Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
लहान मुलांनी एका दिवसामध्ये किती व्यायाम करावा?; जाणून घ्या सविस्तर
#व्यायाम#निरोगी जिवन

शरीर फिट अन् फाइन ठेवण्यासाठी एक्सरसाइज, वर्कआउट आणि इतरही अनेक अ‍ॅक्टिव्हिटी करणं अत्यंत आवश्यक असतं. फिटनेसबाबत अनेक महिला, पुरुष सर्वचजण जागरूक असतात. अनेक लोकं दररोज व्यायाम करतात. जिममध्ये तासन्तास घाम गाळत असतात. परंतु आपण घरातील लहान मुलांच्या वर्कआउटबाबत दुर्लक्षं करतो. सध्याची बदललेली जीवनशैली आणि आहार यांमुळे प्रौढ व्यक्तींसोबतच लहान मुलांच्याही फिटनेसकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सध्या प्रौढांसोबतच लहान मुलांमध्येही डायबिटीस, ब्लड प्रेशर, लठ्ठपणा यांसारख्या आरोग्याच्या समस्या सर्रास दिसून येत आहेत. तसेच फक्त फिटनेसच्या अभावामुळे इतरही अनेक आजारांच्या विळख्यात लहान मुलं अगदी सहज अडकत असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणतात आकडे?

मुलांना एका दिवसामध्ये कमीत कमी किती व्यायाम किंवा अ‍ॅक्टिव्हिटी करणं आवश्यक असतं?, असा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच पडतो. अमेरिकेतील हेल्थ अ‍ॅन्ड ह्यूमन सर्विसेज डिपार्टमेंटनुसार, 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना एका दिवसामध्ये कमीत कमी 1 तासांसाठी व्यायाम किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटी करणं आवश्यक ठरतं.

आता अनेक पालकांसमोर असलेला कॉमन प्रश्न म्हणजे, मुलांना कोणत्या एक्सरसाइज कराव्या सांगणं फायदेशीर ठरतं? द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मुलांसाठी एरोबिक एक्सरसाइज अत्यंत फायदेशीर ठरते. आठवड्यातून कमीत कमी 3 दिवस मुलांना शारीरिक अ‍ॅक्टिव्हिटी करणं अत्यंत आवश्यक असतं. याव्यतिरिक्त स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज आठवड्यातून 3 दिवस करणंही आवश्यक असतं.

याव्यतिरिक्त 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी दिवसभरामध्ये शारीरिकरित्या सक्रिय राहणं आवश्यक असतं. 3 ते 5 वर्षांच्या मुलांना त्यांच्या वयाच्या इतर मुलांसोबत खेळण्यासाठी प्रवृत्त करणंही आवश्यक असतं.

मुलांचं आरोग्य फिट अन् फाइन ठेवण्यासाठी आई-वडिलांनी मुलांच्या अ‍ॅक्टिव्हिटींवर भर देणं अत्यंत आवश्यक असतं. जर मुलं आळस करत असतील तर त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणं आवश्यक ठरतं.

मुलांसाठी कोणत्या एक्सरसाइज ठरतात उत्तम?

अनेक पालकांना असा प्रश्न पडलेला असतो. याबाबत अनेक तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, 6 ते 17 वर्षांच्या मुलांसाठी एरोबिक फिटनेस एक्सरसाइज सर्वात उत्तम ठरतात.

मुलांना फिटनेसबाबत प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांच आरोग्य उत्तम राखण्यासाठी दिवसभरामधील त्यांच्या खेळण्याची वेळ निश्चित करा. खेळल्यामुळे मुलांचा शारीरिक विकास आणि मानसिक विकास दोन्ही होण्यासाठी मदत होते. तसेच मानसिक विकासात मदत करणारे खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या.

मोबाइल गेम आणि टीव्ही यांपासून मुलांना दूर ठेवण्यासाठीही ही पद्धत अत्यंत उत्तम मानली जाते. मुलं जर शारीरिक खेळ खेळत असतील तर ते मोबाइल गेमबाबत कमी आकर्षित होतील.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

Dr. Sagar Chavan
Dr. Sagar Chavan
MD - Allopathy, Abdominal Radiologist Pediatric Radiologist, 8 yrs, Pune
Dr. Manisha Garud
Dr. Manisha Garud
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. D. Malekar
Dr. D. Malekar
MBBS, Family Physician, 21 yrs, Pune
Dr. Maya Golikere
Dr. Maya Golikere
BAMS, Panchakarma General Physician, 2 yrs, Pune
Dr. Nitin Desai
Dr. Nitin Desai
BAMS, Ayurveda Panchakarma, 22 yrs, Pune