Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
लहान मुलांच्या पोटदुखीवर उपयुक्त हिंग
#पोटात कळा#बाळा ची काळजी

फेरुला या वनस्पतीपासून हिंग बनवले जाते. हिंग़ातील अ‍ॅन्टी बॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टी सेप्टीक घटक पोट साफ करण्यास मदत करतात. यामुळे पचनमार्ग मोकळा आणि स्वच्छ होतो. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंग हा एकमेव उपाय आहे. लहान बाळ हे अबोल असतात. त्यांना काही त्रास झाले की ते रडून व्यक्त करतात. पण ते नेमके का रडतात हे घरातील कुणालाच समजत नाही. डॉक्टरांच्या मते, खाण्याच्या वेळी मुलांनी अधिक प्रमाणात हवा श्वसनाच्या मार्गाने आत घेतल्यास आतड्यांचे आकुंचन होण्याचे प्रमाण वाढते. परिणामी पोटदुखीची समस्या वाढते. त्यामुळे त्यांच्या पोटदुखीवर हिंग हा रामबाण उपाय आहे.

- अर्धा चमचा हिंग पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा.

- पोटाजवळ हलक्या हाताने या पेस्टने मसाज करा.

- पेस्ट बेंबीत जाणारा नाही याची काळजी घ्या. बेंबीजवळील पेस्ट कापसाच्या ओल्या बोळ्याने पुसा.

- पाण्याऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तीळाच्या तेलातही हिंग मिसळून पेस्ट करणे फायदेशीर ठरू शकते.

- पेस्ट लावल्यानंतर थोडावेळ ती थंड होऊ द्यावी तसेच सुकू द्या. पोटदुखी कमी करण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे.

- पेस्ट सुकल्यानंतर मुलांना ढेकर येऊ देण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे गॅस बाहेर पडेल तसेच पोटदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर ओल्या कापडाने बाळाचे पोट स्वच्छ पुसावे.

Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Zainab Shaikh
Dr. Zainab Shaikh
BAMS, Ayurveda, 2 yrs, Pune
Dr. Shyamsundar Jagtap
Dr. Shyamsundar Jagtap
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune