Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
हाय कोलेस्ट्रॉल
#रोग तपशील#मज्जापेशीजालनियंत्रण



कोलेस्टेरॉल म्हणजे काय आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते ?
आजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे! त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे! कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं! साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते! कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविकार जडतो का? कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात.

इ.स.१९६० च्या सुमारास “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत दहा-बारा वर्षे चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. म्हणजेच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण !



आपल्या देशातील जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात. :

- कोलेस्टेरॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे!
- कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे.
- कोलेस्टेरॉलशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेले असते.
- ड जीवनसत्व (विटामिन D), टेस्टोस्टेरॉन (testosterone) व ईस्ट्रोजन (estrogen) सर्खेव हार्मोन्स, यांच्या निर्मितीत शरीराकडून - कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.
- कोलेस्टेरॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे, आपण आहारातून कोलेस्टेरॉल घेतले किंवा नाही घेतले तरी हा आपल्या यकृताद्वारे सतत शहराची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निर्माण केला जातो.
- आहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परिणाम होतो.
- आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार होतात.
- कोणत्याही वनस्पतीजाण्या तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते.
- कोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. पण ते आरोग्याला घातक नसते, कारण
- ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशांपैकी ५०% लोकांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नॉर्मल असते.

आपण कोलेस्टेरॉल व्यायाम करून जाळू शकतो का?
कोलेस्टेरॉल हा जरी चरबीसारखा पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्टेरॉल मात्र जाळू शकत नाही.

कोलेस्टेरॉल हे चांगले की वाईट?
जर आपण तूप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले की ते मिसळले न जात तरंगते. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जाणार नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केली आहे. चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने ते रक्तात विद्राव्य असते. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन (लायपोप्रोटीन) म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आहेत.

1. लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (LDLs) लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले जाते, कारण, ते यकृताकडून शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते.
2. हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन (HDLs) हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. जितके जास्त रक्तातील HDLतितकी तुमची हृदयविकाराची जोखीम किंवा रिस्क कमी असते!

रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा आणखीही एक प्रकार असतो
Very लो डेन्सिटी लायपोप्रोटीन (VLDLs) व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन.
VLDL, HDL आणि LDL हे फक्त रक्तातच असतात, अन्नामध्ये नाही!

कोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय?
रक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांच्या भिंती कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अशा अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात हे विकार होऊ शकतात.

रक्तात किती कोलेस्टेरॉल हे जास्त समजले जाईल?
टोटल कोलेस्टेरॉल

- 200 पेक्षा कमी: चालेल
- 200 ते 239: बोर्डरलाईन जास्त
- 240 पेक्षा जास्त : उच्च पातळी

Dr. Ashish Bandewar
Dr. Ashish Bandewar
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dentist, 1 yrs, Pune
Dr. Sujata Bauskar
Dr. Sujata Bauskar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 23 yrs, Pune
Dr. Ashok Lathi
Dr. Ashok Lathi
MS - Allopathy, General Surgeon, 37 yrs, Pune
Dr. Vijay E Chaudhari
Dr. Vijay E Chaudhari
BHMS, Homeopath, 25 yrs, Pune
Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune