Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
लोहाची कमतरता
#रोग तपशील#लोह कमतरता



लोहाची कमतरता

भारतीय संशोधकाचा समावेश असलेल्या एका शास्त्रज्ञांच्या चमूने कमी किमतीत उपलब्ध होणारी रक्तचाचणी विकसित केली असून, त्यामुळे केवळ १५ मिनिटांमध्ये लोह आणि जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता तपासता येणार आहे.

लहान, सहज हातातून नेण्यासारखी ही निदानसूचक प्रणाली लंचबॉक्सच्या आकारातील असून, यामध्ये रक्तचाचणी पट्टी आहे. मधुमेहाची तपासणी करतात, त्याप्रमाणेच ही चाचणी आहे. जीनवसत्त्व ‘अ’आणि लोहाची कमतरता जागतिक लोकसंख्येसमोर मोठा प्रश्न आाहे. जगातील एकतृतीयांशपेक्षा अधिक लोकांमध्ये जीनवसत्त्व ‘अ’आणि लोहाची कमतरता आहे. यांच्या कमतरतेमुळे अंधत्व, अ‍ॅनेमिया (रक्तातील तांबडय़ा पेशींची कमतरता) आणि मृत्यूही येऊ शकतो. विशेषत: लहान मुले आणि स्त्रियांमध्ये याचा मोठय़ा प्रमाणात अभाव जाणवतो. ही आरोग्याची मोठी समस्या असल्याचे, अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटीचे साहाय्यक प्राध्यापक सौरभ मेहता यांनी सांगितले.

डॉक्टरांनी पोषक घटकांची कमतरता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या घटकांची कमतरता आहे हे प्राथमिक स्तरावर कळण्यास अवघड जाते. त्याचा शरीरावर मोठा प्रभाव पडतो, असे पीएनएएस या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाचे वरिष्ठ लेखक मेहता म्हणाले.

सर्व विकसनशील देशांकडे प्राथमिक स्तरावर रोगनिदान करण्यास आवश्यक असणारी अत्याधुनिक साधणे अपुरी आहेत. ही समस्या दूर करण्याची क्षमता या चाचणीमध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, लहान वयातील २५० दशलक्ष मुलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता आहे. ज्या भागांमध्ये लहान मुले आणि गर्भवती महिलांमध्ये जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता आहे, त्या ठिकाणी प्राथमिक तपासणीसाठी ही चाचणी अतिशय फायदेशीर ठरू शकते, असे संशोधकांनी म्हटले आहे. दरवर्षी जवळपास पाच लाख मुले जीवनसत्त्व ‘अ’च्या कमतरतेमुळे अंध होतात. आणि त्यातील निम्मी मुले वर्षभरात इतर आजार होऊन मृत्यू पावतात, असे त्यांनी सांगितले.

व्हा आयर्न वूमन :
लोह म्हणजे आयर्न हे आपल्या शरीरातील खनिज. मुलींपासून ते वृद्ध महिलेपर्यंत अनेक महिलांमध्ये आयर्नची कमतरता आढळते. त्यामुळे रोजच्या जिवनात बऱ्याच अडचणी येतात. चला तर मग जाणून घेऊया आयर्न कशामध्ये असते आणि कशाप्रकारे ही कमतरता भरून काढू शकतो. आपल्या शरीरात जवळजवळ ६५ टक्के आयर्न हिमोग्लोबीनमध्ये असते, १० टक्के मायोग्लोबीनमध्ये असते, १ ते ५ टक्के आयर्न शरीरातील एंजाइममध्ये असते व बाळी रक्तात साठवलेले असते. प्रत्येक परिस्थितीनुसार आपल्या शरीरात आयर्नची आवश्यकता ठरते. जसे गरोदर मातेला आयर्नची गरज जास्त असते.

