Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग)
#बुरशीजन्य संसर्ग#रोग तपशील



त्वचा समस्या सामान्य असतात आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमजही सर्वसाधारण असतात. रुग्ण आपल्या समस्येवर अनेक ऐकिव माहितीवर उपचार करतात. यामुळे दिशाभूल होऊन इजाच होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे रोगाचे निदान आणि उपचार उशीरा झाल्याने समस्यात वाढत होते. त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या, त्यांचे निराकरण काय आहे हे समजून घेऊयात.

फंगल इन्फेक्शन (बुरशीजन्य संसर्ग) : फंगल इन्फेक्शन ही त्वचेची समस्या आहे. जसं चपाती किंवा ब्रेडवर वातावरणातील बदलामुळे बुरशी लागते. तसाच प्रकार त्वचेबाबतही होतो. हा बदल दमट हवेमुळे होतो. त्याचप्रमाणे वातावरणातील बदल आणि दमट हवेमुळे आपल्या अंगावर घाम येतो. हा घाम त्वचेच्या माध्यमातून कपड्यात शिरतो. त्यामुळे त्वचेवर बुरशी येण्यास अनुकूल असे वातावरण तयार होण्यास मदत होते. त्वचेवर येणाऱ्या या बुरशीस वैद्यकीय भाषेत इन्फेक्शन असं म्हणतात. काही लोक या समस्येला गजकर्ण, सुरमा असंही म्हणतात.

ही समस्या साधारणतः उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात येते. उपचार : नेहमी सुती आणि सैल कपडे घालावेत, दुसऱ्यांचे कपडे आणि टॉवेल वापरू नये, नियमित शरीराची स्वच्छता ठेवावी, मधुमेह असणाऱ्यांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. स्वतःच्या मनाने कोणतेही उपचार घेऊ नये तर त्वचा रोग तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि उपचार घ्यावेत.

सोरायसीस : हा त्वचेचा आजार आहे. निरोगी त्वचेला दर चार आठवड्याला एक नवीन थर येत असतो. पण ज्यांना सोरायसिस हा आजार आलेला असतो त्यांच्या त्वचेला दर आठवड्याला एक नवीन थर येतो. म्हणजेच त्यांची त्वचा चौपट वाढते आणि बाहेर पडते. यालाच सोरायसीस असं म्हणतात. हा आजार आनुवंशिक ही असू शकतो. सोरायसीसची लक्षणं म्हणजे शरीरावर लाल चट्टे येतात आणि त्यावर पांढरी खपली तयार होते. हे चट्टे टाळू, तळहात, तळपाय किंवा शरीराच्या कुठल्याही भागावर येतात. या चट्ट्यांना खाज येते, काहींना खाज येत नाही, त्वचेवर येणाऱ्या पांढऱ्या खपल्या बाहेर पडतात. अशावेळी शरीरावर येणारे लाल चट्टे आणि पांढऱ्या खपल्या कशानेही घासू नये अथवा खाजवू नये. बळजबरीने त्या खपल्या बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील करू नये. ऐकीव उपचार करण्याऐवजी तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

कोड : कोड हा त्वचेमधील रंग तयार करणाऱ्या पेशींचा आजार आहे. या रंग तयार करणाऱ्या पेशी वेगवेगळ्या कारणांमुळे निष्क्रिय होतात आणि रंग तयार करणं बंद करतात. त्यामुळे शरीरावर पांढरे चट्टे पडतात. हा आजार होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी रंग तयार करणाऱ्या पेशींना कमी करतात. हा आजार आनुवंशिक ही असू शकतो. या प्रकारच्या रूग्णांनी उन्हापासून शरीराचे संरक्षण करावं. तसंच अंधश्रद्धेने कोणतेही उपचार न करता त्वचारोग तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन आणि उपचार घ्यावेत.

त्वचा विकार टाळण्यासाठी काही छोट्या टिप्स...
- इतरांचे कपडे आणि टॉवेल्स वापरणं टाळा - नेहमी घाम येणाऱ्या त्वचेवर अॅन्टी फंगल पावडर वापरून त्वचा कोरडी राहील याची दक्षता घ्या. - मधुमेहासारख्या इतर आजारांवर नियंत्रण ठेवा... वेळच्या वेळी उपाय करा. - तुमच्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त फ्रेश फळं आणि त्या त्या हंगामी भाज्यांचा वापर राहील याची काळजी घ्या. - दिवसातून जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर फेकले जातात. - एक कप गरमागरम व्हेजिटेबल सुप किंवा ग्रीन टी तुमची पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

गजकर्ण फूट
गजकर्मात बुरशीजन्य संसर्ग हा त्रासदायक ठरतो. ओले शूज आणि घट्ट ओले कपडे यामुळे हा त्रास उद्भवू शकतो. - प्लास्टिक, लेदर किंवा कॅन्व्हॉस शूज वापरणं टाळा - त्याऐवजी स्लीपर किंवा फ्लिप-फ्लॉप वापरू शकतात. - सुती सॉक्स वापरा आणि ते वेळच्या वेळी धुवून घ्या. - तीळ आणि खोबरेल तेल अॅन्टी फंगल पदार्थ म्हणून उपयोगी ठरतात. पायांना हे तेल वापरून तुम्ही बाहेर पडू शकतात. - तुमच्या पायांचे तळे स्वच्छ आणि कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा.

सोरायसिस
सोरायसिसमध्ये त्वचेवर लाल चट्टे दिसणं सुरू होतं... यावर उपाय म्हणजे... - त्वचेवर लाल चट्टे दिसू लागल्यास त्यावर कोरफडीचा गर लावू शकतात. यामुळे त्वचेला आराम पडेल. - पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या त्वचा विकारांसाठी कोरफडीचा गर उपयोगी ठरतो. - घरच्या घरी सोप्पा उपाय म्हणजे डाळीचे पीठ, गुलाबपाणी आणि दूध एकत्र करून तुम्ही हे मिश्रण लाल डागांवर लावू शकता. यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळेल. - संसर्गजन्य भागावर ऑलिव्ह ऑईलनं हलक्या हातांनी मसाज करणंही लाभदायक ठरू शकतं. - अॅन्टी बॅक्टेरिअल सोप आणि टॅल्कम पावडर वापरा.

उष्णतेमुळे पुरळ उठणे
अंगावर घामोळ्या किंवा लाल पुरळ उठणं आणि त्वचेच्या त्या भागावर खाज सुटणं ही समस्या बऱ्याचदा घामामुळे उद्भवते. यावर उपाय म्हणजे... - तुम्ही या भागावर नखांनी खाजवलं नाही तर ही पुरळ लवकर बरी होऊ शकतात. - त्वचेवरची खाज कमी करण्यासाठी कॅलामाईन लोशनचा वापर तुम्ही करू शकता. - दमट दिवसांत सुती आणि सैलसर कपडे वापरा. - उष्ण आणि दमट वातावरणात फार वेळ राहू नका. - थंड पाण्यानं आंघोळ करा आणि तुमच्या त्वचेवरचं पाणी हवेनंच सुकू द्या

पावसाळ्यात ओलसरपणामुळे बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्शन काही नवीन नाहीत. पण, हीच संक्रमणं तुम्हाला आजारी पाडू शकतात. ओलसर आणि दमट वातावरणामुळे तुम्हाला स्कीन इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तुम्हालाही ही समस्या सतावत असेल तर या काही टिप्स तुमच्यासाठीच...

Dr. Shrikant Tile
Dr. Shrikant Tile
MBBS, Gynaecologist, 10 yrs, Pune
Dr. Sandhya Kamble
Dr. Sandhya Kamble
BAMS, Ayurveda Family Physician, 26 yrs, Pune
Dr. Gauri Karve
Dr. Gauri Karve
MBBS, 6 yrs, Pune
Dr. Manoj Rahane
Dr. Manoj Rahane
BHMS, Homeopath, 13 yrs, Pune
Dr. Suhas Shingte
Dr. Suhas Shingte
BAMS, Family Physician General Physician, 18 yrs, Pune