Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
मूत्रपिंडाचा कर्करोग
#रोग तपशील#किडनी कर्करोग



मूत्रपिंडाचा कर्करोग

मूत्रपिंडाचा कर्करोग हा छुपा आणि इतर कर्करोगांप्रमाणेच संथपणे वाटचाल करणारा विकार आहे. लक्षणांच्या आधारे लवकरात लवकर निदान आणि उपचार केल्यास कर्करोगाच्या विळख्यातून बाहेर पडता येऊ शकते.

शरीराच्या आरोग्याचे संतुलन राखणाऱ्या मूत्रपिंडात मुतखडा होण्याची कारणे आपल्या दैनंदिन सवयीच असतात; परंतु मूत्रपिंडाचा कर्करोग हा कधीही आणि कोणालाही होऊ शकतो. मूत्रपिंडावर आलेल्या गाठींची वेळेत तपासणी केली तर संभाव्य कर्करोगापासून आपला बचावही होऊ शकतो. फक्त गरज आहे ती वेळेत निदान करण्याची.

मूत्रपिंडातील गाठींचे प्रकार

अघातक (बेनाइन) गाठ

नावाप्रमाणेच या गाठी शरीराला घातक नसतात,त्यांच्यामुळे कुठल्याही प्रकारचा कर्करोग उद्भवत नाही. कुठल्या तरी इतर तपासण्यांसाठी अल्ट्रासाउंड केल्यानंतर या गाठी दिसून येतात. अडिनोमास, एँजिओमायोलिपोमास आणि सिस्ट असे त्याचे प्रकार होत. कुठलीही लक्षणे किंवा त्रास होत नसल्यास त्यावर कुठल्याही प्रकारच्या उपचारांचीही गरज पडत नाही. परंतु, काही त्रास उद्भवल्यास किंवा कर्करोग होण्याची शंका वाटल्यास या गाठी काढता येतात.

घातक (मलाइन) गाठी
या गाठी कर्करोगाच्या असू शकतात. मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे वेळेत निदान झाले की उपचारांच्या मदतीने त्यातून बरे होणे सहज सोपे आहे.

मूत्रपिंडाचा कर्करोग म्हणजे काय?
मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत; परंतु यातील बहुतेकांना मूत्रपिंडातील पेशींचा कर्करोग (रिनल सेल कॅन्सर) असतो.

मूत्रपिंडातील पेशींचा कर्करोग
मूत्रपिंडातच या कर्करोगाची वाढ होते. कर्करोगाची वाढ होत त्याची मूत्रपिंडातच गाठ तयार होते. गाठ मोठी झाल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होऊन त्याचाही आकार वाढू शकतो. मूत्रपिंडाच्या बाहेर पडून आजुबाजूचे स्नायू, मणका, यकृत आणि रक्तवाहिन्यांमध्येही तो प्रवेश करू शकतो. जवळच्या लसिकांमध्ये (लिम्फ) प्रवेश केल्यास हा कर्करोग शरीरभर पसरून इतर अवयवांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. लहान मुलांमध्ये विल्म्स ट्यूमर आणि क्लिअर सेल सार्कोमा हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे प्रकार आढळतात.

** कारणे

- वय. बहुतेक पेशंटमध्ये वयाच्या साठीनंतरच हा कर्करोग झाल्याचे आढळतो.

- धूम्रपान. हा कर्करोग झालेल्या पेशंटपैकी एक तृतीयांश व्यक्ती धूम्रपान करत असल्याचे आढळतात.

- स्थुलता. अतिरिक्त वजन हे मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे कारण नेहमीच असते. २५ टक्के पेशंटमध्ये मूत्रपिंडाचा कर्करोग होण्याचे कारण केवळ स्थुलता असते.

- डायलिसिस. प्रदीर्घ काळ डायलिसिसवर असणाऱ्या पेशंटनाही या कर्करोगाची भीती असते.

- उच्च रक्तदाबही मूत्रपिंडाच्या कर्करोगाचे कारण बनू शकते.

- काही विषारी रसायनांमुळेही मूत्रपिंडाच्या कर्करोगाची शक्यता वाढू शकते.

** लक्षणे

- अनेक पेशंटमध्ये या कर्करोगाची काहीही लक्षणे आढळून येत नाहीत; पण जसजसा त्याचा प्रादुर्भाव वाढतो तसतसा त्याची लक्षणे तीव्र होत जातात.

- लघवीतून रक्त येणे. हे लक्षण कर्करोगाचे अत्यंत मुलभूत लक्षण समजले जाते. यात पेशंटला कुठल्याही वेदना होत नाहीत.

- गाठ जसजशी मोठी होते तसतशी त्याची लक्षणे वाढतात.

- पाठीत किंवा कमरेजवळ वेदना.

- ताप येणे, घाम सुटणे

- रक्तदाब वाढणे

- वजन घटणे.

मूत्रपिंडाचा कर्करोगवर उपचार
कर्करोगाची तपासणी अल्ट्रासाउंड किंवा कम्प्यूटेड टोमोग्राफी (सीटी) स्कॅनच्या माध्यमातून करण्यात येते. कर्करोग किती बळावला आहे त्यावरून त्यावरील उपचार ठरतात. कधी गाठ काढून तर कधी मूत्रपिंड काढून कर्करोगापासून पेशंटची सुटका होऊ शकते. लवकर निदान झाल्यास रेडिएशनच्या माध्यमातूनही यावर नियंत्रण मिळवता येते.

Dr. Pramod Bharambe
Dr. Pramod Bharambe
DHMS, Family Physician Homeopath, 30 yrs, Pune
Dr. Swati Dagade
Dr. Swati Dagade
BAMS, Ayurveda Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. Hemant Damle
Dr. Hemant Damle
MD - Allopathy, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 25 yrs, Pune
Dr. Vipul Jaiswal
Dr. Vipul Jaiswal
MS/MD - Ayurveda, Ayurveda General Physician, 11 yrs, Pune