Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
दुहेरी दृष्टी
#रोग तपशील#दुहेरी दृष्टी दुहेरी दृष्टी (एक वस्तू दोन असल्याचा भास होणं).

सध्या लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलतीय. नोकरीच्या निमित्तानं नोकरदारांना एका ठिकाणाहून दुसरीकडे धावपळ करावी लागते. आयटीसारख्या कंपन्यांमधून विशी-तिशीतील तरुणाईला सातत्यानं संगणकासमोर बसावं लागतं. त्यामुळे डोळ्यांपासून ते मानेपर्यंतचे सर्व आजार बळावण्यास सुरुवात होतात. या आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केल्यास त्यांच्या जगण्यातील आनंदच दूर होतो, हे सर्वांनी अनुभवलंय.

फक्त आयटीच नाही, तर आता बहुतेक सगळ्या कार्यालयात संगणकावरच काम करावं लागतं. आजच्या काळात कमी वेळात स्मार्ट वर्क करणं, हे आव्हान आहे. तेच काम करण्याचा पगार सर्वांना मिळतो. एकीकडे पैसे कमावत असलो, तरी दुसरीकडे आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कमवलेला पैसा त्यासाठी खर्च करावा लागतो. संगणकावर सातत्यानं काम करावं लागत असल्यामुळे त्याचा डोळ्यांवर खूप ताण येऊ शकतो. या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चाललीय. सध्या कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा आजार बळावत चालल्याचं नेत्रतज्ज्ञांच्या निदर्शनास येत आहे.

कम्प्युटर व्हिजन सिंड्रोमला सामान्यपणे सी.व्ही.एस. म्हटलं जातं. या अवस्थेमुळे डोळ्यांची कायमस्वरूपी हानी होत नाही; पूर्वीच्या सहजतेनं संगणक वापरता येत नाही. दिवसाला तीन तासांपेक्षा जास्त वेळ संगणकाचा वापर करणाऱ्या ९० टक्के व्यक्तींमध्ये हा आजार आढळून येतो.

संगणकामुळे दृष्टीवर परिणाम

संगणकावर काम करताना आपले डोळे सतत कशावर तरी केंद्रित होत असतात. डोळ्यांची सतत हालचाल होत असते आणि आपण बघत असलेल्या गोष्टींशी ते जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. कॉन्ट्रास्ट, फ्लिकर आणि ग्लेअरसारख्या स्क्रीनच्या घटकांमुळे संगणकावर काम करणं, हे पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा कठीण असतं. चष्मा असेल आणि संगणक वापरताना तो घातला जात नसेल, तर डोळ्यांच्या समस्या अधिक प्रमाणात होऊ शकतात. कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम ही तणावामुळे वारंवार होणाऱ्या इजांसारखीच एक समस्या आहे. संगणकाचा वापर वारंवार करत असल्यास ही समस्या तीव्र स्वरूपात उद्भवते.

आजाराची लक्षणं

डोळ्यांवर ताण आणि लालसरपणा.

संगणकाच्या वापरानंतर धूसर किंवा दुहेरी दृष्टी (एक वस्तू दोन असल्याचा भास होणं).

डोळे कोरडे पडणं, लाल होणं, चुरचुरणं, डोकेदुखी.

मानेत किंवा पाठीत वेदना.

कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम हा आजार तरुणांबरोबर लहान मुलांनादेखील होण्याची शक्यता अधिक आहे; कारण लहान मुलांना संगणकावर गेम खेळण्याची चांगली हौस असते. त्यांची ही हौस नंतर सवय बनते. संगणकाचं ज्ञान घेणं योग्य असलं, तरी त्याचा अतिरेकी वापर घातक ठरतो.

Dr. Deodutta Kamble
Dr. Deodutta Kamble
BDS, Dental Surgeon Dentist, 22 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Devyani S. Ahire
Dr. Devyani S. Ahire
BDS, Dentist, 4 yrs, Pune
Dr. Sandhya Kamble
Dr. Sandhya Kamble
BAMS, Ayurveda Family Physician, 26 yrs, Pune
Dr. Vinod Shinde
Dr. Vinod Shinde
BAMS, Ayurveda Dietitian, 17 yrs, Pune