Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
इरेक्टिल ड्यस्फुंकशन
#स्थापना दोष चाचणी टेस्टोस्टेरोन#रोग तपशील



Erectile Dysfunction

Erectile Dysfunction ही समस्या त्रासदायक असून त्यापासून बचावण्यासाठी या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करणे नक्कीच फायदेशीर ठरेल.
योग्य व पौष्टिक आहार घेतल्याने केवळ तुम्ही फीट व तरुण रहाता असे नाही तर त्यामुळे तुमचे सेक्शुअल लाईफ देखील निरोगी रहाते.विशेषत: Erectile Dysfunction ही समस्या असलेल्या पुरुषांनी आहारात काही विशिष्ट बदल केल्यास त्यांच्या समस्येमध्ये फार फरक पडू शकतो.असे असले तरी कोणताही अन्नपदार्थ हा विकार पूर्ण बरा करु शकत नाहीत.त्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज ही लागतेच.पण औषधोपचार करण्यापूर्वी जाणून घेऊयात असे काही अन्नपदार्थ ज्यामुळे तुमचा सेक्शुअल स्टॅमिना सुधारतो व Erectile Dysfunction या समस्येमधील लक्षणांवर प्रभावीपणे उपचार करता येतात.

१.बीटरुट -जेव्हा प्रश्न पुरुषांच्या सेक्शुअल हेल्द अथवा Erectile Dysfunction सारख्या समस्येचा असतो तेव्हा बीटरुट आहारात असणे फारच गरजेचे आहे.बीटमध्ये Nitrates हा घटक मुबलक प्रमाणात असतो जो इनऑर्गेनिक घटक हवा,पाणी व काही विशिष्ट पदार्थांमध्ये उपस्थित असतो.तोंडामधील बॅक्टेरिया या Nitrates चे रुपांतर Nitrite मध्ये करतात व गिळल्यानंतर पोटातील बॅक्टेरिया त्याचे रुपांतर Nitric oxide मध्ये करतात.पोटात तयार होणा-या या वायुमुळे रक्ताभिसरण सुधारते.शरीराच्या खालच्या भागातील रक्तप्रवाह सुधारतो व पेनिसमध्ये होणारे रक्ताभिसरण सुधारल्यामुळे Erectile Dysfunction मध्ये देखील सुधारणा होऊ लागते.त्यामुळे बीटचा रस पिणे फायदेशीर ठरते.

२.पालेभाज्या-बीटप्रमाणेच पालेभाज्यांमध्ये देखील Nitrates मुबलक प्रमाणात असते.पालक,मेथी व सेलरी सारख्या भाज्यांमुळे रक्तप्रवाह सुधारल्यामुळे तुम्हाला इरेक्शन करणे सोपे जाते.मात्र त्या आधी भेसळयुक्त भाज्या कशा ओळखाव्यात ? हे जरुर जाणून घ्या.

३.कलिंगड– कलिंगडामधील L-citrulline व Lycopene या दोन घटकांमुळे पुरुषांमधील सेक्शुअल हेल्द सुधारते.Citrulline मुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो व सहाजिकच इरेक्शन होण्यास मदत होते.तसेच यामुळे पुरुषांच्या सेक्शुअल हेल्द साठी आवश्यक असणारी Testosterone या हॉर्मोन्सची पातळी देखील सुधारते.Lycopene या घटकाचा देखील या समस्येमध्ये सारखाच फायदा होतो.

४.ओट्स-विशेषत: वाइल्ड ओट्सचा Erectile Dysfunction व नपूसंकता या समस्यांवर उपचार करण्यासाठी चांगली मदत होते.ओट्समध्ये Arginine हा भरपूर प्रमाणात असतो ज्यामुळे रक्तातील Testosterone सक्रिय रहाण्यास मदत होते.सहाजिकच ओट्सच्या सेवनामुळे तुमचे सेक्स लाईफ सुधारते व Erectile Dysfunction समस्या कमी होते.

५.डार्क चॉकलेट-डार्क चॉकलेट मध्ये फ्लेवोनॉईड व अॅन्टीऑक्सिडन्ट भरपूर प्रमाणात असतात.या फ्लेवोनॉईड व अॅन्टीऑक्सिडन्ट मुळे तुमच्या ह्रदयाचे कार्य व रक्ताभिसरण सुधारते.ह्रदयाचे आरोग्य व रक्ताभिसरण सुधारणे यामुळे तुम्हाला बराच वेळ इरेक्शन रोखता येते व तुमचे सेक्शुअल लाईफचा आनंदही लुटता येतो.

६.पिस्ता-मूठभर पिस्ता रोज खाल्लास तुम्हाला सेक्सची इच्छा वाढण्यास मदत होते.खरंतर पिस्त्यामधील Arginine या घटकामुळे तुमचा मूड सुधारतो.कारण यामुळे रक्तवाहिन्या शिथिल होतात, गुड कोलेस्टेरॉलची पातळी सुधारते,कोणतेही दुष्परिणाम न होता रक्ताभिसरण कमी होते.

७.शेलफीश-Oysters व Shellfish मध्ये मुबलक प्रमाणात झिंक असते.हे मिनरल्स पुरुषांमधील testosterone च्या निर्मितीसाठी फार आवश्यक असते.Testosterone चे कमी प्रमाण देखील Erectile Dysfunction व सेक्शुअल समस्यांसाठी कारणीभूत असते.

८.टोमॅटो-टोमॅटो मध्ये Lycopene हे phytonutrient असते ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते व अनेक सेक्स समस्या कमी होतात.टोमॅटो खाल्ल्यामुळे ह्रदयाचे पंपीग सुधारते व ह्रदयाचे आरोग्य राखले जाते.ह्रदयाचे आरोग्य सुधारल्यास शरीरातील विविध भागांना रक्ताचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो ज्यामध्ये लैगिंक अवयवांचा देखील समावेश असतो.त्यामुळे सेक्स करण्यापूर्वी रात्रीच्या जेवणात टोमॅटो सलाड घेणे फायदेशीर ठरु शकते.

९.शेवग्याच्या शेंगा-या भाजीची पाने,फुले व शेंगा सर्वच आरोग्यदायक असतात. American Journal of Neuroscience मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानूसार शेवग्याच्या शेंगा खाल्लाने Testosterone पातळी वाढते व सेक्स ची इच्छा व लिबीडो देखील वाढतो.

१०.केळं–केळ्यामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीरातील सोडीयमची पातळी नियंत्रित रहाते,रक्तदाब कमी होतो व रक्ताभिरसण सुधारते.केळ्यामुळे Testosterone च्या निर्मितीला चालना मिळते व सहाजिकच तुमचे सेक्स लाईफ सुधारते.

Dr. Amar Kamble
Dr. Amar Kamble
MS/MD - Ayurveda, Ayurveda Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Sonali  Satav
Dr. Sonali Satav
MD - Homeopathy, Family Physician Homeopath, 10 yrs, Pune
Dr. Snehal  Charhate
Dr. Snehal Charhate
BAMS, Ayurveda, 19 yrs, Pune
Dr. Hemant Damle
Dr. Hemant Damle
MD - Allopathy, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 25 yrs, Pune
Dr. Amit Patil
Dr. Amit Patil
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Gynaecologist, 11 yrs, Pune