Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज
#रोग तपशील#अॅसिड रिफ्लक्स जीईआरडी



गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज (GERD):छातीत जळजळणे

गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज (GERD) मध्ये पोटाचे एक अॅसिड पुन्हा अन्ननळीमध्ये जमा होते. हे अॅसिड फूड पाइपच्या लाइनिंगला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे इनडायजेशनची समस्या होऊ शकते. ही समस्या दिर्घकाळ राहिली तर अल्सर किंवा कँसर सारख्या सीरियस आजारांचे रुप घेऊ शकते. गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. GERD च्या 11 संकेतांविषयी आणि यापासून बचाव करण्याविषयी सांगत आहेत...

अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखी , कंबरदुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.

ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांना त्यापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. वेगवेगळी औषधं तर आपण घेतोच... या उपायांचाही वापर करून बघावा...

1. पाणी - पाणी पिणं आणि ते योग्य पिणं गरजेचं आहे. पाणी कमी पिल्यानं अॅसिडिटीचा त्रास होतो. हा त्रास होवू नये म्हणून दिवसभरात कमीतकमी 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल, तेव्हा पाणी प्या... जेव्हा गॅसेसचा त्रास होईल जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळं अॅसिड बाहेर पडेल, सोबतच गॅसची समस्या लगेच कमी होईल.

2. आलं – गॅसपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे. थोडसं कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं गॅसेसपासून लगेच आराम मिळतो. आल्यात एंटी-बॅक्टेरिअल आणि एटी-इन्फ्लामेंट्री तत्त्व असतात. त्यामुळं पोट आणि इसोफेगसच्या समस्या दूर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यामुळं पोटात गॅस क्रिएट करणारे बॅक्टेरिया मारले जातात. आल्याचं एक तुकडा तुपात शेकून काळं मीठ लावू खाल्ल्यानं गॅसेसपासून मुक्ती मिळते. तसंच कोरड्या आल्याचा काढा पण उपयुक्त असतो.

3. अननस – अननसात पाचक एंन्झाइम उपलब्ध असतात. गॅसच्या समस्या असेल तर अल्कलाइन असलेले पदार्थ खावे. अननसातही अल्कलाईन असतं. म्हणून अननस खाल्ल्यानं किंवा त्याचा ज्यूस पिल्यानं गॅसेसपासून आराम मिळतो. मात्र एक लक्षात ठेवा नेहमी पिकलेलं अननसच खा. कार कच्च्या अननसामुळं पोटाला आराम नाही तर अधिक त्रास होतो.

4. जिरं – जिरं खाल्ल्यानं पाचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. म्हणून जेव्हा आपल्याला गॅसची समस्या असेल, तेव्हा एक चमचा जिरे पावडर थंड्या पाण्यात घोळून प्या, खूप फायदा होईल.

5. बटाटा- आपण म्हणाल गॅसेस दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर कसा काय होऊ शकतो, मात्र बटाट्याचा ज्यूस पिल्यानं सुद्धा गॅसेसपासून आराम मिळतो. बटाटा ज्यूस अल्कलाइनचा एक उत्तम स्रोत आहे. याचा ज्यूस बनविण्यासाठी कच्चे बटाटे सोलून पाण्यात टाकून मिक्सरमधून त्याचा ज्यूस करून घ्यावा. नंतर त्याला गाळून त्यात थोडं गरम पाणी मिसळून प्यावं. गॅसपासून आराम मिळेल. हा ज्यूस लिव्हरलाही स्वच्छ करतो.

6. पुदीना - जर आपल्याला गॅस आणि अॅसिडिटीचा जास्त त्रास असेल तर पुदीना आपल्याला लगेच आराम देईल. पुदीन्याचे काही पानं चावून घ्या किंवा पुदीन्याचा चहा बनवून प्या, गॅसपासून आराम मिळेल.

7. काळी मिरी - मिरेही गॅसच्या समस्येपासून आपल्याला मुक्ती देवू शकते. जवळपास अर्धा ग्राम मिरेपूड सहदात मिसळून घेतल्यानं आराम मिळतो.

8. हळद – हळदीत अँटी-इन्फ्लामेंट्री आणि अँटी-फंगल तत्त्व असतात. अनेक आजारांवर ती औषधाचं काम करते. विशेष करून पोटासंबंधी आजार. थोडी हळद थंड्या पाण्यात घ्या आणि मग दही किंवा केळं खा. गॅसेसपासून आराम मिळेल.

9. नारळ पाणी - नारळ पाणी गॅसेसपासून आराम देणारं उत्तम औषध आहे. यात व्हिटॅमिन आणि पोषकत्त्वे भरपूर असतात. पोटासंबंधी व्याधी त्यामुळं दूर होतात. जेव्हा आपल्याला गॅसेसचा त्रास होत असेल तेव्हा 2 ते 3 वेळा नारळ पाणी प्या, आराम मिळेल.

10. लवंग – लवंग एक असा मसाला आहे की, जो गॅसेसच्या समस्येवर उत्तम औषध आहे. लवंग चघळ्याने किंवा लवंग पावडर सहदात मिसळून खाल्ल्यानं अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

11. पपई – पपईत बिटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं. जेवण लवकर पचविणारे तत्त्व पपईत आढळतात. पपईमध्ये पॅपिन नावाचं एन्झाईम असतं, जे खूप फायदेकारक असतं. गॅसेसचा त्रास होत असेल तर जेवण कमी करा आणि त्यानंतर काळं मीठ घालून थोडी पपई खा. बद्धकोष्ठता आण गॅसेस सारख्या समस्येतून तुमची सुटका होईल.

Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Swati Dagade
Dr. Swati Dagade
BAMS, Ayurveda Family Physician, 30 yrs, Pune
Dr. Himashree Wankhede
Dr. Himashree Wankhede
MBBS, Ophthalmologist Cataract surgeon, 5 yrs, Pune
Dr. Prarthan Mehta
Dr. Prarthan Mehta
Specialist, Pediatrician, 10 yrs, Ahmedabad