Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
फिस्टुला
#नाडीव्रण#रोग तपशील



भगंदर

भगंदर हा शब्द जरी लोकांच्या परिचयाचा असला तरी भगांदरात नक्की काय होते हे अनेक लोकांना खरोखरीच माहित असत का? हा एक प्रश्नच आहे.काही लोक गोदाचीरेला भगंदर समजतात तर काही लोक त्याचा संबंध मुलव्याधीशी जोडतात. भग स्थानात उत्पन्न होणारा म्हणजे भगंदर असं वर्णन आयुर्वेदिक ग्रंथात सापडते. भग प्रदेश म्हणजे जननेंद्रिय व मलविसर्जन करणारा गुदाचा भाग यामधील प्रदेश जो मुत्राशायाशीसुद्धा संबंधित असतो. भगांदरास हिंदीमध्ये नासूर व आधुनिक शास्त्रामध्ये ‘फिस्ट्यूला इन एनो ”म्हणून संबोधले जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती भगंदर या रोगाने पीडित होते त्यावेली त्या व्यक्तीला हे माहित नसते कि आपणास भगंदर हा रोग झाला आहे. बरेच रुग्ण केवळ गुदभागाजवळ एखादि पुली,बेंड,ओंबळ,किंवा गळू झाले असावे असे समजून एक तर दुर्लक्ष करतात किंवा तात्पुरती उपाययोजना करून आजार दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच या आजाराचे निदान आजार जुना झाल्यावर होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते.

भगंदर हा रोग होतो कसा?

आधी वर्णन केल्या प्रमाणे सुरुवाती बाह्यमलविसर्जन मार्गाच्या बाजूस एका पुटुकुळीची निर्मिती झालेली दिसून येते.वरून जरी हि साधी पुटकुळी वाटली तरी तिचे मुळ हे खोलवर गेलेले असते व हेच भगंदराचे बाह्य त्वचेकडील तोंड असते . जस जसा काळ जात जातो तास तसा या पुळीतील दुषित स्त्राव खोलवर जात मलाशायाच्या आतील भागात दुसरे मुख तयार करतो.रुग्णास फक्त पुळीचे बाहेरील मुख दिसत असते.क्वचित त्यातून रक्त,पुय मिश्रित स्त्राव होत असतो.स्त्राव होऊन गेल्यावर काही काळ पुळीतील वेदना व सूज कमी झाल्याचे जाणवते.मात्र पुनास्त्राव जमा होऊन पुळीची सूज व वेदना यास सुरुवात होते.

भगंदराची पुळी सामान्य उपचारांनी बरी होत नसते. या उपचारांनी कंटाळून रुग्ण जेव्हा आपल्या चिकित्सकाला भेटतो त्यावेळी साधारण २ ते ३ महिन्यांचा काळ उलटलेले असतो. डॉक्टर प्रतिजैविकांचा व बरोबरीने सूज व वेदना कमी करणाऱ्या औषधांचा वापर करतात.या उपचारांनी काही काळ रुग्णास आपण बरे झालो आहोत असे वाटते.मात्र पुन्हा पुळी मध्ये सूज,वेदना व बरोबरीने स्त्राव येणे हि लक्षणे सुरु गोटात. स्त्रावाचे प्रमाण कधी कधी एवढे असते कि रुग्णाची अंतवस्त्रे ओली होऊ लागतात व व्यक्तीस आपले दैनंदिन व्यवहारात लक्ष लागणे कठीण होऊ लागते.
भगंदराचे जे प्रकार आयुर्वेदशास्त्रात वर्णन केले आहेत त्यांची नावे आकृती अनुसार दिली गेली आहेत. उदा. उंटाच्या मानेप्रमाणे वरती उचलून आलेली पुळी.

भगंदरावर केवळ शस्त्रकर्म हाच एक उपाय आहे असे नाही. आयुर्वेदामध्येहि शस्त्रकर्माचा वापर करण्याचा उपदेश आहे.मात्र भगंदराच्या काही अवस्थांमध्ये शस्त्रकर्मापेक्षा अत्यंत कमी त्रासदायक अशा क्षारसूत्र पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो.क्षारसूत्र म्हणजे औषधी द्रव्यांनी लेपण केलेला दोरा जो भगंदराच्या एका मुखातून प्रविष्ट करू दुसऱ्या मुखातून बाहेर काढून घट्ट बांधला जातो. दोऱ्यावरील औषधे भगंदराच्या नळी प्रमाणे तयार झालेला मार्ग हळूहळू कपात आणतो व तो भाग चांगल्या तऱ्हेने भरून आणण्यास मदत करतो. साधारण सात दिवसांनी हे क्षारसूत्र बदलले जाते.आधुनिक शास्त्रकर्मानंतर पुनर्प्रदुर्भाव होण्याचे प्रमाण २० ते ३० टक्के आहे तर क्षारसुत्रानंतर पुनर्प्रदुर्भावयाचे प्रमाण ५ ते १० टक्के एवढे कमी आहे.अमुले क्षारसूत्र पद्धतीचा वापर आज मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे.

सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भगंदर होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी तर, आहारामध्ये अधिक तिखट,मसालेदार ,चटपटीत ,तळलेले पदार्थ टाळावेत. आंबविलेले पदार्थ,मैद्याचे पदार्थ ,लोणची, पापड यांचा वापर कमीत कमी करावा.अंतर्वस्त्रे शक्यतो कौटन पासून तयार केलेली असावीत.उष्ण वातावरणात राहणाऱ्या अथवा काम करणाऱ्या व्यक्तींनी विशेष करून सारख्या जड व घट्ट कपड्यांचा वापर टाळावा.शक्यतो मोकळे व कौटन पासून तयार केलेल्या ककपड्यांचा वापर करावा जेणे करून त्या भागामधील उष्णता नियंत्रणात राहील.

आहारामध्ये फळभाज्या ,पालेभाज्या, फळांचा नियीमित वापर करावा.मलवष्टभाची सवय असणाऱ्यांनी योग्य उपयायोजानेने माल प्रवृत्ति रोजच्या रोज साफ होईल याची दक्षता घ्यावी. मल विसार्जानंतर गुदद्वाराची स्वच्छता योग्य करावी. अधिक घाम येणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून दोन वेळा तरी पाण्याने शरीराच्या त्या भागाची स्वच्छता करावी. या उपायांनी भगंदराच्या तक्रारीपासून निश्चित दूर राहता येईल.

भगंदर - उपचार पद्धती

गुदमार्गाच्या बाजूचा मांसल भाग व गुदमार्ग यांना जोडणारी अनैसर्गिक नलिका तयार होणं, म्हणजेच भगंदर होय. हा आजार बरा होण्यासाठी अवघड असल्यामुळे यावर उपचारासाठी अनेक संशोधनं होऊन वेगवेगळ्या उपचारपद्धती उपलब्ध आहेत.

१. ऑपरेशन (फिश्चुलेक्टॉमी) : भगंदराची नलिका बाहेरील छिद्रापासून शौचाच्या जागेतील छिद्रापर्यंत कट करून काढून टाकतात. यात अनेक दिवस ड्रेसिंग करावं लागतं.

२. फायब्रीन ग्लू : भगंदराच्या नलिकेमध्ये फायब्रीन ग्लू नावाचं द्रव्य भरलं जातं. त्यामध्ये प्लाझमा प्रोटीन असतं. त्यामुळे ही नलिका बंद होते. या उपचारपद्धतीत नलिका कट करावी लागत नाही. फक्त हा उपचार ३० ते ७० टक्के रुग्णांना उपयुक्त ठरतो.

३. फिश्चुला प्लग : फिश्चुला ट्रॅकमध्ये शरीराकडून शोषून घेणाऱ्या मटेरिअलपासून बनवलेला प्लग बसवला जातो. या पद्धतीत भगंदराचं आतलं छिद्र बंद केलं जातं. ३५ ते ७० टक्के रुग्णांमध्ये या पद्धतीत यश मिळतं.

४. लिफ्ट (लायगेशन ऑफ इंटर स्फिंट्रिक ट्रॅक) : या उपचारपद्धतीत वर्तुळाकार स्नायू कट न करता भगंदराचा मार्ग बंद केला जातो. यात ५७ ते ९४ टक्के रुग्ण बरे होतात.

५. व्हॅफ्ट (व्हिडिओ असिस्टेड अॅनल फिश्चुला ट्रिटमेंट) : या उपचारपद्धतीमध्ये फिश्चुला स्कोपमधून भगंदर नलिका आतून साफ करून त्याचं आतील छिद्र बंद केलं जातं. हे उपचार केल्यानंतर ६० ते ७० टक्के रुग्णांमध्ये पुन्हा ही व्याधी उद्भवत नाही.

६. कोलोस्टॉमी : हाय अॅनल फिश्चुला बरं करण्यासाठी ही उपचारपद्धती वापरली जाते. या पद्धतीत शौचाचा मार्ग ठराविक कालावधीसाठी पोटातून तयार केला जातो.

७. क्षारसूत्र : विशिष्ट प्रकारचा धागा बसवून तो सात ते १० दिवसांनी आवळला जातो. भगंदर बाहेरील छिद्रापासून आतील छिद्रापर्यंत कट होत असल्यामुळे व्याधी बरी होण्याचं प्रमाण जास्त आहे. अॅडमिट राहावं लागत नाही किंवा ड्रेसिंग करावं लागत नाही. शौचावरील ताबाही जात नाही. भगंदर हा बरा न होणारा आजार आहे, हा गैरसमज योग्य उपचारपद्धतीमुळे आपण दूर करू शकतो.

Dr. Vijay Mane
Dr. Vijay Mane
BHMS, Homeopath Family Physician, 22 yrs, Pune
Dr. sandeep shivekar
Dr. sandeep shivekar
BHMS, Diabetologist, 10 yrs, Pune
Dr. Aniket Joshi
Dr. Aniket Joshi
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 11 yrs, Pune
Dr. Chandrakumar Deshmukh
Dr. Chandrakumar Deshmukh
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. S K  Toke
Dr. S K Toke
DNB, Pulmonologist General Physician, 11 yrs, Pune