आयर्नचे महत्त्व :
- ६५ टक्के आयर्न हिमोग्लोबिनमध्ये असते आणि हिमोग्लोबीन आपल्या शरीरात ऑक्सिजन वाटकाचे काम करते. लंग्सपासून प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहचविण्याचे काम हिमोग्लोबीन करते आणि हिमोग्लोबीनचा महत्वाचा घटक आहे आयर्न.
- शरीराच्या योग्य वाढीसाठी आयर्न खूप महत्वाचे आहे.
- लाल पेशी बनविण्यासाठी आयर्न लागते.
- आयर्नमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी देखील आयर्नची गरज भासते.
- निद्रानाश कमी होण्यासाठी आयर्नची मदत होते.
- मेंदूच्या रक्तप्रवाहात २० टक्के ऑक्सिजनची गरज असते. ते पोहचविण्याचे काम आयर्न करते.
- आयर्नमुळे शरीरात ताजेपणा आणि एनर्जी येते.
- खेळाडूंसाठी आयर्न खूप महत्वाचे आहे.
- आयर्नमुळे आपल्याला सर्दी-खोकला होत नाही.
- शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी आयर्न अत्यंत महत्वाचे आहे.
- थकवा दूर करण्याचे काम आयर्न करते.
- एकाग्रता वाढवण्यासाठी आयर्न गरजेचे आहे.

* आयर्न कमतरतेची काही लक्षणे
- थकवा येणे
- अशक्तपणा
- त्वचेचा रंग फिकट होणे
- लवकर दम लागणे
- चक्कर येणे
- माती खाण्याची इच्छा होणे
- काम करण्याची गती कमी होणे
- पायाला हाताल मुंग्या येणे
- जिभेवर सूज येणे
- हवामानात थोडेजरी बदलले तरी सर्दी, खोकला होणे
- नखे ठिसूळ होणे
- डोके दुखणे
- हात पाय थंड होणे
- हृदयाचे ठोके वाढणे
हे सर्व किंवा यातील काही लक्षणे जर स्वतःमध्ये जास्त दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व थोड्याप्रमाणत आयर्नने भरपूर असलेले पदार्थ खावेत.

आयर्न बुस्टर ड्रींक
सफरचंद १ मध्यम आकाराचे
किशमिश (भिजवलेली किशमिश), काको पावडर चवीनुसार साखर, लाल भेपळ्याच्या बीया व चाट मसाला व पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घ्या. गरज असल्यास पाणी टाकू शकता. ही रेसेपी झटपट तयार होणारी आहे व आयर्ननी भरपूर अशी आहे.

हे लक्षात ठेवा
- १४ ते २१ वर्षातील मुलींनी रोज १० ते १५ शेंगदाणे किंवा बदाम भिजवून एका छोट्या गुळाच्या तुकड्यासोबत खायला हवे.
- बडीशोपमध्ये लाल भोपळ्यांच्या बिया टाकून त्याचे दिवसात २-३ वेळेस सेवन करावे.
- जास्ती चहा पिणाऱ्या लोकांना आयर्नची कमतरता जास्त भासू शकते. कारण चहा आणि कॉफीमुळे ४० ते ६० टक्के आयर्नचे शोषण शरीरात कमी होते. त्यामुळे जास्त चहा पिऊ नये.
- तुम्ही आयर्ननी भरपूर असलेले बरेच पदार्थ जरी खात असाल आणि दिवसा ४ कप पेक्षा जास्त चहा किंवा कडक चहा पित असाल तरी तुम्हाला आयर्नच्या कमतरतेमुळे होणारे आजार होऊ शकतात.
- ३० ते ४५ वयातील महिलांनी रोज १ चमचा कोको पावडर दूधात टाकून दूध प्यायला हवे.
- खजूर, बदाम, किशमीश, तीळ यांचे लाडू, वडी.
- रोज १ चमचा तीळ खावे.

* जर आयर्नची कमतरता असेल तर हे होऊ शकते:
- अॅनिमिया, कँन्सर
- रेस्टेलेस लेग सिंड्रोम
- निद्रानाश
- पाळी न येणे
- केस गळणे
- तोंड येणे
- अतीनिद्रा
- चिडचिड
- बद्धकोष्टता
- बेशुद्ध होणे
- हृदयाची धडपड वाढणे.

आयर्न जरी इतके महत्वाचे असले तरी डॉक्टरांचा सल्ला न घेता आयर्नच्या गोळ्या घेऊ नये. कारण आयर्नचे प्रमाण शरीरात अधीक झाल्यासही हिमोक्रोमाटोसीससारखे आजार होऊ शकतात.

Dr. Richa Lal
Dr. Richa Lal
MBBS, Anesthesiologist, 8 yrs, Pune
Dr. Neeti Gujar
Dr. Neeti Gujar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 12 yrs, Pune
Dr. Prashant Wankhede
Dr. Prashant Wankhede
MS/MD - Ayurveda, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune