. Pradnya Gurav
MD - Homeopathy, Adolescent And Child Psychiatrist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Mahesh Zagade
Dr. Mahesh Zagade
BHMS, Homeopath General Physician, 3 yrs, Pune
Dr. Atul Patil
Dr. Atul Patil
MS/MD - Ayurveda, Proctologist Ayurveda, 9 yrs, Pune