Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
International Coffee Day : 'या' 7 गोष्टी वाचून व्हाल रिफ्रेश
#आरोग्याचे फायदे#कॅफिन#निरोगी जिवन

जगभरात दोन प्रकारचे लोक असतात. एक ज्यांना चहा खूप पसंत आहे आणि दुसरे ज्यांना कॉफी खूप पसंत आहे. आज जागतिक कॉफी डे आहे यामुळे आज आपण कॉफी आणि त्याच्याशी निगडीत 7 इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत. कॉफी ही जगात सर्वाधिक विकणारी गोष्ट आहे. तसेच कॉफी पिणाऱ्या लोकांची ताकद ही देखील चहा पिणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत सर्वाधिक आहे. कॉफी पिताना त्याच्या फायद्यांबरोबरच तोटा देखील जाणून घेणं महत्वाचं आहे.

जाणून घेऊया 7 रोमांचक गोष्टी
1. जर तुम्ही सकाळच्या वेळेत कॉफी घेत असाल तर तुमच्यासाठी हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की कोणत्या वेळी कॉफी घेणं सर्वाधिक महत्वाचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी 8 ते 9 या वेळेत स्ट्रेस हार्मोन कार्टीसोल वाढत असतो. यावेळी जर तुम्ही कॉफी प्यायलत तप स्ट्रेस लेवल कमी होण्याऐवजी ते वाढण्याची शक्यता असते.

2. जर कोणत्या ठराविक वेळेत कॉफी पिण्याची सवय लागली तर त्यावेळी स्वतःला फ्रेश ठेवण्याकरता कॉफीची अत्यंत गरज जाणवते. यामुळे तु्म्हाला सर्वात जास्त कॉफी पिण्याची सवय लागू शकते.

3. जर तुम्हाला सकाळी 10 ते 11.30 पर्यंत कॉफी पिणं आवडत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला कॉफी पिण्याची सवय झाली आहे. महत्वाचं म्हणजे हीच कॉफी पिण्याची योग्य वेळ आहे जेव्हा कार्टीसोलचा स्तर कमी असतो. यावेळी कॉफी पिणं योग्य असून सुरक्षित हे.

4. जर तुम्ही 12 ते 1 यावेळेत कॉफी घेत असाल तर ती देखील चुकीची वेळ आहे. यावेळेत कॉफी प्यायल्यावर तुम्हाला नुकसान होऊ शकते. महत्वाचं म्हणजे 1 ते 5 ही वेळ पुन्हा एकदा कॉफीसाठी योग्य आहे.

5. अनेकांना जेवणासोबत, जेवणानंतर किंवा जेवणा अगोदर कॉफी पिण्याची सवय असते. तर ही सवय सर्वात घातक आहे. यावेळी शरीरात आर्यनचे प्रमाण सर्वाधिक वाढते.

6. जेवण आणि कॉफी यांच्यात एक तासाचा अंतर असणं महत्वाचं असतं. संध्याकाळी कॉफी प्यायल्यामुळे तुम्ही झोप खराब होऊ शकते.

7. सामान्यपणे कॉफी करता 65 रुपये मोजणे महाग वाटते पण जगात एक अशी जागा आहे जिथे कॉफी तब्बल 65,000 रुपयांना मिळते. 22 वर्षांपासून या ठिकाणी लोकप्रिय कॉफी मिळते. ते ठिकाण आहे जपान. जपानच्या ओसाका शहरात मंच हाऊस येथील कॉफी अतिशय लोकप्रिय आहे.

Dr. Pradip Pandhare
Dr. Pradip Pandhare
DNYS, 9 yrs, Pune
Dr. Mangal Thube - Buchade
Dr. Mangal Thube - Buchade
BAMS, Ayurveda Yoga and Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Ajita Garud-Shinde
Dr. Ajita Garud-Shinde
MS - Allopathy, Ophthalmologist Eye Specialist, 4 yrs, Pune
Dr. Yogesh Chavan
Dr. Yogesh Chavan
MS/MD - Ayurveda, Ayurveda Headache Specialist, 12 yrs, Nashik
Dr. Pradnya Deshmukh
Dr. Pradnya Deshmukh
BAMS, Ayurveda, 18 yrs, Pune