Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
हृदयाघात
#रोग तपशील#हृदयरोग



हृदयाघात

हृदयाघात म्हणजे ह्रदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठ्यातील अडथळ्यांमुळे कार्यक्षमता कमी होऊन त्यांचे काम विस्कळीत होणे होय.

जोखिमा
महिलांपेक्षा पुरुषांमध्ये हृदयविकार जास्त प्रमाणात आढळतो. सामान्यत: महिला स्त्री-संप्ररके इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनमूळे सुरक्षित आहेत. ह्याचा प्रभाव कमीतकमी पाळी जाईपर्यंत तरी राहतो. भारतासहित अनेक आशियाई विकासनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो. ज्यात खालील कारणांचा समावेश आहे :

- धूम्रपान करणे
- मधूमेह
- उच्च रक्तदाब
- लठ्ठपणा
- उच्च कोलेस्ट्रॉल, आणि कमी एचडीएल व वाढीव कोलेस्ट्रॉल
- शारिरीक श्रमाची कमतरता
- आनुवंशिकता
- तणाव, रागीटपणा आणि चिंता

लक्षणे
काहीवेळा लक्षणे ओळखणे फार अवघड असते आणि अन्य लक्षणे दिसू शकतात. सामान्यतः

- छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होतात आणि श्वसनास त्रास होतो.
- घाम येणे, मळमळ आणि चक्कर येणे ही देखील काही लक्षणे आहेत.
- साधारणपणे या वेदना छाती व पोटाच्या मधोमध किंवा पाठीच्या मणक्यात असतात तिथून त्या मान किंवा डाव्या हातात जाऊ शकतात.
- उलट्या
- अस्वस्थता
- कफ
- कंप
अशी आहेत व ह्या वेदना सुमारे २० मिनिटापेक्षा जास्त काळ टिकतात. काही वेळा रुग्ण पांढरा पडलेला दिसतो, रक्तदाब एकदम कमी होऊन रक्तसंलयी हृदय विफलता येऊन मृत्यू येतो.

उपचार
हृदयविकारावर झटकन उपचार मिळाल्यास जीवन वाचवता येते.

- जोपर्यंत वैद्यकिय मदत मिळत नाही तोपर्यंत रुग्णाला आडवे झोपवावे व त्याचे सर्व घट्ट कपडे सैल करावे.
- जर ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध असेल तर रुग्णाला त्वरीत ऑक्सिजन द्यावे.
- जर नायट्रोग्लीसरीन किंवा सॉरबिटरेटच्या गोळ्या उपलब्ध असतील तर त्वरीत त्यातील एक गोळी जिभेखाली द्यावी.
- पाण्यात ढवळून अ‍ॅस्प्रीन द्यावे.

हृदयविकारावर झटकन वैद्यकिय उपचार व इस्पितळात भरती करणे गरजेचे असते. पहिले काही मिनीटे आणि तास जरा संकट पूर्ण असतात. प्राथमिक काळात कोरोनरी आर्टरीमधील अडथळे विरघळवण्यासाठी औषधे दिली जातात.

- डॉक्टर रुग्णाची सूक्ष्म तपासणी करतात आणि हृदयाची स्पंदने मोजतात आणि रक्तदाब पाहतात.
- इलेक्ट्रोकारडिओग्रॅम, ईसीजी घेतला जातो ज्याने हृदयाची विद्युतीय सक्रियता टिपली जाते.
- ईसीजी मुळे हृदय किती व कसे स्पंदन करते ते कळते, त्यात काही असामान्य लय आहे का ते दिसते आणि जर ह्रदयविकारामुळे हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते दिसते. मात्र प्रारंभिक टप्प्यातल्या सामान्य ईसीजीमुळे हृदयविकाराची संभावना होत नाही हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. हृदयाच्या मांसपेशींचे नुकसान झालेले असल्यास ते रक्ताच्या परिक्षणात दिसून येते.
- छातीचा एक्सरेदेखील घेतला जातो.
- हृदयाच्या माहितीसाठी इकोकारडिओग्रॅम करता येतो. ही एक प्रकारची स्कँन चाचणी आहे ज्यात हृदयाच्या समुचित कार्याची माहिती मिळते.
- कोरोनरी वाहिकांमध्ये अडथळे पाहण्यासाठी कोरोनरी एंजियोग्राम काढला जातो व हा निर्णायक शाबीत होतो.

हृदयाच्या स्पंदनांवर लक्ष ठेवले जाते व जर काही अनपेक्षित स्पंदने आढळली तर त्यावर उपचार केले जातात. वेदना कमी करण्याची औषधे दिली जातात व रुग्णास आराम करण्यास व झोपण्यास सांगितले जाते.

- जर रक्तदाब जास्त असेल तर रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे दिली जातात.
- प्रत्येक रुग्णाची व त्याला आलेल्या हृदयविकाराची गंभीरता, हृदयाचे नुकसान आणि अडथळ्यांचे प्रमाण व रुग्णाचे वय लक्षात घेऊन ऊपचार पद्धती ठरवली जाते.
- कित्येक वेळा अडथळे दूर करण्यासाठी काही निश्चित प्रक्रिया आवश्यक असते. ह्यात कोरोनरी एंजियोप्लास्टी, फुग्याने वाहिकांचा अडथळा दूर करणे किंवा कोरोनरी बायपास सर्जरीचा उपयोग केला जातो.

प्रतिबंध
हृदयविकारापासून ज्यांना धोका आहे किंवा वाचायचे आहे त्यांनी खालील नियम पाळावेत : जीवन शैलीत परिवर्तन:

- आहार स्वस्थ ठेवा ज्यात चरबी आणि मीठ कमी असावे, फायबर आणि जटिल कर्बोदके उच्च मात्रेत असावेत.
- वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करावे. 3.शारिरीक व्यायाम रोज करण्याचीदेखील फार गरज आहे.
- धूम्रपान करु नये व करत असल्यास त्वरित बंद करावे.
- मधूमेह, रक्तदाब किंवा जास्त कॅलेस्ट्रोल असणाऱ्यांनी त्यांची रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास अटोक्यात ठेवावे.
- अ‍ॅस्पिरीन च्या किंवा इतर रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या.
- स्टॅटिन प्रकारातील चरबी नियंत्रित ठेवणाऱ्या औषधी. (स्टॅटिन चा फायदा होतो कि नाही यावर मोठ्या प्रमाणात मतभेद तज्ज्ञांमध्ये असून मोठ्या क्लिनिकल ट्रायल्स नंतरच याबद्दलचे सत्य समजू शकते.)
- आहारात संतृप्तचरबी ऐवजी असंतृप्त चरबी प्रकार वापरावे. (भारतात तसेच अनेक देशात त्रास फॅट वर बंदी घालण्यात आली आहे.)

Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Ankita  Bora
Dr. Ankita Bora
MBBS, Adolescent Pediatrics Allergist, 2 yrs, Pune
Dr. Pujitha Chowdary
Dr. Pujitha Chowdary
MD - Allopathy, General Medicine Physician Diabetologist, 6 yrs, Chennai
Dr. Vrushali Garde
Dr. Vrushali Garde
MBBS, Psychiatrist, 11 yrs, Pune
Dr. MUKUL TAMHANE
Dr. MUKUL TAMHANE
MS/MD - Ayurveda, Infertility Specialist Spinal Pain Specialist, 3 yrs, Pune