Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
घसा कोरडा पडणे
#रोग तपशील#घशात दुखणे घसा कोरडा पडणे

काही पेशंटमध्ये घसा दुखण्याची तक्रार वारंवार आढळते. ही सामान्य तक्रार आहे, असे समजू नये. वारंवार घसा दुखत असेल तर त्यामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज जाण्याचा धोकाही असतो. घसा नेमका कोणत्या कारणांमुळे दुखतो, त्यावर उपाय कोणते हे जाणून घेऊया…

घसा दुखण्याचे एक नेहमीचे कारण म्हणजे अॅलर्जिक ऱ्हायनायटिस.

ऋतू बदलल्यावर किंवा विशिष्ट ऋतुमानात किंवा वर्षभरही त्रास होऊ शकतो.

> जे धूम्रपान करीत नाहीत, त्यांनाही त्रास होऊ शकतो.

> डोळे, नाक व घशात खाज सुटू शकते, डोळे लाल होतात, पापण्यादेखील सुजतात.

> सर्दीवरील गोळीमध्ये स्यूडो इफिड्रिन नावाचा एक घटक असतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, मधुमेह वाढू शकतो, हृदयविकाराला आमंत्रण होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

> योगशास्त्रामध्ये प्राणायाम, भास्त्रिका, काही ठराविक योगासने व जलनेती हे अत्यंत प्रभावी उपचार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच ते करावेत.

> काही पेशंटना घशात गाठ असण्यासारखे वाटते. त्यांचा आवाज बसतो.

> गरम पाण्याची वाफ घेणे, ज्येष्ठमधाची काडी चघळणे, कोमट पाणी पिणे, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे असे प्राथमिक उपचार करता येतील.

> विश्रांती, सकस आहार व योग्य औषधोपचार घेतल्यास आजाराची लक्षणे कमी होऊन पुढील कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात.

> मानेत गाठी येणे, ताप न जाणे, गिळताना किंवा जांभई देताना त्रास होणे, अति लाळ गळणे असे त्रास होत असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.

लक्षणे

> सर्दी, सायनसमुळे

> तोंडाच्या कॅन्सरमुळे

> घसा कोरडा पडल्याने

> तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असल्यास

> अॅलर्जी, प्रदूषण किंवा धूळ असलेल्या ठिकाणी राहिल्यास

> मोठ्याने बोलल्याची सवय असल्याने

> दारू पिणे, धूम्रपान, उष्ण ठिकाणी काम करणे

काय काळजी घ्याल?

> घशाचे इन्फेक्शन झाले असेल तर सर्वप्रथम थंडगार पदार्थ किंवा पेये घेणे पूर्णपणे थांबवा. आंबट आणि तेलकटही कमी खा.

> पालेभाज्या, भाज्यांचे सुप्स घ्या. सोयाबीन, राजमा, नाचणी वगैरेंचा समावेश आहारात ठेवाल तर उत्तम.

> इन्फेक्शन कमी करण्यासाठी मीठ टाकून गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात. हे जेवणाच्या आधी करा.

घशाच्या इन्फेक्शनची लक्षणे

> सर्वप्रथम लक्षण म्हणजे घसा खवखवणं.

> घशाला लालसरपणा येणं, घशाला पुरळ येणं.

> सतत कफ येणं, घसा दुखणं.

> टॉन्सिलचा आजार.

> वारंवार सर्दी होणं, दमा असणं.

> सतत ताप येत असेल तर…

> काही वेळा अचानक उलटय़ा व जुलाब होतात.

घसा दुखत असल्यास…

> सर्वात पहिला आणि सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात थोडे मीठ घालून दिवसातून तीनवेळा गुळण्या करा.

> घसा कोरडा पडल्यामुळे तो खवखवतो. त्यासाठी मोठय़ा भांडय़ात गरम पाणी घेऊन त्याची वाफ घ्यावी लागेल.

> आले आणि लवंगांमुळे घशाचा संसर्ग दूर होऊ शकतो. एक कप पाण्यात आल्याचा रस घालून उकळा. ते पाणी कोमट झाले की त्यात थोडे मध मिसळून ते दिवसातून तीनवेळा प्या.

> काळीमिरी आणि बत्ताशे एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी हळूहळू चावणे. त्याशिवाय एक कप पाण्यात ४ ते ५ काळीमिऱ्या आणि तुळशीची पाने घालून त्याचा काढा बनवून प्या.

> थोडय़ा पाण्यात ५ अंजीर घालून ते उकळवून घ्या. मग ते गाळून हे पाणी सकाळ-संध्याकाळ गरमागरम प्या.

> गळ्याचा संसर्ग दूर करायचा तर सकाळ-संध्याकाळ थोडय़ा मनुका खायच्या. असे १० दिवस केल्याने घशाची खवखव दूर होते.

> रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि पाणी समप्रमाणात घेऊन ते प्या. गळा ओलसर राहील.

रोगनिदान

घसा सुजला तर घशाची पाठभिंत लालसर दिसते. टॉन्सिलच्या गाठी सुजल्या असतील तर त्या नेहमीपेक्षा मोठ्या दिसतात. गाठींचा पृष्ठभाग लालसर दिसतो.

> कधीकधी टॉन्सिलवर पांढरट (पू) ठिपके दिसतात.

> घसासूज असो की टॉन्सिलसूज, गळ्याचील रसग्रंथी सुजणे, दुखणे ही बहुतेक वेळा आढळणारी खूण आहे.

> कधीकधी एका बाजूच्या टॉन्सिलच्या मागे पू जमून त्या बाजूची सूज मोठी दिसते. अशा आजारात मात्र पेशंटला तज्ज्ञाकडे पाठवणेच योग्य ठरेल.

>घशाची तपासणी करण्यासाठी जीभ खाली दाबून धरण्यासाठी साधा स्वच्छ चमचा वापरावा. नीट दिसण्यासाठी बॅटरीचा उजेड किंवा सूर्यप्रकाश लागतो.

प्राथमिक उपचार

> गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. गरम दूध-हळद प्यायला द्यावी. या उपायांनी घशाला शेक मिळून लवकर आराम पडतो. बऱ्याच वेळा केवळ इतक्या उपायानेच घसासूज कमी होते. गुळण्या दिवसातून चार-पाच वेळा कराव्यात.

> लाळ सुटण्यासाठी खडीसाखर, हळद-गूळ गोळी अधूनमधून तोंडात ठेवावी.

> जंतूदोष आटोक्यात आणण्यासाठी एमॉक्सी गोळ्या उपयुक्त आहेत. लहान मुलांना पातळ औषध देणे सोपे पडते. तयार औषध न मिळाल्यास वरील गोळीचे चूर्ण साखरपाणी किंवा मधातून देता येते.

Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune
Dr. DHOLARIYA JAYANTILAL
Dr. DHOLARIYA JAYANTILAL
MD - Allopathy, Family Physician, 8 yrs, Ujjain
Dr. Simranpal Singh
Dr. Simranpal Singh
Medical Student, General Physician, 2 yrs, Chandauli
Dr. Rajiv Srivastava
Dr. Rajiv Srivastava
Specialist, Cardiac Surgeon Cardiothoracic Surgeon, 20 yrs, Thane